fbpx
5.9 C
London
Tuesday, December 6, 2022

आज्जीचा बटवा: बीटरूट खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, तुम्हीही घ्या जाणून ….

मैत्रिणींनो लहानपणी आई तुम्हाला लिपस्टिक लावू द्यायची नाही. कारण रसायनयुक्त लिपस्टिक तुमच्या ओठांच्या नाजूक त्वचेसाठी घातक आहे. म्हणून तुम्ही बीटरूट ओठांवर घासून ओठ लाल करायचे, हो ना. बीटरुटचे जूस तुमच्यासाठी नॅचरल लिपस्टिकचे काम करायचे. तसेच आता पण तुम्ही बघत असाल, की होममेड लिपबाम बनवतानासुद्धा बीटरूटचे जूस उपयोगात आणतात. सौंदर्यासाठी बीटरूटचे फायदे तर आम्ही तुम्हाला सांगणारचं आहोत. पण यासोबतच आज्जीच्या बटव्यात आम्ही तुम्हाला बीटरूटच्या आरोग्यदायी फायद्यांबाबतही माहिती देणार आहोत.

बीट हे एक प्रकारचे अन्न साठवणारे मुळ आहे . ह्यापासुन लोह मोठया प्रमाणात मिळते. अमेरिकेत यापासून  साखर मिळवतात. बीट या वनस्पतीचा समावेश एमरँटेसी फॅमिलीमध्ये होत असून तिचे शास्त्रीय नाव ‘बीटा व्हल्गॅरिस’ आहे. भाजीचे बीट म्हणजे टेबल बीट आणि साखरेचे बीट म्हणजे शुगर बीट हे प्रकार व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. बीट लोह, विटामिन आणि मिनरल्सचे चांगले स्त्रोत आहे. म्हणून बीटचे औषधीय उपयोग जास्त केले जातात.

इतर उपयोग :

 • बीटपासून नैसर्गिक रंग तयार केला जातो. हा नैसर्गिक रंग त्वचेला घातक नसतो.
 • बीटाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. साधारणतः बीटाची कोशिंबीर करतात.
 • अनेक ठिकाणी बीटच्या जड़ांना कच्चे, उकळून किंवा भाजून खाल्ले जाते. बीटचे लोणचे ही टाकतात.

आरोग्यदायी फायदे :

 • बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. गाजर आणि बीटचा 1-1 कप रस पिल्याने याचा मोठा फायदा होतो. ब्लडप्रेशर असलेल्या व्यक्तींना बीट नेहमी खायला द्या.
 • रोज सकाळी 1 कप बीटचा रस प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या देखील दूर होते. रोज 30 ग्रॅम बीट खाल्यामुळे लीव्हरची सूज देखील कमी होते.
 • बीट कॅल्शिअमची पूर्तता करतो. कॅल्शिअम शरिरासाठी महत्त्वाचं तत्व आहे. कॅल्शिअममुळे हाडे आणि दात मजबूत होतात. मुलांनी आणि युवकांनी बीट चाऊन खाल्ल पाहिजे. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात.
 • बीटमुळे कफ होण्याची समस्या दूर होते. बीट श्वसननलिका स्वच्छ ठेवते.
 • बीटच्या रसामध्ये मध टाकून शरीरावर खाज येते त्या ठिकाणी लावल्याने ही समस्या दूर होते.
 • दोन चमचे बीटचा रस आणि मध एकत्र खाल्याने गॅसची समस्या दूर होते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोटाशी संबंधिस समस्या दूर होतात.
 • बीटमध्ये फॉलिक एसिड असतं. जे गर्भवती महिला आणि गर्भात असलेल्या बाळासाठी फायदेशीर असतं. बीटमुळे महिलांना ऊर्जा मिळते.
 • मासिक पाळी जर नियमित येत नसेल आणि यावेळी त्रास होत असेल तर बीट खाल्ल्याने त्यापासून सूटका होते. रक्त वाढवण्यात बीट फायदेशीर आहे.

सौंदर्यासाठी फायदे :

 • बीटामध्ये असणारं फॉस्फरस हे केसांच्या वाढीसाठी चांगले आहे. खरंतर केसांच्या वाढीसाठी बीट हा नैसर्गिक सोर्स आहे. पण बऱ्याच जणांना हे माहीत नसतं. तुम्ही नियमित बीट आपल्या जेवणामध्ये खाल्लं अथवा बीटाचा जूस रोज प्यायलात तर तुमच्या केसांच्या वाढीसाठी याचा फायदा होतो.
 • केवळ केसच नाही तर त्वचेवर रंगत आणण्यासाठीही याचा फायदा होतो. बीट खाल्ल्याने तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. यात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स तुमची त्वचा अधिक सुंदर दिसण्यासाठी आणि अधिक उजळण्यासाठी मदत करतात.

(टीप: बीटरूटचे सेवन एका विशिष्ट मात्रेत केल्यानेच त्याचे फायदे होतात. यासाठी वरील उपचार हे  अनुभवी  किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने करावे.)

हे पण वाचा

लसूण आणि मध तुमच्या आरोग्यासाठी आहे लाभदायक, ‘या’ समस्या चुटकीसरशी होतील दूर

आज्जीचा बटवा : गवती चहा आहे खूप गुणकारी, ‘या’ आजारांवर ठरतो उपयोगी

आजीचा बटवा : पानपुड्याची शोभा वाढवणारा ‘ओवा’ आहे आरोग्यदायी, जाणून घ्या फायदे…

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here