अनोखं गाव !सध्याच्या काळातही ‘या’ गावात बोलली जाते केवळ संस्कृत भाषा, असा आहे इतिहास

0

भारत हा बहुभाषिक देश आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यात आणि प्रांतात वेगवेगळी भाषा बोलली जाते. देशात शेकडो जातीजमाती असल्याने ते लोकही वेगळी भाषा बोलतात. भारतातील बऱ्याच भाषांना लिपी नाही परंतु बोलीभाषा म्हणून या भाषांचा सर्रास वापर होत आहे.

आज आपण एका गावाबद्दल माहिती घेणार आहोत ज्या गावातील सर्व लोक बोलीभाषा म्हणून संस्कृत भाषा बोलतात. संस्कृत ही अवघड भाषा मनाली जाते. तरीही येथील लोक संस्कृत बोलतात. या गावाचे नाव हे मत्तरु आहे. हे कर्नाटक राज्यात आहे. या गावाच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये लोक कन्नड भाषा बोलतात.

बंगळुरुपासून 300 कि.मी. अंतरावर तुंग नदीच्या काठी वसलेले हे गाव. या गावात प्राचीन काळापासून संस्कृत भाषा बोलली जाते. मात्र नंतर लोक कन्नड भाषा देखील बोलू लागले, कन्नड येथे 1981-82 पर्यंत बोलले जात असे. परंतु 33 वर्षांपूर्वी पेजावर मठाच्या स्वामींनी हे संस्कृत भाषेचे गाव बनविण्यास सांगितले. आणि त्यानंतर फक्त 10 दिवस आणि 2 तासांच्या अभ्यासाने हे संपूर्ण गाव संस्कृतमध्ये बोलू लागले.

मत्तरु गावात 500 हून अधिक कुटुंबे राहत असून त्यांची लोकसंख्या जवळपास 3500 आहे. सध्या येथील सर्व रहिवासी संस्कृत भाषा समजतात आणि बहुतेक रहिवासी केवळ संस्कृत भाषाच बोलतात.या गावात संस्कृत भाषेच्या क्रेझचा अंदाज आपण या गोष्टीने लावू शकतो की गावातील शाळेत शिकणारी जवळपास अर्धी मुले संस्कृत भाषा ही प्रथम भाषा म्हणून शिकत आहेत.

या गावातील संस्कृत भाषिक तरुण मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत. काही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत तर काही मोठ्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमध्ये संस्कृत शिकवत आहेत. एवढेच नाही तर परदेशातूनही अनेक लोक संस्कृत शिकण्यासाठी या गावात येतात. या गावाशी संबंधित एक महत्वाची बाब म्हणजे आजपर्यंत या गावात जमिनीचा कुठलाही वाद झालेला नाही.

संस्कृत ही कोणत्या एका धर्माची भाषा नाही

संस्कृत ही जशी सर्व भारतीय भाषांची जननी नाही तसेच ती एका धर्माची किंवा उच्चवर्णीयांचीदेखील नाही. ती जनभाषा होती हे लक्षात घेऊन तिचे ज्ञानभाषा म्हणून असलेले महत्त्व आजही कायम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.