वाचनासाठी घरात मनासारखी जागा नाही, ‘या’ पद्धतीने तयार करा वाचनासाठी सुंदर बाल्कनी

0

लॉकडॉऊनमध्ये वाचनप्रेमींसाठी मात्र एक गोष्ट छान झाली. ज्यांना वाचायला आवडते पण कामामुळे त्यांना वाचन करायला मिळत नाही, या काळात भरभरून पुस्तकं वाचण्याची त्यांना संधी मिळाली. अस म्हणतात, वाचन करायला बसलं की जागेच-वेळेचं भान राहत नाही. पण असे सर्वांसोबतच होईलचं असे नाही. काहींना शांत ठिकाणी बसून वाचायला आवडते. तर काहींना निसर्गाच्या सानिध्यात पुस्तक वाचावयास आवडते. पण शहरात असं निसर्गरम्य वातावरण घरी फक्त बाल्कनीमध्ये असू शकते. कारण बाल्कनीमध्ये तुम्ही निरनिराळ्या पद्धतीने सजावट करता. छान हिरवी फुलांची झाडे असतात, आवडीनुसार छोटे झरे लाऊन तिथे निसर्गरम्य वातावरण तयार केलेलं असते. म्हणून चला तर जाणून घेऊयात, वाचन करण्यासाठी बाल्कनीला परफेक्ट कसे बनवाल…

पाळणा

बाल्कनीमध्ये पुस्तक वाचण्याची मजा काही औरच असते. पण साध्या खुर्चीवर बसून जास्त वेळ वाचन करणे शरीरसाठी मात्र कठीण होऊन बसते. म्हणून तुम्ही बाल्कनीमध्ये वाचन करण्यासाठी छोटा झोपाळा लावू शकता. यामुळे वाचन करताना तुम्ही छान झोके घेत वाचनाचा आनंद लुटू शकता. पाळण्यावर आरामदायक वाचन करण्यासाठी छान लाईट कलरच्या स्पॉंजी गाद्या आणि टेकायला छोटे कुशन ठेवा.

swing

आरामखुर्ची

पाळण्याप्रमाणेच आरामखुर्चीवर शरीर रिलॅक्स करून वाचन करणे, हे ऐकूनच खूप सुखदायक वाटत आहे. बाल्कनीमध्ये छान आरामखुर्ची ठेऊन तुम्ही वाचन करू शकता. वाचन करताना झोप येणे, हे साहजिकच आहे. त्यामुळे तुम्ही त्यावर छोटीशी झोपही घेऊ शकता. उठल्यानंतर तुमच्या शरीरात क्रॅम्प्स देखील जाणवणार नाही.

Relax Chair

प्लांट हँगर/ प्लांट स्टँड

बाल्कनीमध्ये फुलवेलींची किंवा शोसाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या वेली तुम्ही प्लांट हँगर/प्लांट स्टँड मध्ये लावू शकता. हँगरमधून/स्टँडमधून त्या वेलींची आरामखुर्चीच्या किंवा पाळण्याचा एका कडेला तुम्ही सजावट करू शकता.

Plant Hanger

बुकस्टँड

बाल्कनीमध्ये वाचन करणं आता तुमच्या सवयीचा भाग झाला आहे. तर तुम्ही आपला बुकस्टँड बाल्कनीमध्ये लावू शकता. या बुकस्टँड वर एक दोन फुलझाडे ठेवा, तुमच्या आवडत्या वस्तू किंवा वाचन करताना चहा कॉफी पित असल्यास मग ठेवायलाही काही हरकत नाही. यामुळे बाल्कनीच्या सौंदर्यात आणखी भर पडेल.

Book stand

लॅम्प

रात्री तुम्हाला झोप येत नाही आहे. पुस्तक वाचून रात्री झोप लवकर येते असं म्हणतात. पण तुम्हाला तुमच्या आवडत्या जागी बाल्कनीमध्ये जाऊन वाचायचे आहे. तर तुम्ही छान प्रकाश देणारा एक छोटा लॅम्प बाल्कनीमध्ये ठेवा. यामुळे तुम्ही रात्रीदेखील वाचनाचा आनंद अगदी सहजतेने घेऊ शकता.

Lamp

लाईटिंग सिरीज

रात्री बाल्कनीचे सौंदर्य वाढवण्यासाठी लाईटिंग सिरीज लावणे, ही एक उत्तम कल्पना आहे. यामुळे बाल्कनीची सुंदरता आणखी वाढते आणि छान वातावरण तयार होतो. लाईट कलरच्या लाईटिंग सिरीज रात्री खूप सुंदर दिसतात.

lightning series

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.