व्होडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी नवीन योजना, 1,348 रुपयांत मिळणार ‘या’ सुविधा

0

व्होडाफोन-आयडिया (वी) ने ग्राहकांसाठी नवीन पोस्टपेड योजना सुरू केली आहे. या पोस्टपेड योजनेची किंमत 1,348 रुपये आहे. कंपनीने ही योजना REDX Family अंतर्गत सुरू केली आहे. वैयक्तिक पोस्टपेड योजनांप्रमाणेच ग्राहकांना यामध्ये बर्याच लोकप्रिय ओटीटी अ;ॅप्सची विनामूल्य सब्सक्रिप्शन देखील मिळेल.

या नवीनतम योजनेच्या अटी आणि शर्तींबद्दल कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र या योजनेत मिळणाऱ्या फायद्यांविषयी कंपनीने सांगितले आहे. या योजनेतील प्राथमिक कनेक्शनसाठी कंपनी 150 जीबीच्या कॅपिंगसह असीमित डेटा ऑफर करीत आहे. योजनेत १०० मोफत एसएमएस मिळतील. तसेच कोणत्याही नेटवर्कसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग बेनिफिटही देण्यात येत आहे.

सेकंडरी कनेक्शनच्या फायद्यांविषयी बोलायचं झाल्यास कंपनी त्यामध्ये 50 जीबी पर्यंत रोलओव्हरसह 30 जीबी डेटा देत आहे. सेकंडरी कनेक्शन अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह 100 विनामूल्य एसएमएस देखील देत आहे.

या योजनेची सदस्यता घेण्यापूर्वी हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे की कंपनी त्यामध्ये विनामूल्य अ;ॅड-ऑन कनेक्शन देत नाही. सेकंडरी कनेक्शनसाठी ग्राहकांना दरमहा 249 रुपये द्यावे लागतील. व्ही आरईडीएक्स फॅमिली पोस्टपेड योजनेअंतर्गत वापरकर्ते चार पर्यंत दुय्यम कनेक्शन जोडू शकतात.

या योजनेत मिळत असलेल्या इतर फायद्यांमध्ये नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन, Amazon प्राइम एक वर्षासाठी सबस्क्रिप्शन, 999 रुपयांचे झी 5 प्रीमियम सबस्क्रिप्शन दिले जात आहे. यासह कंपनी या योजनेत Vi Movies TV चे सबस्क्रिप्शन मोफत मिळत आहे.

या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या ग्राहकांना वर्षात चार वेळा आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांच्या लाउंजवर विनामूल्य प्रवेश मिळू शकेल आणि तेही कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.