रक्षाबंधन स्पेशल : मुलांनो बहिणाला काय गिफ्ट देयचं या विचारात आहात ? तर ‘या’ आहेत खास टिप्स

0

रक्षाबंधन हा सण जवळ येत आहे. मुलांना आता बहिणींना भेट म्हणून काय द्यावे असा मोठा प्रश्न पडला असेल. तुम्हीही अशाचं काहीशा गोंधळात पडलेले असाल याची आम्हाला खात्री आहे. म्हणूनचं रक्षाबंधनाला तुमच्या बहिणींच्या चेहऱ्यांवर हास्य उमटवण्यासाठी आम्ही तुमची थोडीफार तर मदत करू शकतो.

चला तर बघूयात रक्षाबंधनला तुमच्या लाडक्या ताईला देण्यासाठी खास गिफ्ट्स …

OTT प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन

लॉकडाऊन सुरू आहे. घरी सर्वांना बोर होत असते. आता नवीन चित्रपट देखील OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. तुम्ही तुमच्या बहिणीला भेटवस्तू म्हणून OTT प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन देखील देऊ शकता.

OTT

स्मार्टवॉच

मुलींनाही वॉचेस खूप आवडतात. जर तुम्ही गॅझेट देण्याचा विचार असालं तर आपण आपल्या बहिणीला स्मार्टवॉच गिफ्ट करू शकता. त्यांना ते खूप आवडेल. 1 हजार ते 3 हजारांच्या श्रेणीत तुम्हाला स्मार्टवॉच मिळतील.

Smart Watch

पॉवरबँक

आजकाल कोणालाही स्मार्टफोनपासून एक मिनिटही दूर रहाण्याची इच्छा होत नाही, म्हणून आपल्या प्रिय बहिणीला पॉवरबँकदेखील भेट म्हणून दिली जाऊ शकते. 700 ते 1500 रुपयांपर्यंत 11000 ते 20000 एमएच पर्यंतचे पॉवरबँक मिळून जाईल.

Power Bank

हॉटस्पॉट डिव्हाइस

जर तुमची ताई घरी किंवा बाहेर नेहमी इंटरनेटच्या संपर्कात राहणारे ऑफिशीअल काम करत असेल. तर जियो फाय किंवा एअरटेल हॉट-स्पॉट डिव्हाइस भेट म्हणून देऊ शकता. यामार्फत, इंटरनेटचा वापर घरी किंवा बाहेरून सहजपणे केला जाऊ शकतो. याची किंमत 1 हजार रुपयांच्या जवळ आहे.

hot spot

इन्स्टंट कॅमेरा

आधीपासूनच मुलींना स्वत: ला बघणे खूप आवडते आणि स्मार्टफोन आल्यापासून तर ही क्रेझ जास्तच झाली आहे. दिवसभर त्या अनेक वेळा सेल्फी क्लिक करत असतात. अशा परिस्थितीत आपण बहिणींना इन्स्टंट कॅमेरा गिफ्ट करू शकता.

फिटनेस बँड

मुली आपल्या फिटनेसला घेऊन भरपूर चिंतेत असतात. तुम्ही देखील आपल्या बहिणीच्या आरोग्याची काळजी घेऊ इच्छित आहात. तर आपण त्यांना फिटनेस बँड गिफ्ट करू शकता. आपल्याला 1500 रुपयांमध्ये चांगला फिटनेस बँडही मिळेल. जसे की एमआय आणि एचआरएक्सचा फिटनेस बँड.

Fitness Band

Leave A Reply

Your email address will not be published.