क्षुल्लक चुकांमुळे गमावून बसाल नोकरी, इम्प्रेसिव्ह रेज्यूमे बनवताना घ्या ही काळजी

0

कोणत्याही मोठ्या कंपनीमध्ये किंवा कॉर्पोरेट ठिकाणी आपल्याला नोकरी मिळवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या रेज्यूमेची मागणी केली जाते. रेज्यूमे कसा आहे यावरून आपले परीक्षण केले जाते. बरेचदा आपल्याकडे ज्ञान भरपूर असते माहिती देखील पुष्कळ असते मात्र ती व्यवस्थितपणे मांडता येत नसल्याने आपल्या माहितीचा आणि ज्ञानाचा शून्य उपयोग होतो. हाच दोष आपल्याला दूर करण्यासाठी काही छोट्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

नोकरीसाठी अर्ज करताना तो कसा असावा ? रेज्यूमेमध्ये कोणत्या बाबी असाव्यात ? कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ? याबाबत आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. रेज्यूमे हा आपल्या व्यक्तिमत्वाची समोरच्यावर प्रथम छाप पाडत असतो. त्यामुळे तो व्यवस्थित सहज सोपा सुटसुटीत आणि परिपूर्ण असावा.

आपण देखील नवीन नोकरी शोधत असाल तर आपण आपल्या रेज्यूमेमध्ये काही महत्वाचे बदल केले पाहिजेत. आज या लेखात, मी तुम्हाला रेझ्युमे मजबूत आणि प्रभावी बनविण्याबद्दल काही खास मुद्दे सांगणार आहे.

दोन पानांचाच रेज्यूमे असावा…

Resume 2

अनेकदा काहीजण रेज्यूमे हा दोन पेक्षा अधिक पानाचा करतात. आवश्यकता नसतानाही भरमसाठ माहिती नमूद केलेली असते. जेवढी पाने जास्त तेवढा रेज्यूमे प्रभावी हा गैरसमज सर्व प्रथम दूर केला पाहिजे. रेज्यूमे हा जास्तीत जास्त 2 पानांचा असावा. कारण वाचणारा हा पहिले पानच लक्ष देऊन वाचतो. पहिल्या पानावरचं योग्य ती माहिती भरावी. जेणेकरून वाचणाऱ्याला दुसरे पान उघडण्याचीही गरज पडत नाही. स्वतः विषयीची पूर्ण माहिती आणि आपल्या जवळ असलेल्या कौशल्यांचा आढावा हा अगदी थोडक्यात आणि सहज शब्दात मांडावा. ज्यामुळे रेज्युमे समोरच्याला प्रभावी वाटतो.

रेज्यूमेमध्ये आणा क्रिएटिविटी

Resume 3

रेज्यूमेमध्ये क्रिएटिविटी ही आवश्यक असते. आताच्या काळात इंटरनेटवर आपल्याला वेगवेगळे रेज्यूमेचे पॅॅटर्न पाहिला मिळतात. प्रत्येकजण हा आपल्या रेज्यूमेमध्ये माहिती देत असतो. मात्र तीची रचना कशा क्रिएटिव पद्धतीने केली आहे, हे देखील तुमच्या रेज्यूमेमध्ये पाहिले जाते. त्यामुळे जर आपल्याला काही क्रिएटिविटी सुचत नसेल तर आपण जरूर काही वेबसाईटच्या मदतीने आपल्या नोकरीच्या पदानुसार आणि क्षेत्रानुसार क्रिएटिविटी रेज्यूमे बनवावा.

ईमेल आयडी जरूर लिहा

Resume 4

प्रभावी आणि क्रिएटिविटी रेज्यूमे बनवतानाचं आपण काही बारीक गोष्टींकडेही लक्ष द्यावे. बरेचजण रेज्यूमेमध्ये बाष्कळ माहिती नमूद करतात. मात्र महत्वाचा ईमेल आयडी आणि पर्यायी फोन नंबर नमूद करत नाहीत. या बारीक गोष्टी देखील तुमच्या रेज्यूमेवर परिणाम करतात. सध्याच्या काळात प्रोफेशनली संदेशाची देवाण घेवाण ही मेलवरून केली जाते. त्यामुळे तुमचा मेल आयडी रेज्यूमेमध्ये असलाच पाहिजे. तसेच तुमचा रोजच्या वापरातील फोन नंबर व्यतिरिक्त पर्यायी दुसरा फोन नंबरही द्यावा, जेणेकरून तुम्ही इंटरव्हिवसाठी सिलेक्ट झाला असाल तर ते आपल्याला कळवू शकतील.

रेफ्रन्सही आहे आवश्यक

Resume 5

आपण ज्या नोकरीसाठी अर्ज करीत आहात अशा उद्योगात किंवा कंपनीमध्ये आपली काही ओळख असल्यास, आपण तिथला रेफ्रन्सही नमूद करू शकता. मर्यादित जागेच्या रेज्यूमेमध्ये आपण आपल्या कन्टेन्टमध्ये समाधानी होईपर्यंत सुधारणा करू शकता. मात्र त्याला क्लिष्ट करू नका… त्याची रचना सुटसुटीतच ठेवा.

वरील बाबी तुम्हाला किरकोळ वाटतील पण त्याचे महत्व हे खूप मोठे आहे. छोट्या छोट्या चुकांमुळे तुम्हाला नाकारले तर त्यासारखी शरमेची दुसरी गोष्ट नाही. अशा बारीक चुकांमुळे आपले नोकरीतील सिलेक्शन थांबू नये यासाठी आपण रेज्यूमे कसा बनवायचा याबाबत आणखी जाणून घ्या. आजच्या इंटरनेटच्या काळात काही अशक्य नाही. हवी ती माहिती आपल्याला अगदी सहजपणे इंटरनेटवर उपलब्ध होत असते. ती माहिती वाचण्याचे केवळ परिश्रम घ्या….

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.