fbpx
3.5 C
London
Wednesday, December 7, 2022

#Mumbai भाग 2 : ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रवेशानंतर अशी जोडण्यात आली मुंबईची 7 बेटंं

आत्तापर्यंत आपण मुंबई आधी कशी होती, मुंबई आता जिथे उभी आहे त्या भूमीचा इतिहास काय होता, त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा प्रवेश भारतात कसा झाला. हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या लेखामधून आपण आत्ता ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रवेशानंतर मुंबईचं चित्र कसं बदलून गेलं हे आपण जाणून घेऊया.

ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रवेशानंतर..

भारतात जेंव्हा ईस्ट इंडिया कंपनीचा प्रवेश झाला तेंव्हा या भूभागावर हळूहळू ईस्ट इंडिया कंपनीने आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली. इंग्लंडच्या राजकुमाराच्या हाती ही बहुप्रतीक्षित मुंबईची ७ बेटंं लागली होती. परंतु एक प्रश्न असा होतं की ही ७ बेटं वेगवेगळी होती. या बेटांवर एक मोठी समस्या अशी होती की यांवर कनेक्टीव्हिटी नव्हती.त्यामुळे राजकुमारने ही सातही बेटं ईस्ट इंडिया कंपनीच्या हवाली केली.आणि इथून सुरुवात होते मुंबईच्या निर्मितीची गोष्ट…

ब्रिटनच्या ईस्ट इंडिया कंपनीने या बेटांच्या विखुरलेल्या सातही भागांना सर्वप्रथम एकत्रित केलं.या बेटांवर एक मोठी समस्या होती ती म्हणजे फार मोठ्या प्रमाणात असलेली रोगराई. या रोगराईचा उद्रेक हा वाढतच होता. समुद्राच खारं पाणी हे जमिनीवर येऊन तिथल्या घाणीमुळे फार मोठ्याप्रमाणात रोगराई पसरायला लागली.या रोगराईवर हळूहळू ईस्ट इंडिया कंपनीने नियंत्रण मिळवलं.

मुंबई ताब्यात येण्याआधी ईस्ट इंडिया कंपनी ही गुजरातमधल्या सुरत या शहरामध्ये होती. इ.स १६८७ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने आपलं बस्तान सुरत मधून उचलून मुंबई येथे आणलं. तेव्हा मुंबईचं नाव ‘बॉम्बे प्रोविन्स’ होतं. या आधी पोर्तुगीज मुंबईला ‘बॉम्ब बोहिआ’ असं म्हणत असे. ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय मुंबईला शिफ्ट झाल्यावर मुंबईमध्ये आर्थिक गतीला वेग आला. आर्थिक गतीला वेग आल्याने साहजिकच लोकसंख्या देखील वाढू लागली. अनेक छोटे मोठे उद्योग सुरू झाले.

आता लोकसंख्या वाढल्यावर जमिनीची मागणीही वाढू लागली. लोकसंख्या वाढू लागल्याने मोठं मोठ्या कंपन्यांना जमिनीची गरज भासू लागली. जमिनीची कमतरता भरून काढण्यासाठी ब्रिटिश कंपनीने या सात बेटांना एकत्र करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईची पायाभरणी

या सात बेटांना जोडण्याचा निर्णय इ.स. १७०८ साली घेण्यात आला. माहीम आणि सायन या दोन्ही बेटा दरम्यान एक रस्ता बनवला गेला. त्यानंतर इ.स. १७७२ मध्ये मध्य मुंबई मध्ये आलेल्या पुराच्या समस्येमध्ये महालक्ष्मी आणि वरळी या दोघांना जोडण्यात आलं, आणि या कारनाम्याला आपल्या इतिहासात सगळ्यात मोठं बेकायदेशीर बांधकाम म्हणून पण बोललं जातं व त्याचे कर्ते होते तत्कालीन गव्हर्नर विल्यम हॉर्नबी. विल्यम हॉर्नबीने वरळी बेटाजवळ समुद्री भिंत बांधण्याचे आदेश दिले, जेणेकरून बेटाचा उर्वरित भाग समुद्राच्या भरतीमुळे बुडणार नाही.

मुंबईची ही सात बेटे जोडण्यास सुरवात

ही सात बेटंं आणि समुद्रातील रिक्त जागा दगड आणि काही घन पदार्थांनी भरली गेली. भरीव खडकाचा पहिला थर समुद्राच्या खाली घातला होता. हा प्रकल्प हॉर्नबी वेल्लार्ड प्रकल्प म्हणून ओळखला जातो. हा प्रकल्प पूर्ण होण्यास दीडशे वर्षांहून अधिक कालावधी लागला.

१८४५ मध्ये, मुंबईची सात बेटे एकत्र केली गेली आणि  मुंबईच्या काही उपनगरातील जमिनीला एकत्र करून अखंड भूभाग म्हणून  ही  जमीन म्हणून सादर केली. आता मुंबई शहर या बेटांवर बनलेले आहे.  दक्षिण मुंबई, संपूर्ण मुंबई शहर आणि उत्तरेकडील मुंबई उपशहरी जिल्ह्यात विलीन  केले गेले. त्याला साल्सेट आयलँड असे म्हणतात. १९९५ मध्ये मुंबईचे बॉम्बे हे नाव बदलून मुंबई करण्यात आले आणि ते आज दक्षिण आशियातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र आहे.

to be continue…

(सिद्धेश ताकवले)

हे पण वाचा

#Mumbai भाग 1 : …अशी आली मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात,पुढे काय झाले हे तुम्हीचं वाचा !

अ‍ॅॅसिड पडल्याचं निमित्त झालं आणि बेल यांच्या टेलीफोनचा अनपेक्षितरीत्या शोध लागला

का बरंं फोनवर बोलताना Hello असे म्हणतात ? नाही माहित ना…! तर असा आहे इतिहास…

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here