fbpx

Paytmचा मोठा निर्णय, छोट्या व्यापाऱ्यांसाठी आणली ‘ही’ महत्वपूर्ण योजना

0

पेटीएमने आपल्या ग्राहकांना विशेषत: छोट्या व्यापाऱ्यांना आणि MSMEs ला मोठ्या ऑफर्स आणल्या आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पेटीएमने जाहीर केले आहे की ते स्वत: व्यापाऱ्यांच्या व्यवहार शुल्काचा (एमडीआर) खर्च उचलतील. दरवर्षी ही फी सुमारे 600 कोटी असेल. व्यापारी पेटीएम ऑल इन वन क्यूआर, पेटीएम साउंडबॉक्स आणि पेटीएम ऑल इन वन अँड्रॉइड पीओएसवर कोणतेही शुल्क न भरता पैसे घेऊ शकतील.

पेटीएमच्या या निर्णयामुळे व्यापार्यांकडे व्यवसाय वाढविण्यासाठी अतिरिक्त पैसे उरतील. कंपनीने म्हटले आहे की व्यापारी आता बँक खात्यात पैसे घ्यायचे की पेटीएम वॉलेटमध्ये पैसे घ्यायचे हे ठरविण्यास व्यापारी सक्षम होतील. पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष कुमार आदित्य म्हणाले की, याचा फायदा MSMEs होणार आहे.

पेटीएमच्या या योजनेचा फायदा सुमारे 17 दशलक्ष म्हणजे 1.7 कोटी दुकानदारांना होईल. कंपनी प्रत्येक पद्धतीने पैसे स्वीकार करण्यास प्रोत्साहन देत आहे. यात पेटीएम वॉलेट, यूपीआय, रुपे, एनईएफटी आणि आरटीजीएस यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त कंपनीने मार्च 2021 पर्यंत एमएसएमईंसाठी 1000 कोटी कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी एसबीआय कार्ड्स आणि पेटीएम यांनी एकत्रितपणे नवीन क्रेडिट कार्ड सुरू केले. हे कार्डकॉन्टेक्टलेस आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांनी ‘पेटीएम एसबीआय कार्ड’ आणि ‘पेटीएम एसबीआय कार्ड सिलेक्ट’ असे दोन प्रकारची कार्ड सादर केली होती. ही दोन्ही कार्डे व्हिसा प्लॅटफॉर्मवर काम करतात.

एसबीआयच्या मते या कार्डावरील खरेदीवर ग्राहकांना 5% कॅशबॅक मिळेल. तसेच चित्रपटाची तिकिटे खरेदी करणे, पेटीएम मॉलकडून गॅझेट घेणे, ट्रॅव्हल तिकिटे आणि इतर देयकाबद्दल आपल्याला 2% कॅशबॅक मिळेल. त्यामुळे याचा फायदा सामान्य नागरिकांना होईल अशी एसबीआयला अपेक्षा आहे.

दरम्यान, ग्राहकांना विविध प्रकारची उत्पादने ऑफर करणे हे कंपनीचे धोरण असल्याचे एसबीआयने स्पष्ट केले आहे जेणेकरुन त्यांना त्यांच्या खर्चाच्या गरजेनुसार अधिक उत्पादने मिळू शकतील आणि त्यांना डिजिटल पेमेंटसाठी प्रवृत्त केले जाऊ शकेल. यातून एसबीआय आणि पेटीएम या दोघांनाही फायदा होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.