हे माहितीये का ! या गावामध्ये मृत्यू येण आहे पाप, मेल्यानंतर घरच्यांना भरावा लागतो दंड

0

जगात सध्या १९० पेक्षा जास्त देश आहेत. प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी आहे. धार्मिक मान्यता वेगळ्या आहेत. काही ठिकाणी धर्माच्या नावावर अंधश्रद्धा ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यासह काही ठिकाणी अजब रीतिरिवाज असलेले पहायला मिळतात. आज आपण जगात असलेल्या अशाच काही गावांची माहिती घेणार आहोत ज्या गावातील रीतिरिवाज आणि परंपरा या विचित्र आणि अनोख्या आहेत.

#लाँगयियरबीन, नॉर्वे

नॉर्वे मध्ये असणारे हे गाव अतिशय अनोखं आहे. या गावात मृत्यू येणं हे पाप आहे असं मानलं जात. कारण हा अतिशय थंड प्रदेश आहे. या ठिकाणी मृत्यूनंतर दफन करण्यासाठी अनुकूल वातावरण नाही. त्यामुळे गेल्या ८० वर्षांपासून कोणताही मृतदेह दफन करण्यात आलेला नाही. याठिकाणी तापमान अतिशय कमी असल्याने मृतदेह कुजत नाहीत. तसेच जंगली प्राणी मृतदेह उकरून खातात.

#लाँगयियरबीन, नॉर्वे

तसेच काही प्राणी अर्धवट मृतदेह ठेवतात त्यामुळे विविध रोग आणि व्हायरस पसरण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे येथील सरकारने मृतदेह दफन करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे म्हातारे किंवा मृत्यूच्या उंबरठ्यावर असणाऱ्या लोकांना इतरत्र हलवण्याचा नियम आहे. मात्र जर हा नियम मोडला तर कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागतो. सरकारच्या या नियमामुळे हे गाव जगात प्रसिद्ध झाले आहे.

#मलाना गाव, भारत

मलाना हे गाव हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात वसलेले आहे. हे गाव यासाठी प्रसिद्ध आहे की या गावातले लोक भारतात राहून स्वतःला भारतीय म्हणत नाहीत . हे लोक भारतीय संविधानाचा त्याग करून हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा टिकवत आहेत आणि त्यानुसार वागत आहेत. त्यामुळे या ठिकाणचे कायदे हे वेगळे आहेत. तसेच हे लोक वेगळीच भाष्य बोलतात. त्या भाषेला कनाशी असे म्हणतात. ही भाषा इतर कुठेही बोलली जात नाही.

#मलाना गाव, भारत

या गावाचे अनोखे कायदे पाहण्यासाठी दरवर्षी हजारो लोक येथे भेट देतात मात्र बाहेरील लोकांना येथे राहण्यास परवानगी नाही. बाहेरून येणारे लोक गावाबाहेर तंबू ठोकून राहतात. मात्र अनोखी गोष्ट म्हणजे या गावातील कोणत्याही भिंतीला आणि व्यक्तीला पर्यटक हात लावू शकत नाही. जर आपण चुकून त्यांना हात लावला तर आपल्याला ३-५ हजारांचा दंड भरावा लागतो. जर तुम्हाला या ठिकाणी काही खरेदी करायची असेल तर दुकानदार ती वस्तू जमिनीवर ठेवतो. त्यानंतर तुम्हालाही पैसे जमिनीवरच ठेवावे लागतात.

#कलाची, कझाकिस्तान

या गावातील लोकांना एक विशिष्ट रोग आहे. ज्यामुळे हे लोक चलता-फिरता, खातापिता अचानकपणे झोपतात. एकदा झोपल्यानंतर हे लोक अनेक दिवस किंवा आठवडे तसेच झोपलेले असतात. या ठिकाणचे लोक आपल्याला रस्त्यावर फिरताना दिसतील मात्र त्यांचे मेंदू हे झोपलेले असतात. या रोगाचा पहिला रुग्ण हा सण २०१३ मध्ये समोर आला होता. परंतु आता या गावातील प्रत्येक चौथा व्यक्ती हा या रोगाने ग्रासलेला आहे.

Kalachi

या आजाराने ग्रासलेला पहिला माणूस हा जंगलातच झोपलेला होता. ६ दिवसानंतर जेव्हा तो उठला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. मात्र त्याचा एक पाय हा जन्गली प्राण्याने खाल्लेला होता. अशा प्रकारामुळे शेकडो डॉक्टर्स आणि संशोधकांनी या गावाला भेट दिलेली आहे. या गावातील हवेचे, पाण्याचे, माणसांचे, जंगली जनावरांचे जवळपास २० हजार सॅम्पल घेण्यात आलेले आहेत. परंतु यावर कोणताही इलाज आणि हे कशामुळे होते याचा शोध घेऊ शकलेले नाही. काही लोक येथे सैतानी शक्ती वास करत असल्याचे म्हणत आहेत. तर काही लोक हे या गावाजवळ असणाऱ्या कार्बन मोनॉक्सीडंच्या खाणींमुळे असे होत असल्याचे म्हणत आहेत.

