कोरोना काळात अनेकांनी सार्वजनिक वाहतूक नको खाजगी गाडी बरी असे म्हणत वाहन खरेदीला पसंती दिली आहे. कोरोनामुळे ठप्प झालेले बाजार आता पुन्हा एकदा खुले होत असून बाजारात वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने म्हटले आहे की, या साथीच्या काळात लोक सार्वजनिक वाहतुकीऐवजी त्यांची कार वापरू इच्छित आहे. त्यामुळे लोक कार खरेदी करण्यासाठी येणारे चांगले मुहूर्त गाठून शोरूम्स मध्ये गर्दी करत आहेत.
कंपनी म्हणाली की, अर्थातच जुलै महिन्यात वाहनांच्या विक्रीत सुधारणा झाली आहे, परंतु सणासुदीच्या हंगामाचा कल या कोरोना संकटाची परिस्थिती कशी आहे यावर अवलंबून असेल. या व्यतिरिक्त वाहनांची मागणी दीर्घकाळ अर्थव्यवस्थेच्या पायावर अवलंबून असते.
मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक (विक्री व विपणन) शशांक श्रीवास्तव यांनी या नव्या ट्रेंडबद्दल सांगितले की, याचा अर्थ असा की, आता लोक सार्वजनिक वाहतुकीऐवजी त्यांची गाडी वापरण्यास प्राधान्य देतात. काही काळ लोकांची उत्पन्नाची पातळीही कमी झाली आहे. यावरून असे दिसते की, या हालचाली मागणीच्या खाली जाणार्या आहेत. आतापर्यंत येणारी आकडेवारीही तीच दाखवते.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पहिल्यांदा कार खरेदी करणार्यांची संख्या मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत 5.5 टक्क्यांनी वाढून 51-53 टक्के झाली आहे.
कोरोनाच्या आधी वाहने खरेदीची चौकशीही 85 ते 90 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. यामध्ये 65 टक्के ग्राहक मिनी आणि कॉम्पॅक्ट कारला पसंती देत होते. जुलैमध्ये मारुतीच्या मिनी कार – ऑल्टो आणि एस-प्रेसोची विक्री 49.1 टक्क्यांनी वाढून 17,258 वाहनांवर पोहोचली आहे.
कोरोनाच्या संक्रमणा नंतरचे जग हे निश्चितचं बदलेले असेल. ज्यामध्ये नागरिक संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यास अधिक दक्ष असतील. भारतात सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना अनेकदा गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोरोना सारख्या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र हाच संसर्ग टाळण्यासाठी नागरिक आता खाजगी वाहनांना पसंती देतील.