लिव्ह इन रिलेशनशिप आज वेगाने वाढत आहे. एक काळ असा होता की, लोकांना अशा संबंधांवर उघडपणे बोलणे आवडत नव्हते. परंतु आज लोक उघडपणे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि या गोष्टी जगजाहीर सुद्धा करतात. लिव्ह इन रिलेशनशिपचे काही फायदे आहेत, तर त्याचे काही तोटे देखील आहेत. म्हणजेच, प्रत्येक नाण्याला नकारात्मक आणि सकारात्मक पैलू असल्यामुळे या नात्यातही काहीतरी असेच असते. चला तर लिव्ह इन रिलेशनशिपचे पैलू जाणून घेऊयात…
लिव्ह इन रिलेशनशिपचे फायदे..
- लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये फसवणूक, कपट आणि व्यभिचार होण्याची शक्यता कमी आहे.
- या नात्यात असताना आपण आपल्या पार्टनरसोबत वैवाहिक बंधन जुळवून आणू शकता.
- दोन्ही पार्टनर आपल्या जबाबदाऱ्या कुठल्याही दबावशिवाय पार पाडू शकतात.
- या नात्यात दोघे कुठल्याही दबावाखाली राहत नाही. ते दोघेही स्वतंत्र असतात.
लिव्ह इन रिलेशनशिपचे नुकसान..
- लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये बंधनात न अडकण्याची तर स्वतंत्रता असते. पण जीवनात पूर्णपणे एन्जॉय करू शकत नाही. कारण यात अविश्वासाची भावना येण्याची भीती असते.
- त्या दोघांमधील वचनबद्धता भंग होण्याच्या भीती असते.
- तुमचा जोडीदार तुम्हाला सोडणार तर नाही अशी भीती नेहमी मनात कायम राहते, ज्यामुळे तणावाची परिस्थिती देखील उद्भवते.
- एकमेकांची कार्यशैली किंवा संस्कृती न समजल्यामुळेही समस्या उद्भवतात.
- लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आपण कौटुंबिक आनंद घेऊ शकत नाही. सुरुवातीस, आपण प्रेमाने आणि भावनिकरित्या कनेक्ट व्हाल परंतु हळूहळू ते कमी होऊ लागते ज्यामुळे कंटाळा येणे सुरू होते.
हे पण वाचा
- नेहमीचं उत्साहात दिसणाऱ्या सनी लिओनीचा असा आहे फिटनेस; फॉलो करा तिचे डेली रुटीन
- …म्हणून मच्छर पितात मानवाचे आणि जनावरांचे रक्त, संशोधनातून मोठा खुलासा
- आज्जीचा बटवा: जाणून घ्या, घरी सहज उपलब्ध असलेल्या बहुगुणी जिऱ्याचे आरोग्यादायी फायदे….
- आज्जीचा बटवा : टोमॅटोचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?