आपल्या सर्वांमधून असे काही लोक आहेत जे दालचिनी शिवाय आपल्या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. दालचिनीचा सुगंध खूप स्ट्रॉंग असतो. दक्षिण भारतपासून ते उत्तर भारतापर्यंत लोक दालचिनीचे सेवन करतात.
मागील काही वर्षांपासून दालचिनीच्या गुणधर्मांमध्ये बदल झाले आहेत. ना आता स्वाद आधी सारखा राहिला ना सुगंध आधी सारख राहिला. ब्लड शुगर लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी आणि हृदय रोगाचा धोका कमी करण्यासाठी डॉक्टर दालचिनीचे सेवन करण्याचा सल्ला देतात. याच्या सेवनाने सौंदर्य देखील वाढते. अधिक करून फेस पॅक आणि स्क्रबमध्ये दालचिनी मिक्स केली जाते.
पण आता दालचिनीमध्ये आधीसारखे गुणधर्म नाही राहले. आधीचे लोक आपल्या बगिच्यात स्वतः दालचिनी लावत होते आणि ताजी दालचिनी वापरत होते. चला तर जाणून घेऊयात की, आपल्या बगिच्यात दालचिनी लावण्याचे फायदे.
मुंग्यांपासून बचाव
मुंग्या रोपट्यांना खाऊन टाकतात म्हणून त्यांना बगीच्यातून हटवणे गरजेचे आहे. मुंग्या पाने खाऊन झाडांची सुंदरता बिघडवतात आणि स्वास्थ्यदेखील बिघडवतात. जर तुमच्या बगीच्यात मुंग्या आहेत तर दालचिनीचे झाड लावा. यामुळे मुंग्यांचे वारूळ तयार होत नाही आणि तुमची झाडे सुरक्षित राहतात.
बुरशी लागत नाही
बुरशीमुळे झाडे वाढण्याच्या प्रक्रियेत अडचणी येतात. अशात तुम्ही दालचिनीचे पावडर उपयोगात आणू शकता. जिथे जिथे बुरशी आहे तिथे हे पावडर घाला. यामुळे बुरशी लवकर नाहीशी होते.
अंकुराचे रक्षण
अंकुर खूप नाजूक असतात. अंकुराचा ऋतूबदल, बुरशी, रोग यांपासून बचाव करावा लागतो. दालचिनी मध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टरीअल गुण असतात. जे या सगळ्या समस्यांपासून बचाव करतात. या शिवाय अशा जागी बी पेरा जिथले वातावरण झाडांसाठी अनुकूल आहे. तेव्हा तुम्हाला दालचिनीची आवश्यकता पडणार नाही.
ग्राफ्टिंगमध्ये मदत
बागवानी करणाऱ्यांना ग्राफ्टिंग बद्दल माहिती असेल. साधारण गोष्ट आहे, झाडाचा कोणताही एक भाग तुटून पडल्यामुळे ते कमजोर होतात. अशात झाडाला दालचिनीमुळे शक्ती मिळते आणि यामुळे झाडं अजून वेगाने वाढतात.
आजारी झाडांसाठी औषध
अन्य जीवांप्रमाणे झाडांना पण जखम होते पण या जखमा लवकर रिकव्हर होतात. झाडांवर रोज दालचिनी पावडर घातल्याने ते रोज ताजेतवाने राहतात. झाडांना पाणी दिल्यानंतर त्यांवर दालचिनी पावडर घाला. 4 ते 5 दिवसांत झाडांचे स्वास्थ्य सुधारेल.
डासांपासून रक्षण
दालचिनी फक्त बगीच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी देखील छान आहे. डासांना दालचिनीचा सुगंध आवडत नाही. जर तुम्ही बगिच्यात दालचिनी पावडर टाकत असालं तर यामुळे डास माश्या लांब पळतील. याप्रकारे तुम्ही डेंग्यू मलेरिया या रोगांपासून पण सुरक्षित राहणार. यामुळे तुमचा बगीचा आणि तुमचे कुटुंबदेखील स्वस्थ राहील. दालचिनी तुमच्या बगीच्याची सुंदरता अजूनंच वाढवेल.
