fbpx
2.8 C
London
Monday, February 6, 2023

#Maggi : …असा आहे मॅगीचा इतिहास ! ‘या’ देशात मॅगीमुळे महिलांना करता आली नोकरी

“आई भूक लागली आहे, काही तरी गरम गरम खायला करून दे ना लवकर.” असे तुमच्या मुलांनी म्हटल्यावर तुमच्या डोळ्यापुढे झटपट दोन मिनिटात तयार होणारे ‘मॅगी नूडल्स’ येतात. आज भारतीय मुलांची मॅगी ही फेव्हरेट डिश झालेली आहे. भारतात मॅगीला फक्त लहान मुलांकडूनच नाही तर तरुणाईकडून सुद्धा भरपूर पसंती दर्शवली जात आहे. पण या मॅगीचा तुम्हाला इतिहास माहिती आहे का? नाही तर चला मग करूयात एक छोटासा परिचय मॅगीच्या इतिहासाबरोबर….

Julius Maggi

मॅगी बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव ‘जूलियस माइकल जोहानस मॅगी‘(Julius Michael Johannes Maggie) असे होते. ते स्वित्झर्लंडमधील रहिवासी होते. त्यांच्याच नावावर तुमच्या फेव्हरेट 2 minuts noodles ला मॅगी असे नाव पडले. ज्युलियस माइकल आपल्या वडिलांच्या आटा फॅक्टरीमध्ये काम करीत असत. पण त्यांची फॅक्टरी हवी तशी चालत नव्हती. तेव्हा 1886 मध्ये त्यांनी विचार केला की, ते झटपट तयार होणारा एखादा फूड आयटम बनवला पाहिजे. हा तो काळ होता जेव्हा स्वित्झर्लंडच्या मिल उद्योगाची परिस्थिती खूप हलाखीची होती. म्हणूनच जुलियसने एका Fridolin Schuler नावाच्या चिकित्सकबरोबर रेडिमेड फूड बनवायला सुरुवात केली. बस्स.. इथूनच मॅगीची सुरुवात झाली.

1897 मध्ये सगळ्यात आधी मॅगी नूडल्स जर्मनीमध्ये आणले गेले. या पदार्थाला वर्कींग क्लास लोकांसाठी बनवले होते. स्वित्झर्लंडच्या सरकारने मॅगीला पाठींबा दिला. या फूड प्रोडक्टच्या मदतीने सरकार महिलांना बाहेर निघून काम करावे म्हणून प्रोत्साहन देत होते. त्यावेळी महिलांनी नोकरी करायला नुकतीचं सुरुवात केली होती. या नंतर निरनिराळ्या प्रकारचे झटपट तयार होणारे सूप मार्केटमध्ये आणले गेले. सुप्स सुद्धा मॅगीइतकेच सर्वांचे फेव्हरेट झाले. आता मॅगी एक प्रसिद्ध ब्रँड झाला. मॅगीची प्रगती बघता पॅरिस, बर्लिन, सिंगेन, अमेरिका, लंडन इ.मध्ये मॅगीची विक्री सुरू झाली.

_Maggi

1983मध्ये भारतात मॅगीचे आगमन

1947मध्ये नेस्ले इंडीया या भारतीय कंपनीने मॅगीचे अधिग्रहण केले. नेस्ले कंपनीने भारतात मॅगी आणली. ज्या वर्षी भारताने वर्ल्ड कप जिंकला त्याच वर्षी भारतात मॅगी आली. इन्स्टंट नुडल्सच्या या कन्सेप्टला भारतीय लोकांनी आधी नापसंती दर्शवली. पण काळ बदलत गेला आणि भारतात फास्ट फूडचे कल्चर सुरू झाले. यामध्ये मॅगीने सुद्धा भारतीयांच्या मनात आपली जागा बनवली. आता भारतीय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये मुलं आपल्या आईला त्यांची आवडती मॅगी पॅक करून द्यायला नेहमी सांगतात. पावसात बाल्कनीमध्ये बसून गरम गरम मॅगी नुडल्सचे स्वाद घेण्याची मज्जा तर काही ओरचं आहे.

हे पण वाचा

#No_Car : एका शहराच्या महापौराने लढवली शक्कल आणि शहरला बनवलं वाहनमुक्त

#Biryanilover :…म्हणून सातासमुद्रा पारही भारतातील ‘या’ बिर्याणीच्या प्रकारांची होते चर्चा

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here