fbpx
3.5 C
London
Wednesday, December 7, 2022

निखळ हसायला लावणाऱ्या कार्टून्सचा असा आहे इतिहास, ज्यांनी केले जगाला तणावमुक्त

टिवल्या बावल्या करणारे कार्टून पाहिला कोणाला आवडत नाही. 1990च्या दशकात भारतात टीव्हीवर आलेल्या कार्टून्सने नाही म्हंटल तरी शहरात राहणाऱ्या मुलांना वेड लावले होते. टॉम अंड जेरी मधील मैत्री, पोपयची पालक खाऊन येणारी ताकद, स्कूबी डूबी डू मधील थरारक आव्हाने, पोकीमोन मध्ये पिकाचू हे अंतिम शस्त्र, ऑस्वल्ड आणि विनीचे अतूट नात, नॉडीची गाडी, बॉब द बिल्डरचा घाबरट रोलर, असे अनेक कार्टून आजूनही 1990च्या दशकातील मुलांच्या स्मरणात आहेत. केवळ मुलांच्याचं नाही तर पालकांच्या देखील आयुष्याचा ते भाग बनले होते. वर-वर मुलांना रागवून काही पालक स्वतः देखील या छोट्या पडद्यावरील विचित्र हालचालींचा आनंद घेत होते. मात्र आता इंटरनेटच्या जगात या कार्टून्सने आपला खट्याळपणा आणखी वाढवला आहे. त्यामुळे हे कार्टून विश्व नेमकं आहे तरी काय आणि याची सुरवात नेमकी झाली कशी ?

काही प्राचीन भिंतींंवरील कोरीव चित्र पाहिली असता आपल्या लक्षात येईल की, मानव पहिल्यापासूनच आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी चित्राचा वापर करत असे. त्यात तो काही अवास्तव कल्पना करून आपले चित्र रेखाटत असे. कालांतराने हीच अवास्तव चित्र कागदावर येऊ लागली. जे भविष्यात व्यंगचित्र आणि अ‍ॅनिमेशन म्हणून विकसित झाले.

व्यंगचित्राचा उदय

17 व्या शतकादरम्यान, आधुनिक व्यंगचित्रांच्या (कार्टून) मूळ गोष्टी व्यंगचित्र म्हणून सुरू झाल्या. लिओनार्डो दा विंची आणि लोरेन्झो बेनिनी यांच्यासारख्या कलाकारांनी त्यांच्या विषयातील वैशिष्ट्यांना निश्चित आकार आणि स्वरुप देण्यासाठी व्यंगचित्रांचा वापर केला. तथापि, विल्यम होगर्थ यांनीच चित्रमय व्यंग विकसित केले जे राजकीय आणि संपादकीय व्यंगचित्रांच्या विकासाचे अग्रदूत बनले.

याच काळात व्यंगचित्रकारांनी एक चंचल आणि लहरी पात्रंं आपल्या चित्रातून समजासमोर आणली. त्यानंतर सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक भविष्यात होणाऱ्या बदलांचा वेध घेऊन व्यंग चित्र रेखाटली गेली. त्याला उपहासात्मक शैली देण्यात आली. ज्यामुळे समाजात विनोद निर्माण झाला. याच व्यंग चित्रांचा वापर फ्रेंच राज्यक्रांतीत देखील झाला. या काळात व्यंगचित्रकारांनी त्यांची निर्मिती उपहासात्मक प्रचार म्हणून वापरली.

अमेरिकन सिव्हील वॉरमध्ये घडलेल्या घटनांचे वर्णन करण्यासाठी शक्तिशाली व्यंगचित्र देखील वापरले गेले. अब्राहम लिंकन या व्यंगचित्रांमधील प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत, थॉमस नेस्ट नावाच्या जर्मन-अमेरिकन व्यंगचित्रकाराने अमेरिकेतील आपल्या व्यंगचित्रकारांना अमेरिकेतील व्यंगचित्रकारणाची परिभाषा दिली. त्याच्या 160 व्यंगचित्रांनी न्यूयॉर्क शहरातील “ट्वीड मशीन” च्या विरोधात कठोरपणे प्रचार केला. भ्रष्ट राजकीय संस्था ताम्मेनी हॉलच्या पडझडीत आणि “बॉस ट्वीड” या नेत्याच्या अटकेनंतर या व्यंगचित्रांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

कॉमिक पुस्तके

1842 च्या दशकात अमेरिकेत हार्डिकव्हरमध्ये द डव्हेंचर ऑफ़ मिस्टर ओबदिय्या ओल्डबक यांच्या प्रकाशनाने कॉमिक पुस्तके अमेरिकेमध्ये अस्तित्त्वात आणली. मिस्टर ओबदिय्या ओल्डबक त्यानंतर हे आधुनिक कॉमिक पुस्तकांचे अग्रदूत मानले गेले.

त्यानंतर कॉमिक फनीज ऑन परेड हे पहिले पुस्तक बनले ज्याने आधुनिक कॉमिक पुस्तकांचे आकार, स्वरूप आणि कालावधी निश्चित केले. त्यापाठोपाठ फेमस फनीज: अ कार्निवल ऑफ कॉमिक्स, डेलने प्रकाशित केलेले 36-पानांचे कॉमिक होते. हे खरंच प्रथम न्यूजस्टँड कॉमिक पुस्तक बनले.

