fbpx
2.8 C
London
Monday, February 6, 2023

नवीन आहे पण बेस्ट आहे ! Whats Appवरून करू शकता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक, कसे ते एकदा वाचा…

दिवसरात्र Whats Appवर चॅट करणे हे तर आता प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले आहे. पण जर तुम्हला कोणी सांगितलं की whats appवरून तुम्ही आता म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. तर तुम्हाला ते थोडं वेगळ आणि आश्चर्यकारक वाटले. पण हे खर आहे की, आता Whats Appच्या माध्यमातून तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

अनेकदा सामन्य पद्धतीत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे खूप त्रासदायक असते. यामध्ये अनेक अडचणी येतात. मात्र ही अडचण अ‍ॅक्सिस एएमसी (अ‍ॅक्सिस अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी) ने दूर केली आहे. या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी Whats Appच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा आणली आहे.

नेमकं कशी होणार गुंतवणूक ?

अ‍ॅक्सिस एएमसी गुंतवणूकदार Whats Appच्या माध्यमातून कंपनीच्या म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत SIP किंवा एकरकमी गुंतवणूक करू शकतात. म्युच्युअल फंडाच्या योजनेविषयीची माहिती नंबर रजिस्टर असलेल्या ग्राहकांना Whats Appवर उपलब्ध होणार. जेणेकरुन त्यांना कळेल की, ज्या योजनेत ते गुंतवणूक करीत आहेत त्या योजनेची कामगिरी कशी असेल. यामुळे त्यांना गुंतवणूकीसंबंधित निर्णय घेण्यात मदत होईल. Whats Appच्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची संपूर्ण प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल. यानंतर, गुंतवणूकदारास एक कन्फर्मेशन दिले जाईल.

Whats Appवरुन गुंतवणूक कशी सुरू करावी ?

अ‍ॅक्सिस एएमसीने Whats Appच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या आपल्या गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी ‘7506771113’ हा Whats App नंबर जारी केला आहे. या नंबरवर आपल्याला आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून फक्त ‘हाय’ टाइप करून Whats App करावं लागेल. यानंतर आपली गुंतवणूक प्रक्रिया सुरू होईल.

स्थिती आणि स्टेटमेंट देखील उपलब्ध असेल

अ‍ॅक्सिस एएमसीच्या Whats App चॅटबॉट सेवेमध्ये गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याबरोबरच इतरही अनेक फायदे मिळतात. गुंतवणूकदार ज्या गुंतवणूकीसाठी गुंतवणूक करतात त्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) तपासू शकतात. आपण आपले पोर्टफोलिओ मूल्यांकन देखील शेअर करू शकता. गुंतवणूकदार त्यांच्या SIP (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) व्यवहाराची स्थिती तपासू शकतात, म्हणजेच एसआयपीच्या खरेदी-विक्रीची स्थिती देखील ज्ञात आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या ईमेल आयडीवर अकाउंट स्टेटमेंट मागू शकता.

Whats Appवरही आपण तक्रार करू शकता

जर तुम्हाला फंड हाऊसबद्दल काही तक्रार असेल तर आपण Whats Appद्वारेही हे करू शकता. अ‍ॅक्सिस एएमसीचा असा दावा आहे की गुंतवणूकदारांना रिअल टाइम रिझोल्यूशन मिळते. म्हणजेच तक्रारीवरून त्वरित कारवाई केली जाईल.

 

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here