भिकारी हा शब्द ऐकून एक असहाय्य माणसाची प्रतिमा मनात उमटते. परंतु भिकाऱ्याने पाच इमारतींमध्ये रोख रक्कम आणि बँकेत 1.4 कोटी रुपये जमा केले असतील याचा आपण कधी विचार सुद्धा करू शकत नाही. परंतु इजिप्तमध्ये असे घडले आहे. तिथल्या पोलिसांनी 57 वर्षांच्या महिला भिकाऱ्याला अटक केली आहे जिच्याकडे पाच इमारती आणि 30 लाखाहून अधिक इजिप्शियन पौंड (1.4 कोटी रुपये) बँक खात्यात होते.
नफिसा नावाच्या लक्षाधीश भिकारी व्हीलचेयर वापरुन शारीरिक अपंगत्वाचे कारण सांगत भिक्षा मागत असे. परंतु भीक मागताना ती चालताना दिसली असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. देशातील बर्याच राज्यात या बाईने एक पाय नसल्याचा व आजारी असल्याचा बनाव करून व्हीलचेअर वापरली आणि करोडोंची संपत्ती जमा केली.
महिलेचा अधिक तपास केला असता पोलिसांना असेही आढळले की, नाफिसाला कोणत्याही आजाराने ग्रासलेले नव्हते. तिचे गरबिया आणि काळुबिया या बँकांमध्ये पैसे असून तिच्यानावे एलई 3 दशलक्ष किमतीच्या पाच निवासी इमारती आहेत. त्यामुळे पुढील चौकशीसाठी नफीसला पब्लिक प्रोसेक्यूशनला पाठवले आहे.
भारतातही लक्षाधीश भिकारी बर्याच वेळा भारतात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत. इथेही बर्याच शहरांमध्ये लक्षाधीश भिकाऱ्यांच्या पडदा उघड झाला आहे. वेगवेगळ्या अहवालांनुसार भारतात अनेक भिकारी कोट्यावधी जमीन असूनही भीक मागत असल्याचं समोर आले आहे.
जगातील बऱ्याच देशांमध्ये अशी प्रकरणे समोर आली आहेत. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार असा एका लक्षाधीश भिकारी गेल्या वर्षी लेबनॉनमध्ये चर्चेत आला होता त्याच्या बँक खात्यात 9 लाखाहून अधिक डॉलर्स असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. भिकारी बँक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गेला तेव्हा याचा शोध लागला होता.