त्यानंतर 1930पर्यंत कॉमिक पुस्तकांना सुवर्णकाळ आला. समाजात कॉमिक पुस्तकांची लोकप्रीयता वाढू लागली. कालांतराने 1950 पर्यंत कॉमिक पुस्तकांनी समाजात वेगळे स्थान निर्माण केले. यामध्ये तंत्रज्ञानाच्या विकासानुसार वेळोवेळी प्रगती होत गेली.

या कॉमिक पुस्तकांवर काहींनी आक्षेप देखील घेतले. मनोचिकित्सक फ्रेड्रिक वेर्थम यांनी 1954 मध्ये “सिडक्शन ऑफ द इनोसेंट” नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते, ज्यात त्यांनी कॉमिक पुस्तकांबद्दल जोरदार टीका केली होती. कॉमिकमध्ये छापून येणाऱ्या चित्रांमुळे बाल गुन्हेगारी वाढली आहे. तसेच लहान मुलांच्या निष्पाप मनावर याचा परिणाम होत आहे, असा आरोप फ्रेड्रिक वेर्थम यांनी केला होता.

वारंवार कॉमिक पुस्तकांवर होणाऱ्या आक्षेपांमुळे आणि सरकार आणि माध्यमांच्या वाढत्या छाननीला उत्तर म्हणून अमेरिकन कॉमिक्स उद्योगाने कॉमिक्स मॅगझिन असोसिएशन ऑफ अमेरिका (सीएमएए) ची स्थापना केली, ज्याने सेन्सॉरशिपच्या उद्देशाने कॉमिक्स कोड ऑथॉरिटी आणि कॉमिक्स कोडची स्थापना केली.

अॅॅनिमेशनचा काळ

आता पर्यंत छापील कार्टून्सनी जगाला वेड लावले होते. मात्र तंत्रज्ञानाच्या विकासानंतर हेच कार्टून पडद्यावर दिसू लागले. अ‍ॅनिमेशन म्हणजे स्थिर चित्र हाताळण्याच्या तंत्राचा संदर्भ आहे जेणेकरून चित्र “अ‍ॅनिमेटेड” किंवा फिरत्या प्रतिमांसारखे दिसतील. अ‍ॅनिमेशनने अगदी सिनेमाच्या आगमनाचा अंदाज लावला. 17 व्या ते 19 व्या शतकात युरोपमधील औद्योगिक क्रांतीच्या काळात, प्रतिमा स्थिर करण्यासाठी मशीन तयार करण्यात आल्या. त्या मशीनंपैकी एक म्हणजे थायमेट्रोप, ऑप्टिकल टॉय.

1900मध्ये द एन्केटेड ड्रॉईंग नावाच्या सायलेंट फिल्ममध्ये पहिल्यांना अ‍ॅनिमेटेड सिक्वेन्स वापरण्यात आला. 6 वर्षानंतर म्हणजे 1906मध्ये ह्युमरियस फेस ऑफ फनी फेसेस (Humorous Phases of Funny Faces) नावचं पाहिलं “अ‍ॅनिमेटेड कार्टून पडद्यावर आले. याचे दिग्दर्शन जेम्स स्टुुअर्ट ब्लॅकटन यांनी केले होते.

1923 मध्ये वॉल्ट डिस्ने यांनी शॉर्ट अ‍ॅनिमेटेड मालिका बनविणे सुरू केले जे मुख्यतः परीकथा आणि मुलांच्या कथांवर आधारित होते. 1934 मध्ये त्यांनी द व्हाईट लिटिल हेन हा चित्रपट प्रदर्शित केला जो ‘द लिटिल रेड हेन’ या परीकथेवर आधारित होता. यात लोकप्रिय डोनाल्ड डकचे पदार्पणदेखील झाले.

1930 ते 1950 च्या दशकात अ‍ॅनिमेटेड चित्रपटांची लोकप्रियता वाढली, ज्यामुळे या काळाला अमेरिकन अ‍ॅनिमेशनचा सुवर्णकाळ म्हणतात. यामुळे मिकी माऊस, पोपेये, बेटी बूप आणि इतर बर्‍याच जणांचा जन्म झाला.

1950नंतरच्या काळात अ‍ॅनिमेटेड जगाचा विस्तार झाला. संगणकाची जोड मिळाल्याने अनेक अ‍ॅनिमेटेड चित्रपट आले. ज्याने प्रेक्षकांना भारावून टाकले. हळूहळू टेलीव्हिजन घरोघरी आला. त्यामुळे तर अ‍ॅनिमेटेड चित्रपट, लघुपट, यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. हळूहळू कार्टून 3D होऊ लागले.त्यानंतरच्या काळात अनेक कार्टून्स प्रोग्राम बनवण्यात आले. जे अजूनही टेलीव्हिजनवर पाहता येतात आणि त्यातील विनोद अजूनही प्रेक्षकांना निखळ हसायला लावतात.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here