…म्हणून भारतात नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार आणि Amazon प्राइमचे स्बस्क्रीपशन स्वस्त
भारत ही जगाची सर्वात मोठी बाजार पेठ आहे असे आपण बरेचदा ऐकतो. त्यामुळे जगातील प्रत्येक उत्पादन (प्रोडक्ट) भारतीय बाजारात आणले जाते. त्यात सिने क्षेत्र देखील आले. सध्या भारतात ऑनलाइन स्ट्रीमस अॅप्स मोठ्या प्रमाणत चालतात. त्यामध्ये नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार आणि Amazon प्राइम हे अग्रगण्य असणारे OTT प्लॅॅटफॉर्म आहे. मात्र एका रिसर्चमधून असे समोर आले आहे की, अमेरिकेच्या तुलनेत जगातील हे आघाडीचे OTT प्लॅॅटफॉर्म भारतात खूप स्वस्त दारात विकले जातात. इतके स्वस्त की अमेरिकेच्या तुलनेत 140% स्वस्त दारात याचे स्बस्क्रीपशन भारतीयांना मिळते.
फाइंडर डॉट कॉमनुसार नेटिफ्लिक्स, Amazon प्राइम, डिस्ने + हॉटस्टार या अग्रगण्य अॅप्सची सरासरी मासिक सदस्यता शुल्क भारतात बरीच स्वस्त आहे. या तीन सेवांसाठी अमेरिकेत सरासरी मासिक शुल्क 9.66 डॉलर एवढे आहे, परंतु भारतात केवळ 2 डॉलर्स इतके स्वस्त आहे.
नेटफ्लिक्स, Amazon प्राइम, डिस्ने + हॉटस्टार यांची 13 देशांमधील मासिक योजनेची सरासरी किंमतीची गणना केली गेली. यामध्ये ही माहिती समोर आली. नेटफ्लिक्स, Amazon प्राइम, डिस्ने + हॉटस्टारच्या मासिक वर्गणीसाठी 5 देश सर्वात महाग आहेत. अमेरिका, यूके, स्वित्झर्लंड, स्पेन आणि न्यूझीलंड या देशांमध्ये या OTT प्लॅॅटफॉर्मचे स्बस्क्रीपशन महाग आहे. तर भारत, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या घनदाट लोकसंख्या असलेल्या देशात हेच स्बस्क्रीपशन सर्वात जास्त स्वस्त आहे.
या मागचे मुख्य कारण हे लोकांची खर्च करण्याची क्षमता ही आहे. अमेरिकेत एखाद्या व्यक्तीचे सरासरी वेतन 4458 डॉलर म्हणजे 3.3 लाख रुपये असते. तर भारतात एखाद्या व्यक्तीचे सरासरी वेतन हे 145 डॉलर्स म्हणजे 11 हजार रुपये असते. त्यामुळे व्यक्ती आपल्या मनोरंजांसाठी कितपत पैसा खर्च करू शकतो याचा अंदाज घेऊन या OTT प्लॅॅटफॉर्म्सने आपले मासिक शुल्क ठरवलेले असते.
त्यानुसार भारतात हे शुल्क कमी आहे. तरी देखील भारतीय आपल्या मासिक वेतनाच्या 2.77% पैसे मनोरंजनासाठी खर्च करतात. तर अमेरिकन व्यक्ती आपल्या वेतनाच्या केवळ 0.50% पैसा मनोरंजांसाठी खर्च करतो.
भारतात लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक असली तरी अमेरिकेच्या मानाने स्बस्क्रीपशन घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेही भारतीय बाजारात OTT प्लॅॅटफॉर्म्सने आपले मासिक शुल्क कमी ठेवले आहे. स्पर्धाही जास्त असल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीही OTT प्लॅॅटफॉर्म्सने आपले स्बस्क्रीपशन स्वस्त केले आहे.