आपण नवीन गाडी घेण्यासाठी, घर घेण्यासाठी, शिक्षणासाठी किंवा अन्य इतर गोष्टींसाठी कर्ज घेत असतो. आपल्यापैकी बहुतेक जणांकडे एकापेक्षा अधिक बँकांची कर्जे असतील. या कर्जामुळे आपल्याला सतत तणाव, चिडचिड, कामात मन न लागणे, झोप न येणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर याचा परिणाम झालेला पहायला मिळतो. आज आम्ही तुम्हाला कर्जापासून पटकन मुक्ती मिळवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती सांगणार आहोत.
कर्जाची व्याजदरानुसार विभागणी करा
आपल्याकडे विविध प्रकारची कर्जे असतात त्यावेळी त्या सर्वांचा व्याजदर एकसारखा नसतो. अशावेळी आपण यादी करताना उतरत्या क्रमाने म्हणजे जास्त व्याजदर असणारे कर्ज प्रथम आणि त्याखालोखाल इतर कर्जाचा तपशील लिहावा. ज्या कर्जाचे व्याजदर सर्वात जास्त आहे. ते कर्ज सर्वप्रथम फेडण्याचे नियोजन करावे. म्हणजे इतर कर्जाचा ईएमआय हा कमीत कमी देऊन उरलेली सर्व रक्कम ही जास्त व्याजदर असणाऱ्या कर्जाच्या ईएमआयला द्यावी जेणेकरून ते कर्ज लवकर चुकते होऊन तुमचा पैशाची बचत होईल.
जास्त हप्ता द्या, कमी व्याज द्यावे लागेल
समजा तुमचा ईएमआय हा ५००० असेल आणि तुमची फेड ही ४१ महिन्यांची असेल पण तुम्ही ५ ऐवजी १० हजार ईएमआय भरला तर तुम्हाला फक्त २० महिन्यांचे पैसे भरावे लागतील बरोबर ? परंतु हे चुकीचे आहे. कारण तुम्ही जास्त पैसे भरल्याने व्याजदर कमी बसेल आणि तुम्ही घेतलेले कर्ज हे फक्त १३ महिन्यांत चुकते होईल. तसेच जर तुम्ही जर १० ऐवजी २० हजार ईएमआय भरला तर तुम्हाला अजूनच फायदा होईल. कारण तुम्ही तुमचे कर्ज हे फक्त ६ महिन्यांत चुकते कराल.
अनावश्यक वस्तू विका आणि ईएमआय भरा
ज्या गोष्टींची तुम्हाला गरज असते त्या गोष्टी तुम्ही खरेदी करता परंतु आपल्याकडे अशा अनेक वस्तू असतात ज्यांचा वापर आपण दररोजच्या जीवनात करत नाहीत. अशा गोष्टी विकून आपण कमीत कमी ३-४ ईएमआय चे पैसे मिळवू शकता. जसे इलेक्ट्रॉनिक वस्तू, अनावश्यक फर्निचर यांचा समावेश आहे. जे विकण्यासाठी तुम्ही olx किंवा quikr चा उपयोग करू शकता.
अनावश्यक गोष्टींचा वापर टाळा
आपण बऱ्याच वेळा अशा गोष्टींची खरेदी करतो की ज्यामुळे आपल्याला केवळ क्षणिक समाधान मिळते परंतु त्याला खूप पैसे खर्च होतात. अशा गोष्टींचा वापर टाळा. तसेच बहुतेक जणांना हॉटेलमध्ये जेवण करण्याची आवड असते. परंतु आपल्या घरी कमी खर्चात जेवण उपलब्ध असताना या गोष्टींवर यावर घाला. तसेच आपले पैसे जर मनोरंजन करण्यासाठी खर्च होत असतील तर तो खर्च टाळा. त्याचबरोबर आपण अनावश्यक गोष्टींचे सबस्क्रिप्शन घेतलेले असते ते टाळा.
दुय्यम कमाईतून कर्ज फेडा
बहुतेक घरांमध्ये नवरा बायको दोघेही काम करत असतात. अशावेळी एकाची कमाई ही घर चालवण्यासाठी वापर आणि दुसऱ्याची कमाई ही कर्ज फेडण्यासाठी वापरता येऊ शकते. जर घरात एकच व्यक्ती कमावणारा असेल तर त्याने दुय्यम कमाईचा मार्ग शोधावा, जसे तुम्ही फोटोग्राफी करू शकता, कन्टेन्ट रायटिंग करू शकता, आठवड्याच्या शेवटी टूर गाईड बानू शकता, तसेच ओला-उबर चालवून पैसे कमवू शकता.
इमरजन्सी फंड ठेवा
जेव्हा आपण पैसे कमवत असता त्यावेळी आपण आपल्या अडचणीच्या काळासाठी असा फंड ठेवा जो आपल्याला बँकेतून २४ ते ४८ तासांमध्ये मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला काही आर्थिक अडचण आल्यास ईएमआय भरण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
महिन्याचे बजेट बनवताना भावनांना आवर घाला
ज्यावेळी तुम्ही बजेट बनविता त्यावेळी तुमचा गरजांना भावनिकतेपेक्षा जास्त महत्व द्या. म्हणजे मागच्या ३-४ महिन्याचा खर्च पाहता या गोष्टी नोटीस करा की जो पैसे खर्च झाला आहे तो सत्कारणी लागला आहे का? नसेल तर भावनिक होऊन खर्च केलेला पैसा वाचवून कर्ज फेडण्यासाठी वापरू शकता. असं काही काळ केल्यास तुमच्यावरील कर्जाचा बोजा नक्कीच कमी होईल.
बोनस किंवा इतर ठिकाणांवरून मिळणारा पैसे ईएमआय साठी वापरा
अनेक वेळा आपल्या कॅश रिफंड मिळतो, आपल्याला बोनस मिळतो, डिस्काउंट मिळतो, उसने दिलेले पैसे मिळतात या पैशांचा वापर तुम्ही खाण्या फिरण्यासाठी न करता तुमचा ईएमआय भरण्यासाठी यामुळे तुमचा बोजा हलका होईल. जेणेकरून तुम्ही कर्जाची परतफेड लवकर करू शकाल.
हे पण वाचा
#Business : …’या’ चुका टाळा आणि व्यवसायातील तोटा दूर करा
…म्हणून व्यवसायात येते अपयश, मुकेश अंबानींनी याच चुका टाळल्या आणि झाले अल्पावधीत श्रीमंत