जगभरात अशा अनेक परंपरा आहेत ज्या ऐकून आणि वाचून आपल्याला नवल वाटतं. आपल्या देशातही अशा अनेक परंपरा आहेत ज्या ऐकून आपल्याला त्याविषयी जाणून घेण्याचे कुतूहल निर्माण होते. भारतात अशीही एक जागा आहे जिथे विवाहित महिला पाच दिवस कपडे घालत नाहीत.
आपल्याला हे ऐकण्यास विचित्र वाटेल, परंतु या पाच दिवसांत त्या कपड्यांशिवाय राहतात. हे बर्याच वर्षांपासून चालत आले आहे आणि अजूनही चालू आहे. आज आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
हिमाचल प्रदेशच्या मणिकर्णा खोऱ्यातील पिणी या गावात ही परंपरा आहे. या गावात महिला वर्षामध्ये 5 दिवस कपडे घालत नाहीत. या परंपरेची खास गोष्ट म्हणजे या महिला यावेळी पुरुषांसमोर येत नाही.
श्रावण महिन्यात ही परंपरा अवलंबली जाते. ही परंपरा पूर्वजांच्या काळापासून चालू आहे. समजुतीनुसार या खेड्यातील कोणतीही महिला ही परंपरा पाळत नसेल तर ती तिच्या घरात काहीतरी अशुभ घडते म्हणूनच ही परंपरा पाळली जाते.
या प्रथेविषयी काही लोक असंही म्हणतात की काही वर्षांपूर्वी एक राक्षस सुंदर कपडे परिधान केलेल्या स्त्रिया उचलून नेते असे, त्यामुळे या गावातीळ देवतांनी त्याला संपवले होते.
असे मानले जाते की, लहुआ देवता अजूनही या गावात येतात आणि वाईट गोष्टींविरूद्ध लढतात. श्रावण महिन्यातील ज्या दिवशी या स्त्रिया कपडे घालत नाहीत त्यावेळी सर्व लोक गावात हसणे थांबवतात.
हसण्यासह या गावात दारू आणि मांस यांचाही तिरस्कार केला जातो. यामुळे महिला स्वतःला सांसारिक जगापासून वेगळे करतात. मात्र आता नवीन पिढी ही परंपरा जरा वेगळ्या पद्धतीने पाळते. आजच्या जमान्यातील महिला या 5 दिवसात कपडे बदलत नाहीत आणि अतिशय पातळ कपडे घालतात.