स्टीव्ह जॉब्स यांना कोण ओळखत नाही ! आपण “Apple” आयफोन आयपॅड किंवा आयमॅक किंवा संगणक वापरला असेल तर आपल्याला ते माहित असतील. जर आपल्याला अद्याप माहित नसेल तर स्टीव्ह जॉब्स हे जगातील सर्वात वेगवान, तंत्रज्ञानामध्ये अव्वल, टिकाऊ आणि महागड्या फोन निर्माता अॅॅपल कंपनीचे मालक आहेत.
स्टीव्ह जॉब सध्या जगात नसले तरी आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा ते आपली कार चालवत असत तेव्हा त्यांनी त्यावर कधीही नंबर प्लेट लावली नाही. तरीही त्यांना पोलिसांनी पकडले नाही किंवा त्याच्यावर कधीच कारवाई झाली नाही.
कदाचित आपणास हे माहित असेल की, अमेरिकेचे कायदे अतिशय कठोर आहेत आणि त्यांची अमलबजावणीही काटेकोरपणे केली जाते. मग या कारवाईतून स्टीव्ह जॉब्स कसे सुटले.
स्टीव्ह जॉब्स इतके मोठे व्यक्ती आहेत की, त्यांना पोलीस सहज सोडून देत असतील किंवा अतिशय पैसेवाला माणूस असल्याने प्रत्येकवेळी दंड भरत असेल, असे आपल्या सारख्या सामान्यांना वाटते. परंतु स्टीव्ह जॉब्स यांना कोणीच अडवले नाही आणि त्यांनी कोणता दंड देखील भरला नाही. त्यामुळे स्टीव्ह जॉब यांच्या नंबर प्लेट नसलेल्या गाडीची कहाणी मोठी रंजक आहे.
स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे सिल्व्हर रंगाची Mercedes SL55 AMG कार होती. त्यावर त्यांनी कधीही नंबर प्लेट लावली नाही. वस्तुतः जॉब्सने कॅलिफोर्निया परिवहन कायद्याचा फायदा घेतला, या कायद्यानुसार नवीन वाहनावर 6 महिने नंबर प्लेट नसली तरी चालते. याचाच फायदा जॉब्स यांनी घेतला.
जॉब्स यांनी कार कंपनीबरोबर एक करार केला होता त्यामध्ये असे नमूद होते की, ज्यादिवशी कारला 6 महिने पूर्ण होतील त्यादिवशी हुबेहूब नवीन कार कंपनीकडून दिली जाईल. त्यामुळे कॅलिफोर्निया परिवहन कायद्याचा जॉब्स फायदा घेत असे.
स्टीव्ह जॉब्सच्या कारमध्ये नंबर प्लेट नसण्याचे कारण काय होते ?
आता तुम्हाला विचार येईल की स्टीव्ह जॉब्सने हे का केले? यामागील कारण असे आहे की स्टीव्हला कोणीही त्याचा मागोवा घेऊ नये अशी इच्छा होती
एकदा स्पष्टीकरण देताना जॉब्स म्हणाले की, लोक कधीकधी माझा पाठलाग करतात आणि जर माझ्याकडे नंबर प्लेट असेल तर कोणालाही मी समजेल की मी कोठे राहतो. पण आता कोणालाच कळत नाही मी कुठे आहे. सध्याच्या गूगल नकाशाच्या आगमनानंतर ते आता तर्कसंगत नव्हते. तरीही जॉब्स असे करण्यास पसंत करत होते.