चायनाच्या अॅॅप्सनंतर कलर टेलेव्हिजनवरही बंदी, देशांतर्गत उत्पादनास देणार प्रोत्साहन : भारत सरकार
चीनी अॅॅप्सच्या बंदी नंतर भारत सरकारने चीन मधून आयात होणाऱ्या कलर टेलेव्हिजनवर देखील बंदी घातली आहे. टेलिव्हिजनच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि चीनसारख्या देशांकडून आवश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.
परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. त्यात म्हटले आहे, “कलर टेलिव्हिजनचे आयात धोरण हे मुक्त वरून प्रतिबंधित केले आहे.
36 सेमी ते 105 सेमी पतच्या स्क्रीन आकारासह 63 सेमी पेक्षा कमी स्क्रीन आकारासह एलसीडी टेलिव्हिजन सेटसह रंगीन टेलिव्हिजन संचावर ही आयात बंदी लागू आहे.
कोणतीही वस्तू प्रतिबंधित आयातीच्या श्रेणीत ठेवण्याचा अर्थ म्हणजे वरील वस्तूंच्या आयातदारास वाणिज्य मंत्रालयाच्या डीजीएफटीकडून आयात करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. भारतात टीव्ही निर्यात करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये चीन, व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, कोरिया, इंडोनेशिया, थायलँड आणि जर्मनी यांचा समावेश आहे.
2019-20 मध्ये भारताने 78.1 दशलक्ष किंमतीचे रंगीत टीव्ही आयात केले. गेल्या आर्थिक वर्षात व्हिएतनाम आणि चीनची आयात अनुक्रमे 42.8 दशलक्ष आणि 29.3 दशलक्ष होती.
भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे चीनला नक्कीच मोठा आर्थिक फटका बसणार आहे. जग भारताकडे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची बाजारपेठ म्हणून पाहते. खासकरून अनेक चायनीज वस्तू या मोठ्या प्रमाणात आयात करून विकल्या जातात. टेलीव्हिजन, मोबाईल, स्मार्टफोन्स, आदि. इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतीय बाजारात जास्त करून चायनीज बनावटीच्या असतात. मात्र भारत-चीन सीमाभागात असलेल्या गलवान खोऱ्यात सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक घटनेनंतर भारताने चीनप्रति संताप व्यक्त करत आता भारतीय बाजार पेठेतून त्यांना हुसकावून लावण्याचा निर्णय घेतला आहे.