#Remedice : वजन कमी करण्यापासून ते ब्लड प्रेशरपर्यंत, मनुके ‘या’ आजारांवरही ठरतात उपयुक्त

0

हिवाळ्यात आपल्याला खोकला, सर्दी, घसा खवखवणे आणि ताप यासारखे आजार होतात. कारण हवामान अचानक बदलल्याने अनेक प्रकारचे आजार आपल्याला होतात. तुम्हाला जर या आजारांपासून दूर राहायचे असेल तर आपण कोरड्या द्राक्षाचा म्हणजेच मनुक्यांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे. मनुक्यांमुळे आपल्याला आजारांपासूनआराम तर मिळेलच तसेच वजन आणि त्वचेशी संबंधित समस्या देखील दूर होतील.

सर्दी, टायफाईडसाठी फायदेशीर

आरोग्याच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रात्री 4-5 मनुके दुधात उकळल्यास आणि ते मिश्रण पिल्यास सर्दीपासून आराम मिळतो. तसेच टायफॉइड तापात मनुके खूप फायदेशीर असतात. याचे सतत सेवन केल्याने टाइफाइडच्या समस्येला कायमचा आराम मिळतो.

वजन कमी करते

वाढते वजन कमी करण्यासाठी लोक महागडा डाएट करतात. यानंतरही त्यांचे वजन कमी होत नाही. मात्र मनुके शरीरातील उपस्थित चरबीच्या पेशी कापून वजन कमी करण्यात प्रभावी आहेत. मनुक्यांमुळे केवळ वजन कमी होत नाही तर त्यामध्ये असलेल्या ग्लूकोजमुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते.

हाडे मजबूत करते

जेव्हा फ्री रॅडिकल आपल्या शरीरातील इलेक्ट्रॉनशी जोडले जाते तेव्हा यामुळे बऱ्याच पेशी, प्रोटीन आणि डीएनएचे नुकसान होते. मनुक्यांमध्ये आढळणारा कॅटेचिन ही समस्या मुळापासून दूर करते आणि शरीराचे अवयव अबाधित ठेवतो. तसेच दुधात असलेले लैक्टसही हाडे मजबूत करते पण बरेच लोक दूध पिण्यास नकार देतात अशा लोकांनी मनुके खावेत. त्यात असलेले कॅल्शियम तुमची हाडे मजबूत करेल.

तणाव कमी करते

आरोग्यासाठी उपयुक्त असलेले मनुके तणाव देखील कमी करू शकतात. त्यामध्ये असलेल्या आर्जिनाईनचे नियमित सेवन केल्यास तुमचा ताणतणाव हळूहळू कमी होण्यास सुरवात होईल. सकाळच्या आहारामध्ये मनुके खाण्याबरोबर थोडे मेडिटेशन केल्याने आपल्याला अधिक लाभ होईल.

त्वचा सुधारते

डिप फ्राय किंवा जंक फूड खाल्ल्याने आपल्या त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर आपण आपल्या आहारात चांगल्या गोष्टींचा समावेश केला तर आपली त्वचा बर्‍याच काळासाठी चमकेल. अशावेळी मनुके आपल्या त्वचेची संपूर्ण पोत आणि लवचिकता सुधारते. जर डोक्याच्या खराब त्वचेमुळे आपण केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर मनुके आपल्याला उपयुक्त ठरू शकतात.

ब्लड प्रेशर नियंत्रित करते

कमकुवत जीवनशैली आणि खाण्याच्या वाईट सवयीमुळे लोकांनाउच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशरच्या समस्या येऊ लागल्या आहेत. दर वर्षी लाखो लोक या आजारामुळे मरतात. सध्या कमी वयाचे पेशंटही उच्च रक्तदाबाचा बळी ठरत आहेत. मनुके शरीरात रक्त परिसंचरण नियंत्रित करून आपण उच्चरक्तदाबाच्या आजारापासून दूर राहू शकता.

पोटाचे विकार दूर करते

मनुके बद्धकोष्ठतासारख्या समस्यांमध्ये खूप फायदेशीर आहेत. ते खाल्ल्याने पोटासंबंधित आजार होण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. ज्या लोकांना पोटाची समस्या आहे त्यांनी सकाळच्या आहारात मनुके नक्की खावीत.

Leave A Reply

Your email address will not be published.