fbpx
8.4 C
London
Wednesday, February 1, 2023

खऱ्या मिर्झापुरमध्येही आहेत अनेक कालीन भैय्या, जाणून घ्या UPमधील मिर्झापुरचे वास्तव

अॅॅमेझॉन प्राईम वरील मिर्झापुर 2 ही वेबसिरीज सध्या चांगलीच चर्चेत आहे. पहिल्या सिझनपासून ताणली गेलेली उत्कंठता या सिझनमध्ये पूर्ण होईल असे अनेकांना वाटत होते. मिर्झापूरची गादी नेमकी कोणाकडे जाणार ? हे पाहण्याचे सर्वांना औत्सुक्य होते. मात्र या सिझनमध्ये ही प्रेक्षकांची उत्कंठता अशीच ताणली गेली आहे. त्यामुळे आता सिझन 3 केव्हा येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Mirzapur-2

करन अनशुमन आणि गुरम्मित सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिरीजमध्ये आपल्याला थरार, मर्डर मेस्त्री, रक्तपात, कट्ट्याचा व्यापार, राजकारण, अस्तित्वाची लढाई, बदला घेण्याची जिद्द असे अनेक पैलू पाहायला मिळतात. उत्तर प्रदेशची स्थानिक भाषा, तेथील वातावरण, तरुणाई या सर्वाचा अनुभव घेता येतो. सिरीजमध्ये दाखवण्यात आलेले मिर्झापुर हे सामन्यांसाठी नाहीच, इथे राहणारे सगळे हैवानचं आहेत, असे आपल्याला सिरीज बघताना वारंवार वाटते . तसेच उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक क्रिमिनल रेट असलेले स्टेट आहे त्यामुळे आपल्याला सिरीजमधील दाखवण्यात आलेले सर्व दृश्य हे वास्तविक वाटतात.

प्रत्यक्षात मिर्झापुर असे आहे का ? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे याच प्रश्नाचे निरसन करण्यासाठी आज आम्ही खऱ्या मिर्झापुर विषयी माहिती देणार आहोत.

#गंगा किनारी वसलेला जिल्हा

Mirzapur 2

मिर्झापुर हे उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा असून ते गंगा किनारी वसलेले आहे. हा जिल्हा वाराणसी आणि प्रयागराजच्या मध्यभागी असल्याने हे शहर उत्तर प्रदेशच्या सर्व जिल्ह्यांना वाहतुकीच्या साधनांनी जोडलेले आहे. गंगा नदी ही मिर्झापूरची जीवन वाहिनी आहे. त्यामुळे येथे शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले जातात.

#कार्पेटसाठी प्रसिद्ध शहर

Mirzapur 3

वेबसिरीजमध्ये दाखवल्या प्रमाणे मिर्झापुर हे नक्षीदार कार्पेटसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे अनेक कालीन व्यापारी पाहायला मिळतात. येथील कार्पेटला बाहेरच्या देशांमध्ये मोठी मागणी असल्याने येथे कार्पेट बनवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. कार्पेटवरील नक्षी येथील कारागीरांमधील कलेचा दर्जा आणि गुणवत्ता दर्शवते. मिर्झापुरमध्ये आपल्याला अनेक कार्पेट बनवण्याचे कारखाने पाहिला मिळतात.

मिर्झापुर वेबसिरीजमध्ये या कार्पेट व्यवसायात अनेक काळे धंदे दडले असल्याचे आपल्याला पाहिला मिळते. वास्तवात मात्र कार्पेटच्या व्यवसायात कोणताच काळा बाजार चालत नाही. कार्पेट बरोबर येथे भांडी विकण्याचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.

# त्रिपाठी चौक

Mirzapur 3 (1)

मिर्झापुर वेबसिरीजमध्ये त्रिपाठी चौक आपल्याला दाखवण्यात आला आहे. मात्र वास्तवात मिर्झापुरमध्ये अशा नावाचा एकही चौक नाही. वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आलेला चौक हा वाराणसीमधील रामनगर शहराचा मुख्य दरवाजा आहे.

