ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने एक नवीन सेवा सुरू केली आहे. फ्लिपकार्टची ही नवीन डिलिवरी सेवा आहे. फ्लिपकार्ट क्विक असे या सेवेचे नाव आहे. फ्लिपकार्ट क्विक कंपनी ही हायपर लोकल डिलिव्हरी सेवेमध्ये असणार आहे. या सेवेद्वारे फ्लिपकार्ट 90 मिनिटांत तुमचा माल तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. या सेवेमध्ये आपण आपल्या सोयीनुसार 2-तास स्लॉट बुक करू शकता. या सेवेअंतर्गत ग्राहक दिवसाच्या कोणत्याही वेळी ऑर्डर देऊ शकणार आहेत.
29 रुपये मिनिमम डिलिवरी चार्ज
या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मिनिमम डिलिवरी चार्ज 29 रुपये द्यावे लागेल. सुरुवातीच्या टप्प्यात, बंगळुरूच्या काही भागात ही सेवा उपलब्ध आहे. पुढील काही महिन्यांत ही कंपनी 6 नवीन शहरांमध्ये सेवा सुरू करेल. फ्लिपकार्टची ही सेवा नक्कीच ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय आहे. अमेझॉनबरोबर फ्लिपकार्टची भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. अमेझॉन देखील फ्लिपकार्ट सारख्या सेवा सुरू करणार आहे. मात्र सध्या कोणतीही ई-कॉमर्स कंपनी त्वरित डिलिव्हरी देत नाही.
ई-कॉमर्स पोर्टलला आता पैसे भरल्यानंतर ग्राहकाकडून रद्दीकरण शुल्क आकारता येणार नाही
‘या’ वस्तूंची करू शकता ऑर्डर
या सेवे अंतर्गत आपण 2000 हून अधिक उत्पादनांची ऑर्डर करू शकता. किराणा,डेरी, मीट, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक एक्सेसरी आणि स्टेशनरी यासारख्या वस्तूंची ऑर्डर केली जाऊ शकते. या सेवेअंतर्गत कंपनी सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत वितरण करेल. सध्या फ्लिपकार्ट प्लसच्या सदस्यांना एक दिवसाची डिलिव्हरी मिळते. म्हणजेच, ऑर्डर दिल्यानंतर एक दिवसानंतर, त्यांचा माल ग्राहकांना दिला जातो.
ऍडव्हान्स लोकेशन मॅपिंगचा वापर
या सेवेसाठी फ्लिपकार्ट अॅडव्हान्स लोकेशन मॅपिंगचा वापर करेल. जेणेकरून त्यांची ऑर्डर कमीतकमी वेळात ग्राहकांपर्यंत पोचविली जाऊ शकेल. अॅडव्हान्स लोकेशन मॅपिंगद्वारे तुम्हाला ग्राहकांच्या स्थानाविषयी अधिक माहिती मिळेल, जेणेकरून डिलिव्हरी थोड्या वेळात सहज करता येईल. अशी ही सेवा आहे.