MG मोटरने आणली धाक्कड SUV गाडी, फॉर्च्युनर आणि फोर्ड एंडेव्हरचे खाऊ शकते मार्केट

0

भारतीय वाहन बाजारात नव्याने आलेल्या MG मोटर्सने अल्पावधीतचं बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे. Hector या बहुचर्चित गाडीने इतर कंपन्यांच्या गाड्यांना मागे टाकले आहे. त्यात आता MG मोटर भारतीय बाजारात आपल्या उत्पादनाची श्रेणी वाढवित  आता MG 7 सीटर प्रीमियम SUV ग्लॉस्टर बाजारत आणत आहे. ऑटो एक्स्पोमध्ये MG ग्लॉस्टरला प्रदर्शित करण्यात आले. सणासुदीच्या मुहूर्तावर MG मोटारने आपली ही नवी गाडी बाजारत आणण्याचा विचार केला आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये ग्लॉस्टर थेट टोयोटा फॉर्च्युनर आणि फोर्ड एंडेव्हरशी स्पर्धा करेल. नुकतेच चाचणी दरम्यान ग्लॉस्टरला स्पॉट केले गेले.

काय आहे खासियत ?

एमजी ग्लॉस्टर चीनमध्ये उपलब्ध असलेल्या मॅक्सस डी 90 वर आधारित आहे. ही गाडी फॉर्च्युनर आणि एन्डेव्हरपेक्षा साईजने मोठी आहे. ग्लॉस्टरची लांबी 5005 मिमी, रुंदी 1932 मिमी आणि उंची 1875 मिमी आहे. त्यामुळे गाडी दिसायला भारी भक्कम दिसते.

ग्लॉस्टर फ्रंटला क्रोम स्लॅटसह ऑक्टागोनल ग्रिल, एलईडी डीआरएलसह स्वीपबॅक एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, गोल क्रोम बेझलसह फॉग लॅम्प्स आणि एक स्कल्प्टिड बम्पर आणि हूड मिळतो. ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, बोल्ड शोल्डर क्रिसेस, विंडो लाईन भोवती क्रोम, रूफ रेल्स, क्रोम डोर हँडल्स व एलईडी टेललॅम्प एसयूव्हीचा लुक आणखीनचं वाढवतात.

लीक झालेल्या फोटोंमधून हे उघड झाले आहे की ग्लॉस्टरचे बहुतेक डिझाइन घटक मॅक्सस डी 90 मधून घेतले गेले आहेत. ग्लॉस्टर एसयूव्हीमध्ये एमजीची कनेक्ट केलेली कार आयएसमार्ट टेक्नॉलॉजी असेल.

तसेच फ्लॅट बॉटम 3-स्पोक स्टीयरिंग व्हील, Apple कारप्ले आणि 10.1-इंचाची टचस्क्रीन सनरूफ, वॉइस कमांड आणि लेदर सीट अपहोल्स्ट्री सारखे फीचर्सही मिळणर आहेत.

पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात 2.0-लीटरचे टर्बो-पेट्रोल इंजिन मिळेल, ज्यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्स पर्याय आहेत. हे इंजिन 220bhp पॉवर आणि 360Nm टॉर्क जनरेट करते. एमजी ग्लॉस्टर बाजारत लवकरचं येऊ शकते. याची किंमत साधारण 35 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

ग्लॉस्टर देऊ शकते का  फॉर्च्युनर आणि फोर्ड एंडेव्हर टक्कर ?

फॉर्च्युनर आणि फोर्ड एंडेव्हर या दोन SUV गाड्या सध्या भारतीय बाजारात  आपल्या दणकट लुकने अनेक ग्राहकांना आकर्षित करत आहेत. भारतीय बाजारात फॉर्च्युनर आणि फोर्ड एंडेव्हरची भलतीचं क्रेझ आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, MG ग्लॉस्टरचे बेसिक मॉडेल हे 35 लाख रुपयांपर्यंत  असू शकेल. तेच बेसिक फॉर्च्युनरची कंपनी प्राईज  30.19 लाख   आहे. तर  फॉर्च्युनरचे टॉप मॉडेल हे 33.95 लाखांचे आहे. जर आपण  फोर्ड एंडेव्हरची किंमत पाहिली तर कंपनीची बेसिक प्राईज 32.75 लाख आहे. त्यामुळे MGची ग्लॉस्टर फॉर्च्युनर आणि फोर्ड एंडेव्हरला टक्कर देईल का ?  हे पाहणे औत्सुक्याचं असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.