fbpx
3.5 C
London
Wednesday, December 7, 2022

Google आणि Apple च्या आधी शाओमी यूजर्सला मिळणार ‘बॅक टॅप’ फीचर

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी कडून ग्राहकांना MIUI 12 अपडेट मिळण्यास सुरवात झाली आहे. या अपडेटमध्ये कंपनी एक फिचर  देखील देत आहे, जे अद्याप Apple आयफोन आणि गुगलच्या पिक्सेल मालिकेच्या डिव्हाइसमध्ये उपलब्ध नाही. MIUI 12 च्या बिल्डमध्ये, XDA डेवेलपर्स या फिचरसाठी कोड मिळाला आहे आणि नवीन माहिती समोर आली आहे.

गुगल आणि प्रीमियन टेक कंपनी Apple या दोन्ही सर्च इंजिन कंपनी एका नवीन फिचरवर काम करत आहेत, पण आधी हे फीचर शाओमी देऊ शकेल. चीनी कंपनी शाओमीने स्मार्टफोनमध्ये एक नवीन MIUI अपडेट प्रदान केले आहे, ज्यामध्ये अनेक उत्कृष्ट फिचर  आणि चांगले इंटरफेस ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. XDA डिवेलपर्सच्या म्हणण्यानुसार, जे फिचर शाओमीला मिळणार आहे ते अद्याप Google पिक्सल आणि Apple आयफोनमध्ये उपलब्ध नाही.

XDA डेवेलपर्सने शाओमी कस्टम इंटरफेस MIUI 12 च्या बीटा बिल्डचे टियरडाउन केले आणि नवीन फिचर  कोड प्राप्त केला आहे. शाओमी ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या या फीचरच्या मदतीने फोनच्या मागील पॅनलवर टॅप करून डिव्हाइस ऑपरेट करता येणार आहे. नवीन फिचरशी संबंधित नवीनतम अहवाल डेवेलपर्सने शेयर केला आहे आणि तो ऍक्टिव्ह डेव्हलोपमेंट असल्याचे म्हटले आहे. शाओमीने मे मध्ये  नवीन MIUI 12 ची घोषणा केली आणि ती लवकरच सर्व ग्राहकांसाठी आणली जाईल.

असं असणार नवीन फिचर

नवीन फिचरला ‘बॅक टॅप’ असे नाव देण्यात आले आहे आणि ते फोनच्या सेटिंग्जमधील ‘बटण शॉर्टकट’ विभागात आढळेल. ग्राहक फोनच्या मागील पॅनेलवर डबल टॅप आणि ट्रिपल टॅपद्वारे भिन्न क्रिया करण्यास सक्षम असतील. उदाहरणार्थ, या वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते डबल टॅपद्वारे स्क्रीनशॉट घेण्यास सक्षम असतील, तर तिहेरी टॅप कॅमेरा उघडू शकेल. या फंक्शनमध्ये, वापरकर्त्यांना फ्लॅशलाइट चालू करणे आणि आवडते अ‍ॅप उघडणे असे पर्याय मिळतील.

लवकरचं येतंय MIUI च अपडेट

Apple आयओएस 14 आणि गुगल अँड्रॉईड 11 साठी बॅक टॅप फीचर साठी काम करत आहे. या वैशिष्ट्याशी संबंधित तपशील Android 11 च्या डेव्हलपर प्रिव्यू मध्ये प्रकट झाला आहे. शाओमी वापरकर्त्यांसाठी हे वैशिष्ट्य अँड्रॉइड 11 पूर्वी मिळणे ही चांगली बातमी आहे आणि या महिन्याच्या सुरूवातीस, रेडमी के 20 आणि रेडमी के 20 प्रो ने MIUI 12 ची स्थिर अपडेट प्राप्त करण्यास सुरवात केली आहे.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here