लोकलमध्ये क्यूआर कोड आधारित ई-पास आवशयक, ‘असा’ मिळेल आधुनिक ई-पास
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल आणि प्रशासनाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेमध्ये सामाजिक अंतर पाळण्यासाठी 30 जुलैपासून केवळ क्यूआर कोड आधारित ई-पास व वैध ट्रेनचे तिकीट असणाऱ्या कामगारांनाचं ट्रेनने प्रवास करता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कामगारांसाठी लोकल सुरु करण्यात आली आहे.
राज्य सरकारने याबाबत एक पत्रक काढले आहे. त्या पत्रकात असे म्हंटले आहे की, उपनगरातून ज्या कामगारांना लोकल ट्रेनने प्रवास करायचा आहे, अशा प्रवासांना क्यूआर कोड आधारित ई-पास असणे अनिवार्य आहे.
कसे मिळतील क्यूआर कोड ई पास?
अशा परिस्थितीत हा क्यूआर कोड आधारित ई-पास कसा मिळवायचा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या एका परिपत्रकात म्हटले आहे की, वैध रेल्वे तिकिटासह इलेक्ट्रॉनिक क्यूआर-आधारित ई-पास 30 जुलैपासून मुंबई लोकलमध्ये प्रवास करणे बंधनकारक आहे. या क्यूआर कोडच्या मदतीने, हे सुनिश्चित केले जाईल की फक्त अत्यावश्यक सेवांशी जोडलेले लोकच लोकल ट्रेनमध्ये येऊ शकतील. यासाठी आवश्यक सेवांशी संबंधित कर्मचार्यांना विभागामार्फत क्यूआर कोड असलेली ओळखपत्र दिले जाईल.
क्यूआर कोडसह ई-पास
कर्मचार्यांना क्यूआर कोडसाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक विभागात कर्मचार्यांना त्यांच्या फोनवर एचआर प्रमुखांनी दिलेल्या नमुन्यात क्यूआर कोड प्रदान केले जातील. या कालावधीत कार्यालयात बोलविण्यात येणाऱ्या कर्मचार्यांची संपूर्ण माहिती 27 जुलैपर्यंत पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आयटी सेलला देण्यात आली आहे.
यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक अधिकृत आयडी क्रमांक, त्यांच्या विभागाचे नाव, पत्ता आणि त्यांच्या कामाच्या दिवसाची संपूर्ण माहिती नियुक्त केली आहे.
या माहितीच्या आधारे, कर्मचार्यांना त्यांच्या फोनवर एसएमएसद्वारे वेब लिंक उपलब्ध होईल.
कर्मचार्यांना या लिंकवर क्लिक करून माहिती मागितली जाईल ती महिती भरून सबमिट करावी लागेल. त्यानंतर ही माहिती नोडल अधिकाऱ्यांंना मिळेल.
त्यानंतर नोडल अधिकाऱ्यांंच्या मंजुरीनंतर कर्मचार्यांना क्यूआर कोड दिले जातील. हा क्यूआर कोड स्कॅन करून, कर्मचारी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकतील.