Netflixने भारतीयांसाठी आणला नवीन प्लॅॅन, Amazon Prime आणि Hotstarला बसणार फटका
अमेरिकन OTT प्लॅॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्स (Netflix) भारतासाठी नवीन सबस्क्रिप्शन प्लॅॅन बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. सध्या भारतात नेटफ्लिक्सला चांगलेच दर्शक लाभले आहेत. मात्र या दर्शकांच्या संख्येत वाढ करण्यासाठी आणि आपल्या स्पर्धकांना शह देण्यासाठी नेटफ्लिक्स नवीन कमी दराचा प्लॅॅन आणणारा आहे. मिळालेल्या माहिती नुसार हा प्लॅॅन स्मार्टफोन्ससाठी असणार आहे. तर टॅॅबलेट्स, कॉमप्युटरवर देखील हा प्लॅॅन लागू होणार आहे. मात्र टीव्हीला हा प्लॅॅन लागू होणार नाही.
काय आहे नेटफ्लिक्सचा नवीन प्लॅॅन ?
नेटफ्लिक्सने भारतात काही नवीन आणि विद्यमान ग्राहकांसाठी ‘Mobile+’ प्लॅॅन सुरू केला आहे. हा प्लॅॅन 349 रुपयांचा असणार असून यामध्ये दर्शकाला स्ट्रीम कन्टेन्ट
हा फुल HDमध्ये पाहता येणार आहे. तसेच या प्लॅॅनमध्ये स्ट्रीम होणारा कन्टेन्ट हा मोबाईल, टॅॅबलेट्स, कॉमप्युटरवर पाहता येणार आहे. यानंतर नेटफ्लिक्स 200 रुपयांचा ‘Mobile Only’ प्लॅॅनही बाजारात आणणार आहे. या प्लॅॅनमध्ये दर्शकाला स्ट्रीम होणारा कन्टेन्ट हा केवळ मोबाईलवर पाहता येणार आहे. तर याची क्वालिटी SD म्हणजे 480p असणार आहे.
इथून मागे कसा होता प्लॅॅन ?
याआधी भारतात नेटफ्लिक्सचे साधे सबस्क्रिप्शन हे महिना 499 रुपयांपासून सुरु होत होते. त्यामध्ये दर्शकाला SD क्वालिटी बंधनकारक होती. तर इतर प्लॅॅन हे 799 रुपयांपर्यंत जात होते. यामध्ये एक सबस्क्रिप्शन चार जणांना वापरता येत होते. यामध्ये दर्शकाला 4K क्वालिटीपर्यंत कन्टेन्ट पाहता येत असे.
नेटफ्लिक्सला भारतातील स्पर्धक
भारतात नेटफ्लिक्सला अनेक स्पर्धक आहेत. त्यामध्ये Amazon Prime Video, Apple TV+ आणि Disney+ Hotstar हे जागतिक स्पर्धक आहेत. हे सर्वच प्लॅॅटफॉर्म भारतीय दर्शकांची विशेष काळजी घेत आहेत. सध्या भारतात अशा प्लॅॅटफॉर्मवर सिरीज किंवा सिनेमा पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या दर्शकांना कमी दारात विविध प्लॅॅन ऑफर करत आहे.
मात्र आता नेटफ्लिक्सने अगदी स्वस्त दारात आणलेले ‘Mobile+’ आणि ‘Mobile Only’ हे नवीन प्लॅॅन या सर्वांना शह देण्यात उपयोगी पडतील. तसेच याबाबत नेटफ्लिक्स इंडियाने म्हंटले होते की, नेटफ्लिक्स भारतातील आपली ऑफर अधिक स्पर्धात्मक, सदस्य आणि सदस्यांकरिता अधिक आकर्षक बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याप्रमाणे भरतात नेटफ्लिक्स नवनवे प्रयोग करत आहे.