fbpx

नवरात्रोत्सव : जाणून घ्या चंद्रघंटा देवीची पूजा आणि तिसऱ्या माळेचे महत्व

” या देवी सर्वभुतेषु कांतीरूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः “

आज नवरात्रीचा तिसरा दिवस. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या देवीच्या डोक्यावर घंटेच्या आकाराचा दैदीप्यमान चंद्र विराजमान आहे. म्हणून या देवीला चंद्रघंटा म्हणतात.

ही देवी दशभुजा आहे. देवीच्या उजव्या चार हातांपैकी एका हाताची अभयमुद्रा, तर उर्वरित तीन हातात धनुष्य – बाण आणि कमळपुष्प आहे. पाचवा हात गळ्यातल्या माळेवर आहे.

तिच्या डाव्या हातांमध्ये कमंडलू, वायुमुद्रा, खडग, गदा आणि त्रिशूळ आहे. गळ्यात फुलांचा हार, कानात सोन्याचे आभूषण, डोक्यावर मुकुट आहे. या देवीच वाहन ‘ सिंह ‘ आहे.

” पिंडज प्रवरारुद्रान्डको पास्त्रकैर्युता, प्रसादं तनुते मह्यम चंद्रघंटेती विश्रुता “

दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीच नाव चंद्रघंटा आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. देवीच हे रुप शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या घंटेचा आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचं रक्षण करतो.

आजचा रंग पांढरा 

स्कंदमाता हे देवीचे पाचवे रूप. या रूपात ती युद्धाचा देव असलेला स्कंद किंवा कार्तिकेय याची माता म्हणून आहे. यामध्ये देवीच्या मांडीवर मूल आहे. हा अवतार हा एका आईच्या पवित्र प्रेमाचे द्योतक आहे. जेंव्हा भक्त तिचे पूजन करतात तेव्हा त्यांच्या अंतःकरणातील शांती, पावित्र्य आणि प्रार्थना याचेसुद्धा ते सांकेतिक आहे. आणि म्हणूनच पांढरा रंग आहे.

नवरात्रीच्या उपवासात थकवा जाणवतो का ? असे होत असेल तर ‘हे’ ज्यूस नक्की ट्राय करा…

संपूर्ण भारतात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या नऊ दिवसांमध्ये अनेकांना उपवास असतो. नऊ दिवसांचा मोठा उपवास असल्याने या काळात वेगवेगळे पदार्थ मोठ्या चवीने खाल्ले जातात. मात्र या काळात आलप्या आरोग्याचे संतुलन बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य सांभाळणे महत्वाचे ठरते. या उपवासाच्या काळात वेगवेगळ्या ड्रिंक्स तुम्हाला ताजेतवाने ठेवण्याचे काम करतील. आज आपण अशाच काही एनर्जी ड्रिंक्सबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवण्यास मदत करतील.

नारळ पाणी

नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियम हे पाच महत्त्वपूर्ण पौष्टिक घटक आहेत. या व्यतिरिक्त, हे अँटीऑक्सिडेंटमध्ये देखील समृद्ध आहे. त्यामुळे उपवासाच्या दिवसांमध्ये याचे सेवन फायदेशीर ठरेल.

लिंबाचा सरबत

लिंबाचा सरबत फक्त उन्हाळ्यातच पिला जात नाही तर जेव्हा तुम्हाला उर्जा आवश्यक असेल तेव्हा तो पिता येतो. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि विद्रव्य ग्लूकोज असते जे शरीरात जाऊन आणि रक्तामध्ये विरघळतात त्यामुळे शरीराला खनिजांची पूर्तता होते.

बनाना शेक

केळी त्वरित उर्जा देण्याचे काम करते. त्यामुळे आपण बनाना शेक पिऊ शकता. त्यामध्ये उपस्थित ग्लूकोज, जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम आणि फॉस्फरस आपली थकवट दूर करून उर्जा पातळी वाढवण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत करतात.

अॅॅप्पल ज्यूस

सफरचंदचा रस देखील आपल्याला भरपूर ऊर्जा देते आणि बर्याच काळासाठी ऊर्जावान ठेवण्यास मदत करते. हे दुधासह शेक बनवून देखील पिले जाऊ शकते.

बीटाचा रस

आजकाल बीटाचा रस बाजारात सहज मिळतो. हे कार्बोहाइड्रेटने परिपूर्ण आहे, जे आपल्या शरीरात त्वरित ऊर्जा संक्रमित करते. सकाळी हे पिऊन आपण दिवसभर तंदुरुस्त राहू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here