लहान मुलांना म्हणजे नवजात बालकांना झोपवणे हे आईसाठी खूपच आव्हानत्मक कार्य असते. बरे बाळ झोपले तरी ते पूर्ण झोप घेईलच याची खात्री नसते. त्यामुळे बाळ जर मध्येच उठले तर ते संपूर्ण घराला डोक्यावर घेईला देखील कमी करत नाही. रडून-रडून ते बाकीच्यांचीही झोप उडवते. त्यामुळे अशा आव्हानात्मक समस्येचा अभ्यास करून अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्कोमधील क्रेडलवाइज या कंपनीने एक स्मार्ट पाळणा बनवला असून हा पाळणा बाळाला झोपवण्याबरोबरच इतर कार्यात देखील मदत करतो.
हा पाळणा बाळाच्या झोपेची काळजी तर घेतोच त्याचबरोबर बाळाच्या झोपेचे एक वेळापत्रक देखील पाळतो. विशेष म्हणजे या पाळण्यात बाळाला एकदा झोपवल्यानंतर आई बिनधास्तपणे तिची झोप पूर्ण करू शकते. बाळ जर मध्येच अर्धवट झोप घेऊन जर उठले तर पाळणा स्वतःच हलू लागतो आणि बाळाला झोपवतो.
बाळाला झोपवण्यासाठी पाळण्यामध्ये काही म्युझीक्स देखील वाजतात. या म्युझीक्स अतिशय मंद आवाजात असतात जेणेकरून बाळ शांत झोपी जाण्यास मदत करते. या पाळण्याच्या मध्यभागी एक स्मार्ट मॉनेटर आहे. तो बाळाच्या हलचालींवर लक्ष ठेवतो. त्यामुळे बाळ जर उठले तर हा स्मार्ट मॉनेटर अलर्ट होऊन आपले हालण्याचे कार्य सुरु करतो.
पाळण्याच्या वरील भागात असलेल्या स्मार्ट मॉनेटरमधील कॅमेराच्या माध्यमातून बाळावर नजर ठेवतो. यामध्ये नाइट व्ह्यू, रोटेट व्हिडिओ आणि केवळ आवाजावर लक्ष ठेवण्याचे पर्याय उपलब्ध आहे.
हा पाळणा इतका स्मार्ट आहे की, बाळ उठण्याची आधी एक नोटीफिकेशन देते. त्यामध्ये बाळ व्यवस्थित झोपले की नाही याचा आढावा असतो. या नोटीफीकेशनमध्ये बाळाने किती तास झोप घेतली आहे याबाबत माहिती असते. तसेच बाळाला झोपवण्याबरोबरच हा पाळणा मोबाइलवरील अॅपवर बाळाच्या झोपेसंदर्भातील सर्व माहिती देतो. यासंबंधित माहिती देणारे एक अॅॅॅॅॅप देखील आहे. हे अॅॅॅॅॅपच सर्व माहिती देत असते.
पाळण्याची रचना
हा पाळणा वजनाला अगदीच हलका असल्याचा दावा कंपनीने केला आहे. आकाराने लहान आणि सहज एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याजोगा आहे. पाळण्याला पूर्ण कव्हर लावण्याऐवजी पारदर्शक जाळी लावण्यात आली आहे. त्यामुळे बाळाच्या हलचालीवर लक्ष ठेवता येते.पाळण्यातील गादी ही फोम पासून बनवण्यात आलेली नसून त्यासाठी नारळाचा काथ्या आणि कच्च्या रबराचा वापर करण्यात आला आहे.
या पाळण्याची किंमत 1499 डॉलर म्हणजेच अंदाजे 1 लाख 12 हजार रुपये इतकी आहे. सप्टेंबर महिन्यापासून हा पाळणा अमेरिकन बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार आहे. या पाळण्याची जाहिरात कंपनीने अतिशय मार्मिक पद्धतीने केली आहे. घरातील बाळ झोपलं तर सर्वांनाच शांत झोप लागेल, त्यामुळे हा पाळणा तुमच्यासाठी फायदेशीर आहे, असा कंपनीने जाहिरातीतून दावाचं केला आहे.