fbpx
4.7 C
London
Wednesday, December 7, 2022

Amazonने पुन्हा आणली भन्नाट ऑफर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 60 % सूट तर महागडे मोबाईलही वाजवी दरात

Amazon आपल्या ग्राहकांसाठी नेहमीचं नवनवीन योजना आणत असते त्याच प्रमाणे आता Amazonने आपल्या प्राइम कस्टमर्ससाठी 6 आणि 7 ऑगस्ट रोजी Amazon Prime Day Saleचे आयोजन केले आहे. बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून या सेलला सुरुवात झाली आहे. तर ही ऑफर 7 तारखेला रात्री 12 पर्यंत प्राइम कस्टमर्सना सर्विस देणार आहे.

या योजनेत ग्राहकांना उत्पादनांवर 70 टक्के पर्यंतचे डिस्काउंट मिळणार असून खरेदीवेळी HDFC बँकेचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि EMIवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट देखील मिळणार आहे. याव्यतिरिक्त नो कॉस्ट EMI, एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे.

प्राइम डे सेलमध्ये Xiaomi OnePlus, आणि सोनीचे लेटेस्ट स्मार्टफोन आणि इलेक्ट्ऱॉनिक तसंच Amazon डिव्हाइस (Echo, Fire TV आणि Kindle e-readers)सह अनेक प्रोडक्ट्सवर चांगले डील मिळत आहे. इको फॅमिलीमधील सर्वात प्रसिद्ध व्हॉइस कंट्रोल स्मार्ट स्पीकर Echo Dot आहे, जो स्लीकआणि कॉम्पॅक्ट डिझाइनसह येतो.

किचन प्रोडक्ट्सवर 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिले जात आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मिक्सर ग्राइंडर, किचन कुक वेअर सेट, वॅक्यूम क्लीनर, गॅस स्टोव्ह, किचन स्टोरेज, वॉटर प्यूरीफायर इ. वस्तूंवर देखील ऑफर आहेत. सेलमध्ये 10000 रुपयांपर्यंत काही फोन देखील उपलब्ध आहेत.

सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि अ‍ॅक्सेसरीजवर देखील 60 टक्के सूट दिली जात आहे. यामध्ये Boat Airpods 441 ची किंमत 5,999 रुपयांऐवजी केवळ 1,999 रुपये करण्यात आली आहे. Sony Alpha 5100L कॅमेऱ्याची किंमत 38,690 रुपयांऐवजी 28,990 रुपये करण्यात आली आहे. व्हिवो V19 नुकताच लाँच करण्यात आला होता. उत्तम कॅमेरा असणारा हा फोन 30,990 रुपयांना आहे, या सेलमध्ये ग्राहक हा फोन 6000 रुपये डिस्काउंटनंतर 24,990 रुपयांना खरेदी करू शकतात.

सेलमध्ये लॅपटॉप 35 हजारांच्या एक्सचेंज ऑफरवर देखील खरेदी करता येतील. यावर नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील उपलब्ध आहे. Samsung Galaxy M31 स्मार्टफोन देखील सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येत आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 16,499 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नो कॉस्ट इएमआयचा पर्याय देखील यावर उपलब्ध आहे.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here