तुम्ही सुद्धा PUBG खेळता का? ‘हा’ गेम चिनी आहे की साऊथ कोरियन? याचा डेटा कुठे स्टोअर होतो ?

0

भारत सरकारने अलीकडेच 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. त्यात आता सरकारने पुन्हा एकदा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही चीनी अ‍ॅप्‍स बॅॅन करण्यासाठी सूचीबद्ध केले आहेत. त्यात PUBG या लोकप्रिय गेमचाही समावेश आहे.सूत्रांच्या माहितीनुसार 250 हून अधिक चिनी अ‍ॅप्सची यादी तयार केली जात आहे.

भारतात PUBG मोबाइलवर बंदी घातली जाऊ शकते का? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे.  हा अ‍ॅपदेखील चिनी अ‍ॅप्सच्या प्रकारातील आहे का? डेटा सुरक्षितता आणि गोपनीयता यावर हे अॅप कुठं उभे आहे? या लेखात, आम्ही आपल्याला अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

PUBG चीनी अॅप की दक्षिण कोरियन अॅप?

PUBG मोबाईल बद्दल आधीपासूनच चर्चा आहे की ते चायनीज अॅप आहे की दक्षिण कोरियन अॅप आहे? याचे कारण असे आहे की, ही अॅप बनविणारी कंपनी ब्लूहोल आहे, ती चीनची नसून दक्षिण कोरियाची आहे. प्लेअर अंनोन बॅटलग्राउंड म्हणजेच PUBG मल्टी प्लेयर गेमिंग जे ब्लूहोलने तयार केले आहे. ही कंपनी दक्षिण कोरियन ब्ल्यूहोल स्टुडिओची सहाय्यक कंपनी आहे. गूगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर PUBG मोबाइल गेम 2018 मध्ये रिलीज झाला.

PUBG व्हिडिओ गेम अधिकाधिक लोकप्रिय झाला होता आणि यामुळे, चीनमधील हा गेम सुरू करण्यासाठी आणि कंपनीमध्ये भागीदारी खरेदी करण्यासाठी चीनचे सर्वात मोठे व्हिडिओ गेम पब्लिशर, टेंन्सेन्ट गेम्स यांनी दक्षिण कोरियन ब्ल्यूहोलशी या गेमला चायना मध्ये लॉन्च करण्यासाठी स्टेक्स खरेदी केले.

चीनी कंपनी टेंसेंटची झाली एन्ट्री

चीनी कंपनी टेंन्सेन्ट गेम्सने ब्लूहोचे स्टेक खरेदी केले. त्यानंतर PUBG मोबाइल व्हर्जन टेंन्सेन्टने विकसित केले. यानंतर, टेंन्संट PUBG मोबाइलचा पब्लिशर झाला. तेव्हापासून, चिनी कंपनी असलेल्या टेनसंटचा लोगो PUBG मोबाइलवर देखील दिसतो.

एक बाब अशी आहे की, PUBG आणि PUBG मोबाइलमध्ये फरक आहे. या दोघांच्या पब्लिशरमध्ये फरक आहे. चीनमध्ये ब्लूहोलने टेंन्सेंटसमवेत PUBG मोबाइल बाजारात आणला.

हा अ‍ॅप प्रायव्हसी फ्रंटवर कोठे येतो?

PUBG मोबाइलचे प्रायव्हसी आणि पॉलिसी हे इतर अॅप्ससारखेच आहे. जे वापरकर्त्यांकडून बर्‍याच महत्त्वपूर्ण आणि अनावश्यक माहितीमध्ये प्रवेश करते.

PUBG मोबाइलचे प्रायव्हसी पॉलिसी म्हणते की कंपनीचे सर्व्हरही भारतात आहेत आणि इथल्या वापरकर्त्यांचा डेटा त्याच्या सर्व्हर्समध्ये साठवला आहे. तथापि, त्याचे सर्व्हर चीनमध्येही आहेत. तसेच, कंपनी यूएस आणि सिंगापूरमधील सर्व्हरवरही काही डेटा देखील संचयित करते.

आपला डेटा तृतीय पक्षासह सामायिक केला जाऊ शकतो

कंपनी PUBG मोबाइलच्या भारतीय वापरकर्त्यांचा डेटा कोणत्याही तृतीय पक्षास देऊ शकते. इथे लिहिले आहे की, ‘आम्ही कोणत्याही तृतीय पक्षाला तुमचा डेटा संकलित करण्यास व वापरण्यास परवानगी देतो, कोणत्याही तृतीय पक्षाच्या वापरकर्त्यांनी कुणाबरोबरही वैयक्तिक माहिती जाहीर करू नये’ याची खात्री करण्यासाठी आम्ही जबाबदार आहोत.

सुरक्षेची हमी नाही

कंपनीच्या धोरणानुसार PUBG वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहिती सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे. परंतु कंपनीने असेही म्हटले आहे की, माहितीची देवाणघेवाण इंटरनेटद्वारे होत असल्याने ती पूर्णपणे सुरक्षित नाही. PUBG मोबाइलच्या म्हणण्यानुसार, कंपनी डेटा संरक्षणासाठी कंपन्या मेजर्स घेते, परंतु तरीही वापरकर्त्यांकडे हस्तांतरित केलेल्या माहितीच्या सुरक्षेची कंपनी खात्री देऊ शकत नाही.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.