नक्की वाचा! का आहे इतर धातूंपेक्षा सोनं महागडं?

0

सोनं ही सर्वांच्या आवडीची गोष्ट आहे. आधी या धातूचा वापर मुद्रा म्हणून करत होते. पण आता सोन्यापासून इतरही वस्तू बनवल्या जातात. खासकरून सोनं महिलांच्या आवडीचे आहे. सोन्याचे सुंदर, रेखीव दागिने घालणे भारतीय स्त्रियांना खूप आवडते. पण सोन्याच्या किमती आज आभाळाला जाऊन पोहोचल्या आहेत. आता तर स्त्रिया बजेट जाहीर होण्याआधी पण सोन्याच्या किमती कमी करा, अशीदेखील मागणी करतात. अहो, हसू नका खरंच आहे ते. सोन्याची किंमत कमी-जास्त होत असते, त्यामुळे तेव्हा लोक सोनं खरेदी करून ठेवतात. मग तेच सोनं किंमत वाढल्यावर नफ्याने विकतात. पण प्रश्न असा आहे की, सोनं च का? इतर धातूंपेक्षा सोनंच इतकं महागडं का आहे?

#Gold : काय आहे नेमकं सोन्याचं आणि अंतराळाचं कनेक्शन ? माहित नसेल तर पटकन वाचा

सोने हे एक असे धातू आहे ज्यात मनुष्याला नेहमीच रस असतो. जास्तकरून देश आपली अर्थव्यवस्था संभाळण्यासाठी सोन्याची खरेदी आणि उत्पादन करतात. भारतात सोन्याला खूप मागणी आहे, कारण भरपूर वर्षांपासून दागिने-आभूषणे बनवायला लोक सोनं वापरतात. आता ही गोष्ट तर जगजाहीर आहे की, ज्यात लोकांना जास्त रस असतो आणि जी गोष्ट पृथ्वीवर दुर्लभ असते. यामुळेच त्या वस्तूची किंमत वाढते आणि ती वस्तू जास्त महागडी होते. तसेच सोनेदेखील पृथ्वीवरील दुर्लभ धातू आहे. असे असूनही आज या धातूची मागणी वाढतंच चाललेली आहे. कारण हा एक असा धातू आहे ज्याची खरेदी-विक्री करणे, या दोन्ही गोष्टी फायद्याच्या आहेत. म्हणून व्यापार दृष्टीने सोने खरेदी-विक्री करणे महत्त्वाचे मानले जाते. सोनं महाग असण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे.

सोने हे एक असे धातू आहे जे प्रकृतीमधून शुद्धरूपात कधीच मिळत नाही. सोन्याला शुद्ध करण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. या प्रक्रिया करणे खूप महागडे आहे. सोन्याचे उत्पादन करण्यासाठी जटिल प्रक्रिया कराव्या लागतात. या कारणाने देखील सोन्याच्या कींमती वाढतात.  बऱ्याचदा सोने समूद्रातून मिळवले जाते. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यास किती मेहनत आणि पैसे खर्च होत असतील याचा तुम्हीही अंदाज बांधू शकता.

सुंदर वस्तूंचे मनुष्याला नेहमीच आकर्षण असते. मनुष्याला म्हणण्यापेक्षा स्त्रियांना या वस्तू जास्त आकर्षित करतात, हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सोनं हे स्वतःमध्येच एक सुंदर धातू आहे ज्याचा वापर वस्तूंना जास्त सुंदर बनवण्यासाठी केला जातो. सोन्याला स्वतःची चमक आहे आणि म्हणूनच सोनं हे आकर्षणाचं केंद्र झालं आहे. सोन्याच्या या वेगळ्या गुणधर्मांमुळे सोनं महाग आहे.

त्याबरोबरच या धातुवर वातावरणाचा कुठलाही परिणाम होत नाही. सोन्याची सुंदरता कुठल्याही परिस्थितीत कमी होत नाही. बहुतेक लोक सोने खरेदी करून सुरक्षित इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात. कारण सोन्याचे भाव नेहमी आभाळाला टेकलेले असतात. लोक आपल्या कठीण काळात गोल्ड-लोन देखील घेतात. लोक सोने खरेदी करून भविष्यात किंमत वाढल्यावर ते विकून पैसे मिळवू शकतात. देशात कुठेही सोन्याची खरेदी-विक्री करता येते. सोने इन्व्हेस्टमेंट म्हणून अधिकाधिक खरेदी केले जाते. सोन्याचे भाव जास्त असण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

जगात कुठे आहे सर्वात जास्त सोने?

जगात सर्वांत जास्त सोनं दक्षिण आफ्रिका आणि भारतात आढळतं. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये जगातली सर्वांत मोठी सोन्याची खाण आहे. विटवॉटर्सरँड खोऱ्यातून जगाला सर्वांत जास्त सोनं मिळतं. आणि या खोऱ्याच्या 40 टक्के भागात अजूनही उत्खनन झालेलं नाही.

भारतात तर सोन्याच्या खाणीचं नव्हत्या, मग का म्हणायचे भारताला ‘सोने की चिडीया’? घ्या जाणून

सोन्याची किंमत कशी ठरते?

सोन्याची किंमत लंडनमधून ठरते. ‘लंडन बुलियन मार्केट’मध्ये ज्या दिवशी व्यवहार सुरू असतात त्यादिवशी दोन वेळा सोन्याची किंमत ठरवली जाते. लंडनच्या वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता आणि दुपारी 3 वाजता ही किंमत ठरवली जाते. या पद्धतीला ‘लंडन गोल्ड फिक्स’ म्हणतात. अशा पद्धतीने ठरवलेल्या सोन्याच्या दराला जगभरातील इतर मार्केट्समध्ये मान्यता आहे.

भारतात सोनं कुठे सापडते?

भारत जगातील सोन्याची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. भारतात सर्वांत जास्त दागिने विकले जातात. तज्ज्ञांच्या मते भारतात सोन्याला भावनिक महत्त्व आहे. त्यामुळे इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक पटीनं भारतात सोनं विकलं जातं. भारतात सध्या सोन्याच्या तीन खाणी आहेत. त्या खाणी कर्नाटकाच्या हुट्टी, उतीमध्ये आणि झारखंडच्या हिराबुद्दिनी येथे आहेत. गेल्या काही वर्षांपासून या तीनही खाणींमधलं उत्खनन कमी झालं आहे. त्यामुळे भारताला आता सोनं आयातीवर अवलंबून राहावं लागतं. 2001 मध्ये कर्नाटकातील कोलार खाण बंद करण्यात आली. जगात सोन्याच्या मोठ्या खाणींपैकी ती दुसऱ्या नंबरची खाण होती.

#प्राचीन_महाराष्ट्र : शिखरापासून पायापर्यंत बांधलेल्या कैलास मंदिराची कथा तुम्हाला माहितीये का ?

 

Leave A Reply

Your email address will not be published.