#अल जजीराह अल हमरा, युएई

यूएईमधील राज्य रासुलखैमा याच्या पासून २० किलोमीटरवर आहे. या गावात १९६८ पूर्वी सामान्य लोकं राहत होती. परंतु अचानकपणे हे गाव रिकामे झाले. या गावातील लोक एकाच दिवसात हे गाव सोडून युएईच्या इतर ठिकाणी स्थलांतरित झाले. या लोकांच्या म्हणण्यानुसार एका रात्री या ठिकाणी चित्र विचित्र आवाज येऊ लागले मात्र कुणाचीही बाहेर जाऊन आवाज कशाचा आहे हे जाणून घेण्याची हिम्मत झाली नाही.

अल जजीराह अल हमरा, युएई

दुसऱ्या दिवशीही पुन्हा असेच घडले परंतु या वेळी दोन लोक बाहेर बाहेर जाऊन काय घडतंय हे पहिले. त्यावेळी बाहेर कसलातरी आनंदोत्सव साजरा केला जात होता. हे लोक जेव्हा गावात परत आले त्यावेळी भीतीपोटी त्यांनी इतरांना काहीही सांगितले नाही आणि दुसऱ्या दिवशी त्या दोघांचा मृत्यू झाला. दिवसेंदिवस आवाज वाढत गेला. आणि जो कोणी हा आवाज पाहायला बाहेर जाईन त्याचा मृत्यू होऊ लागला. असे प्रकार वाढल्याने गावकऱ्यांनी एकाच दिवशी हे गाव सोडण्याचा निर्णय घेतला. आताही अनेक लोक या आवाजाचा शोध घेण्यासाठी या गावात येतात परंतु संध्याकाळ होताच येथून पळ काढतात. कारण या ठिकाणी असलेली घरे हि दिवसाचं अतिशय भयानक दिसतात. त्यामुळे अंधारात कसे दिसेल याची कल्पना काररून लोक या ठिकाणावरून पोबारा करतात.

#तोराजा, इंडोनेशिया

आपण अनेक चित्रपटांमध्ये झोंबीज पाहिलेले असतील. जर तुम्हाला प्रत्यक्ष हे झोंबी पाहायचे असतील तर या गावाला भेट द्यायला पाहिजे. जर या गावात कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या घरातले लोक त्या मृतदेहाला तोपर्यंत दफन करत नाही जोपर्यंत ते संपूर्ण गावाला जेवण चरत नाहीत. या जेवणामध्ये म्हशीचे आणि डुकराचे मांस संपूर्ण गावाला चारावे लागते. हे ३ दिवसांपर्यंत सुरु असते. यामध्ये गरीब आणि मध्यम कुटुंबांना जवळपास अडीच लाख भारतीय रुपये खर्च करावे लागतात. तसेच श्रीमंत कुटुंबांना जास्त म्हशी आणि डुकराचे मांस खायला घालावे लागते त्यामुळे त्यांचा खर्च वाढतो. मात्र जर एखाद्या कुटुंबाकडे पैसे नसतील तर जोपर्यंत पैशांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मृतदेह हा कुटुंबासोबत ठेवला जातो. मग तो अनेक महिने आणि वर्षे कुटुंबासोबत राहतो. अशावेळी मृतदेहावर विशिष्ठ प्रकारचे केमिकल लावले जाते. त्यामुळे मृतदेह खराब होत नाही आणि त्याचा वास येत नाही.

toraja

तसेच ज्या घरात मृतदेह आहे त्या घराला मृतदेहाची अंतिम क्रिया होत नाही तोपर्यंत अपवित्र मानले जाते. अशा मृतदेहांना असे मानले जाते कि तो व्यक्ती जिवंत आहे. परंतु आजारी किंवा झोपलेला आहे. उत्सवाच्या दिवशी या मृतदेहाला बाहेर काढले जाते. तयाला साफ करून नवीन कपडे घातले जातात व गल्लीतून रस्त्यावरून फिरवले जाते. तसेच त्यासह फोटो काढले जातात. या ठिकाणी असे मानले जाते की मनुष्य पैसे हे जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी कमावतो कारण मेल्यानंतर त्याला आनंदाने आणि इज्जतीने दफन केले जावे. दफन झाल्यानंतर ३ वर्षांनी पुन्हा हा उत्सव साजरा केला जातो. यात सर्व पूर्वजांचे मृतदेह बाहेर काढून त्यांना साफ करून त्यांना रस्त्यांवर फिरवले जात.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.