काय आहेत दालचिनीचे औषधी गुणधर्म ?
दालचिनी मध्ये बऱ्याच प्रमाणात एन्टीऑक्सिडेटस असतात. एन्टीमायक्रोबियल, एन्टी क्लोटिंग आणि ड्यूरेटिक्स इत्यादी गुण आहेत. दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात मॅगनिज, चोथा, लोह आणि काही प्रमाणात कॅल्शियम असतं. दालचिनीत भरपूर औषधी गुणधर्म आहेत. लवंगेप्रमाणे दालचिनीचंही तेल काढलं जातं. सिनॅमल्डिहाइड, सिनॅमिल अँसिटेट आणि सिनॅमिल अल्कोहोल ही या तेलामधील प्रमुख रसायनं आणि इतर काही रसायनं दालचिनीला औषधी गुणधर्म देण्यास कारणीभूत असतात.
दालचिनी शरीरातील पोलीफिनोल आणि इन्सुलिन हे संप्रेरकांच प्रमाण वाढवत आणि त्याच बरोबर कोलेस्ट्रोल कमी करतो, त्यामुळे हृदयासंबंधी चे आजार होत नाहीत. दालचिनी हि शरीरातील मेद कमी करून रक्त शुद्धीकरणाचे काम योग्य प्रकारे करते.
कोणत्या शारीरिक व्याधींवर दालचिनी करते इलाज ?
वेगवेगळ्या चमचमीत पदार्थाच्या माध्यमातून दालचिनी आपल्या पोटात जात असते. पण ही दालचीन नुसतीच पदार्थाची चव वाढवत नाही तर ते आरोग्यासाठीही वरदान आहेत. अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी आहे. म्हणून डॉक्टरसुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला देतात.
1. ह्दय विकार ठेवते नियंत्रणात
ह्रदयविकारावर दालचिनी अत्यंत गुणकारी आहे. दालचिनीमुळे तुमचा रक्त पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असू द्या. त्यामुळे ह्रदयविकार नियंत्रणात राहते
2. डायबिटीस ठेवते नियंत्रणात
शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे कामही दालचिनी करत असते. त्यामुळे डायबिटीझमधील दुसऱ्या प्रकारात इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्याचे काम दालचिनी करते. त्यामुळे नित्य सेवनात असावी.
3. वजन ठेवते नियंत्रणात
महिलांच्या आयुष्यात अनेक शारिरीक बदल होत असतात. शारिरीक बदलांमुळे वजन कमी जास्त होत असते. तुमचेही वजन असंतुलित झाले असेल तर तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्याचे कामही दालचिनी करते. जर तुम्हाला वजन नियंत्रणात आणायचे असेल तर दालचिनी चहा करुन प्या. १ कप गरम पाण्यात दालचिनी पावडर घालून ते पाणी ३० मिनिटे तसेच ठेवा. पाणी थंड झाल्यानंतर त्यात एक चमचा मध घाला. (गरम पाण्यात मध घालू नका. कारण त्यातील चांगले घटक कमी होतील) हे पाणी रोज प्या तुमचे वजन कमी होईल.
4. डोकेदुखी आणि अंगदुखी ठेवते दूर
दालचिनीमुळे तुमची डोकेदुखी आणि अंगदुखीदेखील कमी होण्यास मदत होते. तुम्हाला दालचिनीपावडरची पेस्ट तयार करुन तुम्हाला तुमच्या डोक्याला लावून ठेवायची आहे. साधारण ३० मिनिटे तुम्हाला ही पेस्ट डोक्याला लावून ठेवायची आहे. तुम्हाला ही पेस्ट लावल्यानंतर थोडे जळजळल्यासारखे वाटेल. पण ही पेस्ट काढून टाकल्यानंतर तुमची डोकेदुखी थांबेल अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला अंग दुखत असेल तर अशीच पेस्ट करुन तुमच्या दुखणाऱ्या भागावर लावायची आहे.