#Corona : असे असतील अनलॉक -3 चे नियम, जिम आणि योग केंद्रांना परवानगी

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशभर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने केंद्र सरकारने अनलॉक -3 ची मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये काही निर्बंध हटविण्यात आले आहेत, तर काही घटकांवर 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम राहणार आहेत.

  • 5 ऑगस्टपासून जिम आणि योग संस्था उघडण्यास परवानगी.
  • मेट्रो ट्रेन, सिनेमा हॉल, जलतरण तलाव आणि बारच्या सेवांवर बंदी कायम राहील.
  • सर्व कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन सुरू राहिल.
  • कंटेनमेंट झोनला सामान्य म्हणून घोषित करण्याचा अधिकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना असतील.
  • नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासास मर्यादित स्तरावर परवानगी देण्यात आली आहे.
  • राजकीय, सामाजिक, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक समारंभांवर बंदी 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

अटींसह स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमांना परवानगी

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रमास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, यावेळी, सामाजिक अंतर आणि इतर महत्त्वपूर्ण नियम (जसे की मस्क लावणे ) पाळले पाहिजे.

वृद्ध आणि मुलांना खबरदारी कायम राहील

अनलॉक -3 मध्ये, मुले आणि वृद्ध लोकांबद्दलची खबरदारी सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. 65 65 वर्षांहून अधिक वयोवृद्ध लोक, गंभीर आजार असलेले लोक, तीव्र आजार असलेले लोक (जसे मधुमेह, रक्तदाब), गर्भवती महिला आणि दहा वर्षांखालील मुलांना पूर्वीप्रमाणेच घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा लोकांना फक्त खूप महत्वाचे असल्यास किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत घराबाहेर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मास्क घालणे अनिवार्य

पूर्वीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य असेल.ज्यामध्ये अधिक लोक सहभागी असतील अशा कार्यक्रमांवर बंदी असेल. 50 हून अधिक लोकांना वैवाहिक कार्यक्रमात भाग घेण्याची परवानगी नाही. अंत्यसंस्कारात 20 हून अधिक लोकांना सामील होण्यासाठी बंदी असेल. पान, गुटखा, तंबाखू आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी असेल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.