अजूनही काही कुटुंबात मुलीचा जन्मानंतर नाराजी व्यक्त केली जाते. अनेक पालकांना आपल्या मुलीच्या भविष्याबाबत चिंता असते. मुलीला शिकवायचे कसे ? तिचा उच्च शिक्षणाचा खर्च कसा करायचा ? लग्नाचा खर्च कसा करायचा ? असे अनेक प्रश्न पडतात. मात्र आता हीच मुलगी पालकांसाठी वरदान ठरणार आहे.
मुलीच्या बाबतीत पालकांना पडणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तरं एका योजनेत दडली आहेत. केंद्र सरकारकडून आणण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींच्या पालकांची चिंता आता मिटली आहे. या योजनेमुळे मुलगी अवघ्या 21 व्या वर्षीच करोडपती होणार आहे…
काय आहे सुकन्या समृद्धी योजना ?
बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेंतर्गत सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) ही मुलींसाठी केंद्र सरकारची एक लहान बचत योजना आहे. लहान बचत योजनेतील सुकन्या योजना ही सर्वोत्तम व्याज दर योजना आहे.
सन 2016 – 17 मध्ये एसएसवायमध्ये 9.1 टक्के व्याज दिले जात होते, जे आयकर सूट आहे. यापूर्वीही यात 9.2 टक्के व्याज मिळाले होते.
ही योजना अल्प वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना विचारात घेऊन तयार केली आहे. त्यामुळे भविष्यातील मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च पालकांना या योजनेच्या मदतीने सहजरित्या करता येईल.
अनेकांचे असे मत आहे की, ‘ज्यांना उत्पन्न कमी आहे आणि ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूकीवर विश्वास नाही अशा लोकांसाठी सुकन्या समृद्धी योजना ही एक चांगली योजना आहे. निश्चित उत्पन्नासह भांडवलाची सुरक्षा ही या योजनेचे वैशिष्ट्य आहे.
एखाद्या आई-वडिलांनी मुलीचे वय एक वर्ष असताना प्रत्येक महिन्याला या योजनेत 12 हजार 500 रुपये जमा केले तर वर्षाला 1.5 लाख इतके होतात. मुलीचे वय 21 वर्ष होईपर्यंत 63.7 लाख रुपये जमा होतील. यातील 22.5 लाख ही तुमची गुंतवणूक असेल तर 41.49 लाख हे व्याज असेल. म्हणजेच यातील 35.27 टक्के रक्कम ही तुमची गुंतवणूक रक्कम तर 64.73 टक्के रक्कम ही व्याज आहे. याच हिशोबाने आई-वडील दोघांनीही मुलीसाठी गुंतवणूक केल्यास २१व्या वर्षी मुलीसाठी 1.27 कोटी रुपये इतकी रक्कम तुमच्या हाती मिळू शकते.
सुकन्या समृद्धी योजना खाते कसे उघडावे?
या योजनेत खाते मुलीच्या जन्मानंतर ती 10 वर्षाची होईपर्यंत कधीही उघडता येते. मात्र 10 वर्षाच्या पुढे गेल्यावर ही योजना लागू होत नाही. हे खाते उघडताना 250 रुपये ते 1.50 लाख पर्यंत रक्कम जमा करता येते.
सुकन्या समृद्धी योजना खाते कोठे उघडले जाईल?
सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत कोणत्याही डाकघर (पोस्टात) किंवा व्यावसायिक शाखेत अधिकृत शाखेत खाते उघडता येते.
सुकन्या समृद्धी योजना खाते किती काळ चालणार?
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यानंतर ही मुलगी 21 वर्षे वयापर्यंत किंवा तिचे लग्न 18 वर्षानंतर होईपर्यंत चालविली जाऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजनेचा उपयोग काय आहे?
सुकन्या समृद्धी योजनेनंतर 18 वर्षांच्या वयानंतर मुलाच्या उच्च शिक्षणासाठी 50% पर्यंत रक्कम काढता येऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
सुकन्या समृद्धी योजना उघडण्याच्या वेळी, मुलीचा जन्म प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस किंवा बँकेला देणे आवश्यक आहे. यासह, मुलाची ओळख आणि पत्त्याचा पुरावा देखील देणे आवश्यक आहे.