जगात सध्याच्या काळात सर्वात जास्त वेगाने काय बदलत असेल तर ते आहे मोबाईल फोन. रोज नवनवीन तंत्रज्ञान आणि फीचर्स घेऊन मोबाईल कंपन्या बाजारत येत आहेत. आज जग केवळ एका टचवर किंवा एका क्लिकवर आले आहे. मोबाईल हा सध्याचा काळात प्रत्येकाचा सोबती बनला आहे, असंं म्हटलंं तरी वावग ठरणार नाही. मात्र याच मोबाईल फोनचा जन्म झाला कसा ? आणि ही संकल्पना कोणाच्या डोक्यात आली असावी याबाबत आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
ही गोष्ट आहे 1973 सालची… या साली पहिला पोर्टेबल म्हणजेच आताचा मोबाईल फोनचा शोध लागला. या मागचा इतिहास मोठा रंजक आहे. तस पहायला गेलं तर 1960 मध्येचं वायरलेस फोन आले होते. हे फोन वाहनांमध्ये लावलेले असायचे. गाडीच्या बॅॅटरीवरच ते चालायचे. मात्र याचा एक तोटा असा होता की, हे फोन्स गाडीमध्येच फीट केले असल्याने ते दुसरीकडे घेऊन जाता येत नसे.
या फोनवरून एखाद्याला कॉल करायचा म्हंटल तर अर्धा तास वाट पहावी लागत असे. त्यावेळी एकावेळेला 12 चॅॅनल्सच कनेक्ट होत असे. त्यामुळे चॅॅनल रिकामे झाले तरच तुमचा कॉल कनेक्ट होत असे.
मात्र आता जगाला अर्धातास वाट बघणे शक्य नव्हते. दिवसेंदिवस या पोर्टेबल फोनची गरज ही वाढतचं गेली. यासाठीच 1968मध्ये फेडरल कमिशनने हे लार्ज एरिया नेटवर्कचे रुपांतर स्मॉल एरिया नेटवर्कमध्ये करण्याचे ठरवले. ज्यामुळे एकावेळी अनेकजण कॉल्सवर कनेक्ट राहू शकतील, असा त्या मागचा मूळ हेतू होता. हे काम AT&T या कंपनीला देण्यात आले.
AT&T या कंपनीला नेटवर्क एरियाचे काम दिल्यानंतर मोटोरोला (Motorola) या कंपनीने AT&Tला शह देण्यासाठी मोबाईल फोन आणण्याचे ठरवले. AT&T आणि मोटोरोला या दोन कंपन्यांमध्ये त्यावेळी आघाडीची स्पर्धा होती. मात्र आर्थिक दृष्ट्या AT&T कंपनीही फार मोठी होती.
या मोबाईल फोनचा निर्माण करण्यासाठी आणि रिसर्च करण्यासाठी मोटोरोला कंपनीने मार्टिन कूपर यांना नियुक्त केले. सगळ्यात मोठा प्रश्न हाच होता की जर मोबाईल फोन अयशस्वी ठरला तर त्याचा आर्थिक फटका सहन करण्याजोगी मोटोरोला कंपनी मोठी नव्हती.
एक दिवस मार्टिन यांनी डिक ट्रेसी नावाचे कॉमेक वाचले. या कॉमेकमधील पात्र एकमेकांशी घड्याळाच्या माध्यमातून संवाद साधत असे. रेडीओच्या लहरींच्या सहायाने ही घड्याळ एकमेकांना जोडली असल्याने विना अडथळा एकमेकांशी संपर्क होत असे, हे कॉमेकमध्ये वाचल्यानंतर मार्टिन यांना एक नवंं कल्पना सुचली आणि ते त्यावर विचार करू लागले.
त्यांनी असा विचार मांडला की, ज्या प्रमाणे आपण घराला, किंवा गाडीला नंबर देतो त्याच प्रमाणे मोबाईल फोन धारकाला ही एक नंबर देयचा. ज्यामुळे तो त्या नंबरच्या सहायाने एकमेकांशी संपर्क साधू शकेल. मार्टिन यांनी मांडलेल्या या विचारावर कंपनीच्या सहकाऱ्यांनी सहमती दर्शवली. यासाठी मार्टिन कूपर यांनी एक टीम सेट केली. आता निर्मात्यांसमोर खरे आव्हान होते ते अशी एक चीप निर्माण करायचे जे पोर्टेबल फोन्सला सपोर्ट करेल आणि हा फोन कुठेपण घेऊन जाता येईल.
या चीपवर कंपनीने काम करण्यास सुरवात केली. यासाठी खूप पैसा खर्च होत होता. ही चीप खुप कमी बॅॅटरी पावरमध्ये कार्य करत होती. त्यानंतर अनेकांच्या प्रयत्नांतून मार्च 1973ला पहिला पोर्टेबल फोन तयार झाला होता. याचे प्रथम सार्वजनिक प्रात्यक्षिक आणि लाँचिंग हे 3 एप्रिल 1973 ला न्यूयॉर्कच्या एका कॉन्फरन्समध्ये करण्यात आले.
या फोनचे उद्घाटन मार्टिन कूपर यांनी आपले स्पर्धक AT&Tचे हेड जोएल एन्जल यांना या नवीन मोबाईल फोनवरून कॉल करून केली. त्यानंतर मोटोरोलाचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कंपनीने 1983मध्ये डायना टेक 8000X सेल्युलर फोन हा पहिला पोर्टेबल फोन लाँच केला. त्यावेळी या फोनची प्राईज 10,000 डॉलर इतकी होती. हा जगतला पहिला पोर्टेबल फोन होता जो कुठीही घेऊन जाता येत होता.
फोन फुल चार्ज करण्यासाठी 10 तास लागायचे आणि याच्यावर केवळ अर्धातास बोलता येत असे. या फोनचे वजन तब्बल 1 किलो होते. हा फोन इतका महागडा असूनही याला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वेळोवेळी येणाऱ्या नाव तंत्रज्ञाच्या माध्यमातून असे नवनवीन फोन बाजारत येत गेले आणि आतापर्यंत जग स्मार्ट फोनवर येऊन पोहचले आहे.
हे पण वाचा
का बरंं फोनवर बोलताना Hello असे म्हणतात ? नाही माहित ना…! तर असा आहे इतिहास…
भारतात तर सोन्याच्या खाणीचं नव्हत्या, मग का म्हणायचे भारताला ‘सोने की चिडीया’? घ्या जाणून
अॅॅसिड पडल्याचं निमित्त झालं आणि बेल यांच्या टेलीफोनचा अनपेक्षितरीत्या शोध लागला