‘जागु मैं सारी रैना’ ! स्वरयोगिनी : प्रभा अत्रे यांची जीवन कहाणी

0

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ, चिंतनशील गायिका डॉ. प्रभा अत्रे. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वडील आबासाहेब अत्रे व आई इंदिराबाई अत्रे. त्यांच्या आई इंदिराबाई या गाणं शिकत असताना त्यापासून प्रेरित होऊन वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीय गायनाकड वळल्या. खरं तर आई -वडील दोघेही शिक्षक असल्यामुळ घरची परिस्थिती ही बेताचीच होती. तरीही मुलीनं डॉक्टर व्हावं, अशी आई – वडिलांची तीव्र इच्छा होती. पण, हॉस्टेलवर एकटीन राहण्याची तयारी नसल्यामुळ त्यांना डॉक्टर होण्याचा नाद सोडावा लागला.

शेवटी संगीत शिकता शिकता त्यांनी शास्त्र व कायदा या दोन्ही विषयांतली पदवी संपादन केली. खरं तर घरात संगीताची तशी आवड कोणालाही नव्हती. संगीत घरात शिरलं ते केवळ अपघातानेच. आईच्या आजारपणान घर बेजार झाल्यामुळ कुणीतरी त्यांना पेटी शिकवण्याचा उपाय सुचवला. आईच मन त्यामध्ये रमल नाही, पण लेकीनं मात्र सूर पकडला आणि आयुष्यभर सुरानीही प्रभाताईंना उत्तम साथ दिली.

सुरुवातीच्या काळात विजय करंदीकरांच्या शिकवनुकितून प्रभाताईंना सूरांची ओळख झाली. रागाशी परिचय झाला. ताल समजू लागला आणि ख्याल, ठुमरी, नाट्यगीत, भावगीत यांसारखे सगळे गानप्रकार त्या मैफिलिंमधून गाऊ लागल्या. त्यांनी ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर व त्यांचे प्रतिभावान बंधू सुरेशबाबू माने यांच्याकडे सातत्यान अनेक वर्ष शिक्षण घेतलं. सुरेशबाबू व त्यांच्या मोठ्या भगिनी हिराबाई बडोदेकर यांच्या वरील प्रभाताईंच्या गाढ श्रद्धेचा प्रत्यय त्यांच्या लेखणातून वारंवार येतो.

एके ठिकाणी त्या म्हणतात, ‘व्यवसायातल्या जीवघेण्या स्पर्धेत अनेकदा मन : शांती ढळण्याचे प्रसंग येतात. मैफल उखाडल्यासारखी होते. रियाजानही समाधान मिळत नाही. जीवनावरची श्रद्धा डळमलायला लागते आणि हलकेच बाबुराव, हिराबाई आपले सूर घेऊन मनात वस्तीला येतात. तेवढा एक क्षण पुरेसा होतो. मन पुन्हा उभारी घेत. शांत परिसरात असलेल्या शिवालयातील शुचीभूतता रियाज करताना मला माझ्या सुरातून जाणवायला लागत. जीवनावरची श्रद्धा पुन्हा दृढ व्हायला लागते.

प्रभा अत्रे यांनी गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार ही पदवी घेतली. याशिवाय डॉक्टर ऑफ म्युजिक यामध्ये ‘सरगम’ विषय घेऊन त्यांनी संशोधन केल. ट्रिनीती म्यूसिक कॉलेज, लंडन येथून पाश्चात्य त्या शिकल्या. कथक नृत्यशैलीच त्यांनी औपचारिक शिक्षण घेतलं. आणि पं.सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकड पारंपरिक ‘गुरु – शिष्य’ पद्धतीने हिंदुस्ता नी संगीताचे धडे गिरवले. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुशी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे.

ख्याल गायकीसोबतच, नाट्यसंगीत, भजन, ठुमरी दादरा, गझल, भावसंगीत अशा गायकीवरही त्यांच प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याच कामं त्यांनी केल. आकाशवाणीच्या नागपूर व मुंबई केंद्रात संगीत विभागात सहाय्यक निर्मात्या म्हणून त्यांनी काम पाहिलं, याशिवाय आकाशवाणीच्या मराठी व हिंदी भाषा विभागाच्या ‘अ ‘ श्रेणीच्या त्या नाट्य कलाकार आहेत.

त्याचबरोबर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात प्राध्यापिका व संगीत विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं.संगीत शारदा, संगीत विद्याहरण अशा संगीत नाटकांमध्ये त्यांनी स्त्री भूमिका केल्या.. शिवाय पुणे येथे ‘ स्वरमय गुरुकुलाची’ स्थापना करुन त्या मार्फत संगीत ज्ञानदानाच कार्य त्या करत आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्री व पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या काही रचना जसं, मारू बिहाग रागात असलेली ‘ जागु मै सारी रैना ‘ कलावती रागात ‘तन मन धन ‘ या विशेष पसंतीच्या रचना आहेत.

– कोमल पाटील

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.