fbpx
3.5 C
London
Wednesday, December 7, 2022

भारतीयांसाठी whats app आता क्रेडिट, विमा आणि पेंशन सेवा सुरु करणार

भारतीयांसाठी whats app आता क्रेडिट, विमा आणि पेंशन देण्याची सेवा सुरु करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही सेवा सुरु झाली तर whats app भारतातील लोकांना कर्ज देईल त्याच बरोबर कमी उत्पन्न असलेल्या कामगारांसाठी विमा आणि निवृत्तीवेतनाचीही व्यवस्था करेल. यासाठी whats app भारतीय बँकांशी भागीदारी करत आहे.

या सेवेसाठी फेसबुक कंपनी व्हॉट्सअ‍ॅपने आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेबरोबर भागीदारी केली आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या या सेवेअंतर्गत ग्रामीण भागात विमा आणि पेन्शन देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस म्हणाले की, कंपनीला अधिकाधिक बँकांशी भागीदारी करून कमी उत्पन्न व ग्रामीण भागातील लोकांसाठी येत्या वर्षात बँकिंग सेवा सुलभ करायची आहे.

बँकेबरोबर भागीदारी केल्यानंतर ग्राहक ऑटोमॅॅटेड टेक्स्टच्या माध्यमातून  बँकेशी संवाद साधू शकतील. यासाठी ग्राहकाला आपला व्हॉट्सअ‍ॅप नंबर बँकेत नोंदवावा लागेल. यानंतर, ग्राहकांना त्यांच्या खात्याशी संबंधित इतर माहिती तसेच बॅंक बॅलन्सही व्हॉट्सअ‍ॅपवर कळू शकेल.

व्हॉट्सअॅप इंडियाच्या प्रमुखांनी असेही म्हटले आहे की, येत्या दोन वर्षांत बँकांसमवेत कमी उत्पन्न असलेल्या कामगारांसाठी विमा, मायक्रो क्रेडिट आणि पेन्शनसारख्या सेवा सुरु करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कंपनी लवकरच आपला पायलट प्रकल्प सुरू करण्याची तयारी करत आहे.

लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून राहावे लागते. तसेच काही ग्रामीण भागात बँक नसल्याने लोकांपर्यंत पोहोचणे आणखी कठीण होते. मात्र 400 दशलक्ष वापरकर्त्यांसह व्हॉट्सअ‍ॅपची भारतात सर्वाधिक पोहोच झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांना फाइनेंशियल इकोसिस्टममध्ये आणणे सोपे होणार आहे, असेही बोस म्हणाले.

दरम्यान व्हॉट्सअॅप दोन वर्षांपूर्वीपासून म्हणजे 2018 पासून व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटची चाचणी करीत आहे, परंतु अद्यापपर्यंत ते सरकारला मंजूर झाले नाही. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा एकदा भारतीय बँकांशी भागीदारी करण्याची योजना आखली आहे.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here