#FamilyMatters : पती पत्नीमध्ये वाद होतंय! ‘या’ गोष्टी पाळा आणि भांडण टाळा

0

प्रत्येकाच्या वैवाहिक जीवनात लहान-लहान समस्या येत असतात, परंतु जर वेळेत त्यावर मात केली नाही तर त्या मोठ्या होतात. तसेच बरेच लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी उघडपणे बोलण्यास टाळतात. मात्र या समस्यांवर मात करण्यासाठी रिलेशनशिप एक्सपर्ट्सचा सल्ला काही लोकांना उपयोगी ठरू शकतो. आपण त्याविषयी जाणून घेऊया…

जोडीदारासोबत संवाद सुरु ठेवा

कोणतीही समस्या दूर करण्याचा पुढाकार हा संवादाद्वारे होतो. आपण आपल्या जोडीदारासमवेत या विषयावर उघडपणे बोलले नाही तर ही समस्या कधीही सुटणार नाही. केवळ बोलण्याद्वारे आपण जोडीदाराच्या भावना समजून घेऊ शकता आणि आपल्या भावना स्पष्ट करू शकता. जेव्हा जोडप्यांना आपापसात बोलणे थांबवले जाते तेव्हा नात्यात अडचण येत असते.

मुद्दा मोठा बनवू नका

एकमेकांमध्ये भांडणे होणे ही सामान्य गोष्ट आहे. निरोगी नात्यासाठीदेखील हे आवश्यक आहे, परंतु पुन्हा पुन्हा त्याच विषयावर भांडण केल्यास प्रकरण मोठे होते आणि मग नात्यात अंतर येऊ लागते. दोघातही एखाद्या गोष्टीवर वेगळी मते असू शकतात. जोडीदाराच्या विचारांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी ते समजून घेण्याचा प्रयत्न करा.

घरगुती कामे एकत्र करा

कपडे धुणे, भांडी किंवा कपाट साफ करणे यासारख्या कामात आपल्या जोडीदाराला मदत करा. जेव्हा तुम्ही दोघे घरी असाल तेव्हा कामे वाटून घ्या . त्यामुळे एखाद्यावर जास्त काम वाढणार नाही आणि तुम्ही दोघेही एकमेकांच्या जवळ येतील.

एकमेकांचे कौतुक करा

प्रत्येकजण आपल्या जोडीदाराने त्याची प्रशंसा करावी अशी अपेक्षा करतो. एकमेकांचे कौतुक करून, तुम्ही दोघेही नेहमी सकारात्मक रहा . यामुळे, छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची सवय तुम्हाला लागेल आहे.

एकमेकांना प्राधान्य द्या 

जोडीदाराकडून केवळ आपल्या अपेक्षा ठेवू नका तर त्यास स्वत: ला जेवढे प्राधान्य द्याल तितके त्यांना द्या. आपल्याकडे समान मते असणे आवश्यक नाही परंतु भिन्न मतांचा आदर करणे देखील महत्वाचे आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.