fbpx
3.5 C
London
Wednesday, December 7, 2022

तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, टपाल खात्यात 1371 पदांसाठी भरती, असा करा अर्ज

महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण टपाल खात्यात भरती निघाली आहे. भारतीय टपाल खात्याने महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील 1371 पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 10 नोव्हेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत या रिक्त पदासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. दरम्यान, या भरतीसाठी नोंदणीची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर 2020 रोजी निश्चित करण्यात आली होती आता ती वाढवून 10 नोव्हेंबर 2020 करण्यात आली आहे.

पात्रता

पोस्टमन आणि मेल गार्ड या पदासाठी अर्जदाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून १२ वी पास प्रमाणपत्र असले पाहिजे. तसेच अर्जदाराची स्थानिक भाषा मराठी असली पाहिजे आणि त्याला मराठी भाषेचे सखोल ज्ञान असायला हवे. तसेच मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे एका मान्यताप्राप्त बोर्डाचे दहावी पास प्रमाणपत्र असले पाहिजे आणि तुम्हाला मराठी भाषेची माहिती असायला पाहिजे. तसेच संगणकावर आधारित परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

वेतन

पोस्टमन आणि मेलगार्डच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा पगार हा वेतन मॅट्रिक्स लेव्हल तीन वर आधारित असेल. तो 21,700 ते 69,100 रुपयांच्या दरम्यान असेल.तसेच मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतन मॅट्रिक्स लेव्हल 1 नुसार पगार मिळेल. तो 18,000 रुपयांपासून ते 56,900 रुपयांपर्यंत असेल. या भरतीत पोस्टमन पदासाठी 1029 जागा असणार आहेत. तर मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)- 327 जागा आणि मेलगार्ड साठी 15 जागा असणार आहेत.

वयोमर्यादा

पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) साठी अर्ज करणारे उमेदवार 18 ते 27 वर्षे वयोगटातील असावेत. वय 3 नोव्हेंबर 2020 पर्यंत वयाच्या आधारावर मोजले जाईल.

अर्जाची फी

या भरती संबंधित परीक्षेसाठी यूआर / ओबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या उमेदवाराला 500 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर एससी / एसटी / पीडब्ल्यूडी आणि महिला प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून केवळ 100 रुपये द्यावे लागतील.

नोकरीची जाहिरात पाहण्यासाठी

https://www.maharashtrapost.gov.in  ही लिंक तपासा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://dopmah20.onlineapplicationform.org/MHPOST/ या वेबसाईटला भेट द्या
अधिकची माहिती पाहण्यासाठी maharashtrapost.gov.in या वेबसाईटला भेट द्या

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here