Redmiचा शक्तिशाली आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन Redmi K 20 PRO 6 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. कंपनीचा अल्फा फ्लॅगशिप फोन 28,999 रुपये किंमतीसह बाजारात आणला गेला. आता त्याची प्रारंभिक किंमत 24,999 रुपयांवर आली आहे. त्यामुळे नवीन ग्फोन गहू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. फोन दोन स्टोरेज प्रकारांमध्ये येतो – 6 जीबी 128 जीबी आणि 8 जीबी 256 जीबी.
Redmi K20 Pro स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये 6.39-इंचाचा AMOLED फुल एचडी + डिस्प्ले आहे ज्यामध्ये 1080×2340 पिक्सल रिझोल्यूशन आहे. डिस्प्लेचे आस्पेक्ट रेशो 19.5: 9 आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 855 एसओसी प्रोसेसरसह 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह येतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोनीच्या आयएमएक्स 586 सेन्सरसह यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे. याशिवाय आपणास 13-मेगापिक्सलचा सेकंडरी शूटर आणि 8-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 20-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.
फोनला जबरदस्त बॅटरी बॅॅक अप आहे. फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन लवकर चार्ज करण्यासाठी, 27 वॅट्सचा चार्जर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, Redmi K 20 Pro मध्ये 4 जी व्हीएलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ व्हर्जन 5.0, जीपीएस / ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकसारखे पर्याय उपलब्ध आहेत.