‘ही’ आहे चॉकलेटची राजधानी, ‘या’ देशात उघडले जगातील सर्वात मोठे चॉकलेट म्युझिअम…

0

आपण देशापासून ते परदेशापर्यंत अनेक प्रकारची संग्रहालये वाचली व पाहिली आहेत. कधीकधी असे कळते की, काही देशात पाण्याच्या आत म्हणजेच अंडरवॉटर संग्रहालय आहे, नंतर कुठल्या तरी देशात शौचालय संग्रहालय आहे, कधी कधी तळघरात जगातील एक अद्वितीय संग्रहालय आहे, पण आपण कधी चॉकलेट संग्रहालयाबद्दल ऐकले आहे का? होय, अलीकडेच जगातील सर्वात मोठे चॉकलेट संग्रहालय चॉकलेट प्रेमींसाठी उघडले आहे. स्वित्झर्लंडमध्ये हे सर्वात मोठे संग्रहालय उघडण्यात आले आहे. चला तर अधिक माहिती जाणून घेऊयात या चॉकलेट संग्रहालयाबद्दल-

Chocolate 3

स्वित्झर्लंडमध्ये उघडलेले हे चॉकलेट संग्रहालय ‘लिंट होम ऑफ चॉकलेट‘ म्हणून देखील ओळखले जाते. हे संग्रहालय 65 हजार चौरस फूट भागात पसरलेले आहे. या संग्रहालयात आपल्याला चॉकलेटपासून बनविलेले सर्व काही दिसेल. एवढेच नाही तर या संग्रहालयात सुमारे 30 फूट उंचीचा कारंजा म्हणजेच फाउंटन आहे जो चॉकलेटच्या आकाराचा बनविला गेला आहे आणि हे आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे.

13 सप्टेंबर रोजी हे चॉकलेट संग्रहालय लोकांसाठी उघडण्यात आले. जगातील महान टेनिसपटू ‘रॉजर फेडरर’ या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. हे चॉकलेट संग्रहालय स्वित्झर्लंडच्या ज्यूरिख शहरात उघडण्यात आले आहे. जेव्हापासून येथे संग्रहालय उघडले, तेव्हापासून हे स्थान चॉकलेटची राजधानी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

Chocolate 2

या शहरात सर्वाधिक आणि टेस्टी क्वॉलिटीच्या चॉकलेटचे उत्पादन होते, म्हणून हे संग्रहालय इथे तयार केले गेले आहे. आपल्याला चॉकलेटचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर स्वित्झर्लंडमधील हे चॉकलेट संग्रहालय योग्य स्थान आहे .असे म्हटले जाते की, संग्रहालयात लोकांना चॉकलेट बनविण्याची सुद्धा संधी मिळेल. संग्रहालयात येणारे विझिटर्स त्यांच्यासोबत काही गिफ्ट्स देखील घेऊन जाऊ शकतात. येथे आपल्याला आवडती चॉकलेट कॉफी देखील मिळेल. आपल्याला टेस्टी चॉकलेट खाण्याची इच्छा असल्यास आणि त्याबद्दल बारकाईने जाणून घ्यायचे असल्यास आपण एकदा या संग्रहालयास नक्की भेट द्यावी.

हे पण वाचा

‘या’ आहेत भारताच्या पॉवरफुल वूमन, उद्योगात मोठा नफा मिळवून देशाच्या अर्थव्यस्थेला लावला हातभार

तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, टपाल खात्यात 1371 पदांसाठी भरती, असा करा अर्ज

जाणून घ्या ! त्वचेला तरूण ठेवणारे कोलेजन नेमकं आहे तरी काय ? शरीरात त्याची मात्रा कशी वाढवाल…

Leave A Reply

Your email address will not be published.