fbpx
4.7 C
London
Sunday, January 29, 2023

आता सैन्याच्या नवीन युगाला सुरवात, ताकदवान राफेल भारतात लँड

बहुप्रतीक्षित राफेल लढाऊ विमान आज भारतीय भूमीवर लँड झाले आहे. भारताच्या अंबाला एअरफोर्स स्टेशनमध्ये या ताकदवान विमानांनी सुरक्षित लॅण्डिंग केलं आहे. फ्रान्स वरून निघाल्यानंतर या विमानांनी तब्बल 7000 किमीचा प्रवास केला. तर काल UAE येथे विश्रांती घेऊन या विमानांनी आज पुन्हा भारताकडे प्रवास सुरु केला.

‘The Birds have landed safely in Ambala’, असं ट्वीट करत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानांनी अंबालामध्ये लॅण्डिंग केल्याची माहिती दिली. शिवाय राफेलच्या लॅण्डिंगचा व्हिडीओ देखील राजनाथ सिंह यांनी ट्वीट केलं आहे.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि हवाई दलाच्या विनंतीनंतर स्थानिक प्रशासनाने अंबाला एअरफोर्सच्या परिसरात कलम 144 (जमावबंदी) लावण्यात आलं आहे. याशिवाय फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीवरही बंदी घालण्यात आली आहे.

राफेल विमानांना पक्ष्यांची उपमा देत लॅण्डिंगविषयी माहिती देताना राजनाथ सिंह यांनी लिहिलं आहे की, “पक्ष्यांनी अंबालामध्ये सुरक्षित लॅण्डिंग केलं आहे. राफेल विमानं भारतात दाखल होणं ही भारतीय सामर्थ्याच्या नव्या युगाची सुरुवात आहे. या विमानांनी भारतीय वायुदलाचं सामर्थ्य वाढलं आहे.”

भारत सरकारने हवाई दलासाठी 36 राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी चार वर्षांपूर्वी फ्रान्ससोबत 59 हजार कोटी रुपयांचा करार केला होता. आतापर्यंत भारताकडे सुखोईच्या रुपात चौथ्या पीढीचं लढाऊ विमान होतं आता राफेलच्या रुपात 4.5 पीढीचं विमान भारताच्या ताफ्यात दाखल झालं आहे. राफेलची ताकद जबरदस्त आहे.

भारताच्या शत्रू राष्ट्रांकडे म्हणजेच पाकीस्तान आणि चीनकडे राफेलच्या तोडीचे कोणतेही विमान नाही, असे सांगण्यात येत आहे. पाकीस्तानकडे सध्या F16 हे अमेरिकन बनावटीचे लढाऊ विमान आहे तर चीन कडे J – 20 नावाचे विमान आहे. मात्र राफेलच्या तुलनेत ही दोन्ही विमानं कमी क्षमतेची आहेत.

राफेल – F16 – J 20

राफेल हे विमान जास्त क्षमतेचे का आहे, हे आपण आता जाणून घेऊया. राफेलचा कॉमबे्ट रेडीयस 3700 किलोमीटर आहे तर F-16 चा रेडीयस 4200 किलोमीटर आहे. तर राफेलला टक्कर देऊ पाहणाऱ्या J-20चा कॉमबे्ट रेडीयस 3400 किलोमीटर आहे. कॉमबे्ट रेडीयस म्हणजे विमानाची दूरवर जाऊन मारण्याची क्षमता.

राफेलमध्ये तीन प्रकारचे मिसाईल आहेत. हवेतून हवेमध्ये मारणारे मिटीयोर मिसाईल, हवेतून जमिनीवर मारणारे स्कॅॅल्फ मिसाईल आणि तिसर हॅॅमर मिसाईल. राफेलवर बसवण्यात आलेले मिटीयोर मिसाईल हे 150 किलोमीटर पर्यंत मारू शकत. तर स्कैल्फ मिसाईल हे 300 किलोमीटरच्या रेंजपर्यंत हल्ला चढवू शकतंं. हॅॅमर मिसाईल हे कमी अंतरावर प्रभावशाली हल्ला करण्यासाठी बसवण्यात आले आहे. हवेतून जमिनीवर कमी अंतरावरील शत्रूला टार्गेट करण्यासाठी हे मिसाईल चांगलेच कामाला येईल.

तर पाकिस्तानच्या F-16 वर बसवण्यात आलेले मिसाईल हे केवळ 100 किलोमीटरच्या रेडीयसमध्ये हल्ला करू शकतात. तर चीनचे J-20वर बसवण्यात आलेली PL 15 मिसाईल हे 300 किलोमीटर पर्यंतच्या कॉमबेट रेडीयसमध्ये हल्ला चढवू शकतात. तर PL 21 हे मिसाईल 400 किलोमीटर पर्यंत मार देऊ शकतंं.

कमी वेळा जास्त उंचीवर उड्डाण घेण्याची क्षमता राफेलची जास्त आहे. F-16 हे 254 मीटर प्रति सेकंद मध्ये उड्डाण घेते तर राफेल आहे 300 मीटर प्रति सेकंद मध्ये उड्डाण घेण्यास सक्षम आहे. तर दुसरीकडे J-20बाबत बोलायचे झाल्यास हे विमान 304 मीटर प्रति सेकंद मध्ये झेपावते.

1 मिनिटात राफेल 18 हजार मीटर उंचीवर जाऊ शकते. तर F-16 हे 1 मिनिटात 15,240 मीटरवर जाऊ शकते. तर J-20 हे विमान 18240 मीटर उंच जाऊ शकते.

वेग : J 20चा वेग ताशी 2100 किलोमीटर आहे. तर F-16चा वेग ताशी 2414 किलोमीटर आहे. मात्र दोघांना मागे सोडणारे राफेल हे तशी 2450 किलोमीटर वेगाने प्रवास करणारे आहे.

राफेलची व्हिजीबलीटी ही 360 डिग्री आहे. त्यामुळे शत्रूच्या विमानाला दिसताच क्षणी बटण दाबून उडवण्याची क्षमता राफेलमध्ये आहे. हे विमान पाण्यातील बेसवर देखील उतरवले जाऊ शकते. एकावेळी राफेल 26 टन वजन कॅॅरी करू शकतंं.

एकदा यात इंधन भरले की हे विमान जवळपास 10 तास उड्डाण घेऊ शकतंं. राफेलमध्ये लावण्यात आलेली गन ही एकावेळी 2500 फायर करू शकतंं. रडारमध्ये ही राफेल F-16च्या पुढे आहे. 100 किमीच्या परिसरात राफेल एकावेळी 40 टार्गेट करू शकतंं तर F16 हे 84 किमीमध्ये केवळ 40 टार्गेट ओळखू शकतंं.

अशा वैशिष्ट्यांनी भरलेले राफेल विमान हे भारताच्या वायुदलाची ताकद नक्कीचंं वाढणार आहे. तर पाकिस्तान आणि चीनला देखील याचा चांगलाच वचक बसणार आहे.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here