fbpx
3.5 C
London
Wednesday, December 7, 2022

…म्हणून मच्छर पितात मानवाचे आणि जनावरांचे रक्त, संशोधनातून मोठा खुलासा

अनेकदा आपल्याला असा प्रश्न पडला असेल की, मच्छर मानवाचे रक्त का बरंं पीत असतील ? तर याचं उत्तर आता न्यू जर्सीच्या प्रिन्सटन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. त्यांच्या संशोधनात असे समोर आले आहे की, याआधी मच्छर रक्त पीत नव्हते तर काही मच्छर अजूनही रक्त पीत नाहीत.

न्यू जर्सीच्या प्रिन्सटन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, कोरड्या प्रदेशात राहत असताना डासांनी मानवाचे व इतर प्राण्यांचे रक्त पिण्यास सुरुवात केली. जेव्हा जेव्हा हवामान कोरडे असते आणि डासांना त्यांच्या प्रजननासाठी पाणी मिळत नाही तेव्हा ते मानवाचे किंवा प्राण्यांचे रक्त शोषू लागतात.

वैज्ञानिकांनी आफ्रिकेतील एडीस एजिप्टी डासांचा अभ्यास केला. एडीस एजिप्टी हा डास डेंग्यू आणि पिवळा तापा या रोगाचा प्रसार करणारे आहेत. न्यू सायंटिस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार आफ्रिकेच्या डासांमध्ये एडिस एजिप्टी डासांच्या अनेक प्रजाती आहेत. सर्व प्रजातींचे डास रक्त पिऊ शकत नाहीत.

एका अहवालात असे म्हटले आहे की, अद्याप कुणीही डासांच्या विविध प्रजातींच्या अन्नाचा अभ्यास केलेला नाही. आम्ही आफ्रिकेच्या सब-सहारान प्रदेशात 27 ठिकाणी एडीस एजिप्टी डासांची अंडी घेतली. या अंड्यामधून डास तयार केले. मग माणसे, इतर प्राणी, जसे गिनिया डुक्कर सारख्या त्यांचे रक्त पिण्याच्या पद्धती समजण्यासाठी प्रयोगशाळेत सोडले. यामध्ये असे दिसून आले की, एडिस एजिप्टी डासांच्या विविध प्रजातींचे अन्न पूर्णपणे भिन्न असल्याचे दिसून आले.

हे सिद्ध केले गेले आहे की सर्व डास रक्त पितात. हे असे घडले की जेथे जास्त दुष्काळ किंवा उष्णता आहे. पाणी कमी आहे. तेथे डासांना प्रजननासाठी ओलावा असणे आवश्यक असते. पाण्याची कमतरता भागविण्यासाठी डास मानवांचा व इतर प्राण्यांचे रक्त पिण्यास लागतात.

हा बदल डासांच्यामध्ये हजारो वर्षात झाला आहे. एडीस एजिप्टी डासांची एक खास गोष्ट अशी आहे की वाढत्या शहरांमुळे ते पाणीटंचाईवर मत करण्यासाठी. मग त्यांनी मानवी रक्त पिण्यास सुरवात केली.

(ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला अभिप्राय (Feedback) कळवा )

हे पण वाचा

 

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here