निवडक ग्राहकांसाठी एअरटेल 1 जीबी हाय-स्पीड डेटा विनामूल्य देत आहे. विनामूल्य डेटा हा विशेष रिचार्ज केल्यावर दिला जात आहे. हा अतिरिक्त विनामूल्य डेटा सर्व ग्राहकांसाठी नाही. एअरटेल काही निवडक ग्राहकांना एक मेसेज पाठवून हा डेटा देत आहे. हा अतिरिक्त डेटा तीन दिवसांसाठी देण्यात येत आहे. अलीकडे रिलायन्स जिओनेही आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अशीच ऑफर दिली होती, जेव्हा निवडक जिओ ग्राहकांना 2 जीबी विनामूल्य डेटा मिळाला होता.
OnlyTech फोरमचे सदस्य डीजे रॉय यांनी एअरटेलच्या विनामूल्य डेटाशी संबंधित माहिती दिली आहे. एअरटेलच्या ग्राहकांनी आपल्या प्रीपेड खात्यात 48 रुपयांच्या डेटा पॅकसह रिचार्ज केल्यावर त्यांना एकूण 4 जीबी डेटा मिळणार आहे. या डेटा पॅकमध्ये, कंपनी 3 जीबी डेटा ऑफर करते परंतु एअरटेल आता 1 जीबी डेटा विनामूल्य देणार आहे.
एअरटेल कंपनी ग्राहकांच्या खात्यात 1 जीबी डेटा विनाशुल्क जोडला गेला असे सूचित करण्यासाठी मेसेजही पाठवत आहे. या 1 जीबी फ्री डेटाची वैधता 3 दिवसांची आहे आणि चाचणी आधारावर ही योजना आणली जात आहे.
याशिवाय 49 रुपयांच्या स्मार्ट रिचार्ज पॅकमध्ये एअरटेल चाचणी म्हणून 1 जीबी विनामूल्य डेटा देत आहे. 49 रुपयांच्या पॅकमध्ये कंपनी 100 एमबी डेटा ऑफर करते आणि त्यासाठी 38.52 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. कंपनीने एक संदेश पाठवून ग्राहकांना 1 जीबी विनामूल्य डेटा माहिती पाठवते आणि हा डेटा 3 दिवसांच्या वैधतेसह जमा होत आहे.
हे विनामूल्य डेटा ग्राहकांसाठी रैंडमली रोल आउट केले जात आहे. नवीन योजनांच्या रिचार्जवर, सर्व वापरकर्त्यांना 1 जीबी विनामूल्य डेटा मिळणार नाही. मात्र एअरटेल कमी किंमतीच्या योजनेसाठी अतिरिक्त फायदे देत आहे. एअरटेलचा विनामूल्य डेटा क्रेडिट प्रोग्राम जिओच्या 2 जीबी विनामूल्य डेटा ऑफरसारखेच आहे. जिओच्या ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा प्राप्त झाल्याच्या बातम्या आहेत.