आपल्यापैकी असे बरेच लोक आहेत ज्यांना मासे खायला प्रचंड आवडते. काहींना फ्राय केलेले मासे काहींना मसालेदार माशांची भाजी आणि भट खायला खूप आवडतो. तुम्हालाही मासे खाण्याची आवड असेल तर त्याचा काटा तुमच्या गळ्यात कधीना कधी नक्कीच अडकलेला असेल. अशा परिस्थितीत आपल्याला जेवण करायला त्रास होतो. तसेच घशात जखमही होते. तुमच्याबरोबरही असे होत असेल आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत जे तुमच्यासाठी उपयोगी ठरतील.
खोकून काटा बाहेर काढा
काटा अडकल्यानंतर आपण ताबडतोब काही करू शकतो ते म्हणजे जोरात खोकी शकतो. बर्याचदा जोरात खोकतो तेव्हा माशाचा काटा पुढे सरकणे थांबतो. याशिवाय जोरात खोकल्यामुळे स्नायूंना ताण येतो आणि काटा बाहेर येतो.
ऑलिव ऑइल
घशात अडकलेला काटा काढण्यासाठी आपण ऑलिव्ह ऑईल देखील वापरू शकता. जर ऑलिव्ह ऑईलचा एक चमचा हळूहळू तोंडातून घशात टाकला तर काटा बाहेर येऊ शकतो. तेल काट्याला स्नायूंपासून विभक्त करतो. म्हणून या तेलाचा वापर करून आपण अडकलेला काटा बाहेर काढू शकतो.
व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण
आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की व्हिनेगर माशाचा अडकलेला काटा काढण्यात देखील खूप मदत करतो. व्हिनेगर आणि पाणी एकत्र करून पिल्याने घशात हा काटा हळू हळू खाली सरकू लागतो. त्यामुळे आपला त्रास कमी होतो.
भात आणि केळी
जर आपल्या घशात माशाचा काटा अडकला असेल तर आपण भातमध्ये थोडे तूप मिसळून ते गोल बनवून गिळले पाहिजे. हे 3-4 वेळा केल्यावर, काटा आपल्या भातासह पोटामध्ये जाईल आणि घसा खवखवणे देखील थांबेल. याशिवाय तुम्ही केळीचाही अशाच प्रकारे वापरु शकता. जर तुम्ही केळ चावण्याऐवजी गिळले तर काटा सहज पोटात जातो.
ब्रेड आणि पाणी
जेव्हा आपण ब्रेड कोमट पाण्यात बुडवून न चघळता गिळता तेव्हा ते काटा पोटात खेचते. पाण्यात टाकताच ब्रेड फुगण्यास सुरवात होते त्यामुळे काटा घश्यात अडकून राहत नाही.