#मिर्झापुरची भाषा

Mirzapur 4

वेबसिरीजमधील मुन्ना आणि गुड्डू भैैय्याच्या भाषेचे आणि डायलॉगचे तुम्ही फॅॅन असाल. वास्तवात देखील येथील स्थानिकांची भाषा ही अशीच आहे. येथील भाषेत संपूर्ण हिंदी ऐकायला मिळते. येथे ‘तुम्ही-आम्ही’ असे न बोलता ‘आपण’ असे आदराने बोलले जाते. मात्र येथील भाषेत शिव्यांंचाही वापर केला जातो. मिर्झापुरचे लोक मात्र पान खाण्याचे शौकीन आहेत. त्यामुळे आपल्याला प्रत्येक चौकात मसाला पान विकणारे पाहायला मिळतात.

#कट्ट्याचा व्यापार

मिर्झापुरमधील कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी) हे कट्ट्याचे (देसी हात बंदुक) व्यापारी देखील दाखवले आहेत. अनाधिकृतरित्या येथे कट्ट्याची निर्मिती केली जाते आणि हे कट्टे बाहेरील राज्यात विकले जातात, असे आपण वेबसिरीजमध्ये पाहतो. मात्र वास्तवात येथे एकही असा कारखाना नाही किंवा कुठल्याही बंदुका खुल्या बाजारात विकल्या जात नाहीत.

मिर्झापुरबाबत जे काही सिरीजमध्ये दाखवले आहे ते अतिशय चुकीचे आणि येथील संस्कृतीला मलीन करणारे आहे, असा आक्षेप स्थानिकांनी घेतला होता. वास्तवात मिर्झापुर हे अतिशय शांत जिल्हा  आहे. येथे अजिबात गुंडागिरी आणि रक्तपात होत नाही, असे स्थानिकांकडून सांगण्यात येते.

#मिर्झापूरमधील तरुण

मिर्झापुरमधील तरुणवर्ग हा वाम मार्गाला जातो असे वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. मात्र येथील प्रत्येक तरुण अशा चुकीच्या मार्गाला जातोच असे नाही खासकरून येथील अनेक तरुण हे प्रशासकीय सेवेत आहेत. अनेकजण IAS आणि IPS आहेत. मात्र येथे तरुण गांजा अफू किंवा इतर ड्रग्स विक्रीचा धंदा करत नाही.

#पर्यटनस्थळांनी भरलेले मिर्झापूर

Mirzapur 5

मिर्झापूर हे गंगा नदी किनारी वसलेले असल्याने येथील भाग हा सदन आहे. शेती वाडी आणि बारामहिने हिरवळ असल्याने येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. धबधबे आणि धरणे येथील मुख्य आकर्षण आहे. नदी किनारी अनेक पुरातन मंदिरंं असल्याने येथे अनेक दगडी घाट पाहिला मिळतात. येथील घाट अतिशय शांत आणि निरव आहेत. अनेक पर्यटक हे मिर्झापुरच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.

#राजकारण आणि गुंडागिरी

राजकारण आणि गुंडागिरी हे आपल्याला देशाच्या कुठल्याही भागात पाहिला मिळते. मिर्झापूरचे राजकारण हे गुंडागिरीला समर्थन देणारे आहे, असे आपल्याला वेबसिरीजमध्ये पाहिला मिळते. मात्र येथील राजकीय नेत्यांचा दावा आहे की, येथे राजकारण होते पण ते पारदर्शी असते. कुठेही जोर जबरदस्ती केली जात नाही. प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रत्येक राजकारणी कोणत्याही गुंडाला पाठींबा देत नाही.

राजकीय नेते खर बोलतातच असे नाही, पण स्थानिकांनी देखील राजकारण्यांंच्या या दाव्याला पाठींबा दिला आहे. राजकीय मतभेद हे सार्वजनिक ठिकाणी हाणामारी पर्यंत येत नाहीत, रक्तपात होत नाही, असे स्थानिकांकडून आपल्याला ऐकायला मिळते.

Mirzapur 6

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल ही राज्य क्राईम रेटमध्ये नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळे येथे कायम दहशतीचे वातावरण असते, असे बाहेरच्या राज्यातील नागरिकांना वाटते. मात्र वेबसिरीजमध्ये दाखवतात एवढे सर्रास गुन्हे येथे होत नाहीत. पोलीस प्रशासन सर्वच गुन्हे पाठीशी घालत नाहीत. त्यामुळे सिनेमा किंवा सिरीजमध्ये दाखवतात एवढे मिर्झापुर धोकादायक नाही.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here