आपल्या सर्वांना एका ठराविक वेळी पळायला लावणाऱ्या घड्याळाचा शोध कोणी लावला याबाबत तुम्हाला माहिती आहे का ? कमीजणांनाच घड्याळाचा शोध कोणी लावला याबाबत माहित असेल. आजच्या काळात घड्याळाशिवाय काही होऊ शकत नाही. घड्याळ हे गेल्या अनेक शतकांपासून मानव जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. घड्याळाचे महत्व तुम्हाला असे जाणवणार नाही. मात्र ज्यावेळी तुमच्या जवळ घड्याळ नसेल त्यावेळी घड्याळ किती महत्वाचे आहे हे जाणवेल.
घड्याळाचा शोध कोणी आणि कधी लावला हे ठोस सांगणे फार कठीण आहे. या घड्याळांच्या विकासात अनेकांचे हातभार लागले आहेत. अगदी प्राचीन काळापासून मानव काल मापनासाठी घड्याळाचा वापर करत असल्याचं दिसते. त्यावेळी इलेक्ट्रिक आणि आधुनिक घड्याळंं नसली तरी उत्खननांमध्ये अनेक कालमापक यंत्र सापडली आहेत.
आपण बरेचदा ऐकलेले असते की, पूर्वीच्या काळी मनुष्य हा सूर्याच्या दिशेवरून आणि जमिनीवर पडणाऱ्या सावलीवरून किती वाजले याचा अंदाज लावत असे. मात्र ज्यावेळी आकाश ढगांनी आच्छादलेले असायचे त्यावेळी मात्र सूर्य दर्शन होत नसल्याने वेळ ठरवणे कठीण होत असे. तसेच बऱ्याचदा ऋतूमानानुसार दिवस छोटा मोठा होत असे, त्यावेळी सूर्याच्या दिशेने आणि सावलीने लावलेला वेळेचा अंदाज चुकत असे. त्यासाठी काही काळाने मनुष्याने जलयंत्राचा वापर केला.
हिंदुंंमधील लग्न-मुंजीच्या वगैरे धार्मिक कार्यात सूर्योदयापासून घटी मोजण्याचें पाण्यानें भरलेल्या घंगाळांतील घटिकापात्र सर्वांच्या परिचयाचें आहे. त्यापासूनच पाण्याच्या आघातानें चालणारीं अनेक प्रकारचीं वेळादर्शक यंत्रें नंतरच्या काळात तयार करण्यात आली. अशा प्रकारचें यंत्र ग्रीसमध्ये सर्वाधिक आढळून आले. असे म्हणतात की, सु संग या चीनी व्यक्तीने जलयंत्राचा शोध लावला. मात्र 2 हजार वर्षापूर्वी ग्रीसमध्ये पाण्यापासून गजराचे घड्याळ (Alarm Clock) होते. याचा शोध दुसरे पोप सिलव्हेस्टर यांनी ईसवी सन ९९६ मध्ये लावला.
हिंदुस्थानांतील जुने वेळमापक साधन म्हणजे वाळूचे घडयाळ हे होय. दहा पंधरा वर्षांपूर्वी देखील देवळांत, शाळांतून किंवा संस्थानी कचे-यांत वाळूच्या शिश्या तास दाखविण्याकरिता उपयोगात होत्या. आजही जुन्या व धार्मिक संस्थान वाळूची घडयाळे द्दष्टीस पडतात. हल्लीची पाश्चात्य घडयाळें हिंदुस्थानांत पाश्चात्य लोकांबरोबरच शिरलीं असावीत. मराठी राज्यांत थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपासून ही घडयाळे आलेली दिसतात.
युरोपात १३ व्या शतकात मोठी घड्याळ दिसू लागली. प्रथम हेनरी डि विक नावाच्या इसमाने फ्रान्सचा राजा पाचवा हेनरी याच्याकरिता एक घड्याळ तयार केले. हे घड्याळ १३६८ सालच्या सुमारास राजवाडयाच्या टॉवरवर बसविण्यात आले. हे घड्याळ तासाचे मोजमाप करायचे. यामध्ये मिनिट काटा नव्हता. १५७७ ला स्विझर्लंड मध्ये मिनिटाचा काटा असणाऱ्या घड्याळाचा शोध लागला. हा शोध जॉस बर्गीने लावला.
तसे पाहायला गेले तर मोठ्या घड्याळांचा जनक म्हणून हेनरी डि विक याच्याकडेच पाहिले जाते. विकनंतर घडयाळांतील पहिली महत्वाची सुधारणा म्हणजे पेंडयुलम ऊर्फ लंबकाचा उपयोग ही होय. गॅलिलीओनें १६३९ मध्यें गतिसंबंधाचा महत्वाचा शोध लावल्यानंतर लंबकाची योजना घडयाळांत होऊं लागली व त्याची कल्पना ह्यूघेन्स नामक फ्रेंच यांत्रिकानें काढली. या लंबकाच्या निर्माण होणाऱ्या घडयाळाची सर्व यांत्रिक रचना १७ व्या शतकाच्या अखेरीस पूर्णत्वास गेली.
