…तर Tik-Tokवर बंदी घालता येणार नाही
जगभरात चिनी अॅप Tik-Tokवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. अमेरिकेतही ही Tik-Tokवर बंदी घालण्याच्या विचार होत आहे. त्यात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञान उद्योग Tik-Tokला हस्तांतरित करून घेईल म्हणजेच करार करेल की अमेरिकेत Tik-Tokवर बंदी येणार नाही.
जूनमध्ये भारत सरकारने Tik-Tokसह 50 हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. भारताने घेतलेल्या या निर्णया नंतर अमेरिकेमध्येही Tik-Tok बंदीचा सूर उमटू लागला. त्या दृष्टीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील याबाबत काही विधानं केली होती.
त्यात त्यांनी असे म्हंटले होते की, आम्ही Tik-Tokच्या केसकडे पहात आहोत, आम्ही Tik-Tokवर बंदी घालू शकतो. आम्ही इतर काही गोष्टी देखील करू शकतो कारण आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. आम्ही टिकटॅकच्या संदर्भात सर्व प्रकारच्या पर्यायांवर विचार करीत आहोत. ”
वॉल स्ट्रीट जर्नल आणि ब्लूमबर्ग यांनी दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की ट्रम्प प्रशासन एक ऑर्डर तयार करत आहे, ज्यात चिनी कंपनी बाईटडन्सला अमेरिकेत आपला व्यवसाय विकायला सांगेल. हे अॅप सुरक्षेच्या दृष्टीकोनातून असुरक्षित आहे, नमूद करून अमेरिकेने Tik-Tok बंदीबाबत विचार सुरु केला आहे.
दुसर्या अहवालात असे म्हटले आहे की आयटी क्षेत्रातील मायक्रोसॉफ्ट कंपनी टिकटॅकचा व्यवसाय करारासाठी बोलणी करत आहे. या अहवालात म्हटले आहे की, या कराराची किंमत 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते.
मात्र हा करार पूर्ण होण्यासाठी अमेरिकेतील परकीय गुंतवणूकी विभाग या कराराचा अभ्यास करून यात कोणताही धोका नसल्याची खात्री करून घेईल आणि मग त्यावर आपला निर्णय देईल. त्यानंतर हा करार होईल.
तथापि, या करारात आतापर्यंत टिकटॉक आणि मायक्रोसॉफ्ट या दोन्ही कंपन्यांकडून कोणतेही अधिकृत निवेदन आले नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Tik-Tokची मालकी असलेल्या बाईटडन्स कंपनीला एक पर्याय देतील. हा पर्याय कंपनी हस्तांतराचा असेल.