#NobelPrize : भौतिकशास्त्रात अमुल्य योगदान दिल्याने ‘या’ तीन संशोधकांना मिळणार नोबेल पारितोषिक

0

स्वीडनच्या रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सेसने यावर्षी भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार जाहीर केले आहेत. यावर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक  रॉजर पेनरोस, राइनहार्ड गेन्झेल आणि अँड्रिया गेज यांना देण्यात येणार आहे. तिन्ही वैज्ञानिकांचा शोध अंतराळातील ब्लॅक होलशी संबंधित आहे.

नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.

अवकाश संशोधनासाठी पुरस्कार

यूकेमध्ये जन्मलेल्या आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिकणार्‍या रॉजर पेनरोस यांनी ब्लॅक होल फॉरमेशनद्वारे जनरल थियरी ऑफ रिलेटिव्हिटीचा अंदाज लावला जाऊ शकतो, याचं संशोधन केलं आहे.

आकाशगंगेच्या ब्लॅकहोलच्या मध्यभागी अदृश्य परंतु अत्यंत सामर्थ्यवान ऑब्जेक्ट शोधून काढल्याबद्दल राईनहार्ड गेन्झेल आणि अँड्रिया गेज यांना सन्मानित केले आहे. रेईनहार्ड गेन्झेल यांचा जन्म जर्मनीत झाला होता आणि ते मॅक्स प्लँक संस्थेचा संचालक आहेत. अँड्रिया गेज या अमेरिकेच्या असून लॉस एंजेल्स येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात त्या प्राध्यापक आहेत.

संयुक्त पुरस्कार

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश अॅॅकॅडमी ऑफ सायन्सने संयुक्तपणे सन 2020 साठी भौतिकशास्त्राचा नोबेल प्रदान केला. बक्षीसातली निम्मी रक्कम रॉजर पेनरोस यांना जाईल, तर उर्वरित बक्षीस पैकी निम्मी रक्कम राईनहार्ड गेन्झेल आणि अ‍ॅन्ड्रिया गेज यांना देण्यात येणार आहे. 2019ला भौतिक शास्त्रात जिम पेबल्स, मिशेल मेयर, डिडिएर क्युलोझ हे नोबल पारितोषिकाचे मानकरी ठरले होते.

 

दरम्यान वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना जाहीर झाला आहे. ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या तिन्ही शास्त्रज्ञांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांसी लढा देण्यासाठी या तिन्ही वैज्ञानिकांनी निर्णायक योगदान दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.