घडयाळांत विजेचा उपयोग करण्याचा प्रथम प्रयत्न अलेक्झांडर बेननें १८४०-५०मध्ये केला. याच सुमारास विजेची निरनिराळी घडयाळे तयार करण्यात आली. ही घड्याळे हॉटेल्स, शाळा, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आली.
कालांतराने घड्याळाची गरज सारखीच भासू लागल्याने मनुष्याने आपल्या जवळ घड्याळ बाळगण्यास सुरवात केली. हे घड्याळ खिशात ठवले जायचे. याची निर्मिती जर्मनीच्या पीटर हेलेने केली. हे घड्याळ एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येत असल्याने युद्ध काळात या घड्याळांचा मोठा उपयोग झाला. १५०४ च्या सुमारास ल्युरेंबर्ग येथील पीटर हेले याने मुख्य (मेन) स्प्रिंगची कल्पना काढून लहान घडयाळे तयार केलीं त्यांना आरंभीं “न्यूरेंबर्ग एग्ज” असेच म्हणत असत.
त्यातूनच पुढे हातात घालण्याच्या घड्याळांची निर्मिती करण्यात आली. फ्रान्सिसी गणित तज्ञ ब्लेज़ पास्कल यांना काम करताना सतत खिशातून घड्याळ काढून बघणे फार वेळ खाऊ वाटे. त्यामुळे त्यांनी खिशातले घड्याळ हातात म्हणजे मनगटावर बांधण्याची पद्धत आणली. ज्यामुळे काम करताना सहज म्हटल तरी घड्याळाकडे लक्ष देऊन वेळबाबत जाणून घेता येऊ लागले.
१६३२मध्ये इंग्लंडच्या राजाने लंडन शहरांतील घडयाळकारांना सनद चार्टर दिली, आणि तेव्हांपासून क्लॉक व वॉच यांची सुधारणा करण्यांत अनेक इंग्रज यांत्रिकांची मदत झाली. त्यामुळेच घड्याळाच्या विकासात थॉमस टॉम्पियन, जॉन हॅरिसन, जॉर्ज ग्रहम, थामस म्यूज अशा अनेकांची नावं घेतली जातात.
१६९० च्या सुमारास फॅसिओ नामक जेनेवाच्या एका यांत्रिकाने घडयाळांतील जास्त घर्षणाच्या जागी हिरे, पाचू वगैरे अत्यंत कठीण रत्नांचे बारीक तुकडे बसविण्याची युक्ती आणली. घड्याळाच्या विकासाच्या कालखंडात इंग्रज घडयाळकारांनीं यांत्रिक निर्दोषता साधण्याकाडे लक्ष दिले तर स्विज व अमेरिकन कारागिरांनी घडयाळ बनविण्याचा खर्च कमी करण्याचें ध्येय पुढें ठेविलें या दुहेरी प्रयत्नांचे फळ म्हणजे हल्ली बेताच्या किंमतींत चांगलीं टिकाऊ व सोईस्कर मिळणारी घडयाळे हे होय.
कालांतराने पाश्चात्य देशात घड्याळ निर्मितीचे वर्ग सुरु झाले आणि त्यातून अनेक कारागीर बाहेर पडले. या कारागिरांनी नंतर जगाला थक्क करणारी घड्याळंं निर्माण केली. काहींनी त्यावर कोरीव नक्षी काम केले तर काहींनी त्याला रत्नांनी सजवले. काहींनी त्याला चावी दिली. तर काहींनी घड्याळ वापरकर्त्याला श्रीमंतीचा आनंद दिला. अशा या विविध विकासाचे टप्पे पार करून आलेल्या घड्याळाने आता संपूर्ण जगाला आपल्या काट्यावर पळण्यास भाग पाडले. त्यामुळेच आता कोणीही घड्याळविना जग असेल का ? याचा विचारही करू शकत नाही.
दरम्यान भारतात देखील फार पूर्वी पासून वेळेचे मोजमाप करणारे यंत्र अस्तित्वात होते. त्यापैकीच एक म्हणजे जंतर मंतर. सूर्याच्या दिशेवरून आणि खाली पडणाऱ्या छायेवरून वेळ ठरवली जात असे. १८ व्या शतकात १७२४ ते १७३५च्या दरम्यान जयपूरचे महाराजा दुसरे जयसिंग यांनी जयपूर , उज्जैन , मथुरा , वाराणसी, नवी दिल्ली, अशा ५ ठिकाणी जंतर मंतर निर्माण केले.
हे पण वाचा
दोन मुलांच्या खेळाने जगाला मिळाली दुर्बीण, गॅॅलीलिओंनी याचाचं वापर करून जगाला दिले खगोलज्ञान
अॅॅसिड पडल्याचं निमित्त झालं आणि बेल यांच्या टेलीफोनचा अनपेक्षितरीत्या शोध लागला
पहिल्या मोबाईलची गोष्ट ! एका कॉमेकमुळे सर्व जग बदललं आणि सर्वांच्या हातात मोबाईल आला