धक-धक करणारा मजबूत आवाज, मजबूत बाईक आणि त्यावर बसल्यानंतर वाढणारा रुबाब ही ओळख आहे एका राजेशाही थाट असलेल्या गाडीची जिच्या नावातच आहे रॉयल हा शब्द आणि ही रॉयल एनफिल्ड.
एकेकाळी ब्रिटिश कंपनी असलेली रॉयल एनफिल्ड आता केवळ भारतीय कंपनी नसून हा भारतीय आवाज संपूर्ण जगातील रस्त्यावर पोहचवत आहे. या बाईकच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले. असंख्य अडचणींवर मात करत रॉयल एनफिल्ड आज यशाच्या उच्च शिखरावर पोहचली आहे.
1901 मध्ये पहिली रॉयल एनफिल्ड मोटारसायकल लोकांसमोर आली. आणि त्यानंतर रस्त्यावर या गाडीचा प्रवास कधी थांबलाच नाही. स्वातंत्र्यापूर्वी रॉयल एनफिल्ड म्हणजे पोलिसांची किंवा सैनिकांची गाडी असे म्हणायचे. कारण त्या काळी वजनदार आणि आवाजात दमदार गाडी जास्त करून अधिकारी वर्गच वापरत असे.
1949साली भारताकडे हस्तांतरित झालेली ही कंपनी 1955 ला सर्वांच्या नजरेत आली. 1955 ला भारतीय सैन्यासाठी या कंपनीच्या मोटारसायकलींंची निवड करण्यात आली. पण या नंतर हळूहळू कंपनी तोट्यात जाऊ लागली.
मार्केटमध्ये कंपनी कमजोर झाली,रस्त्यावर दुसऱ्या कंपन्यांच्या गाड्या जास्त दिसायला लागल्या. पण रॉयल एनफिल्डने हार मानली नाही. कंपनीने बुलेट आणि काही नवीन मॉडेलच्या माध्यमातून मार्केटमध्ये दमदार पुनरागनमन केले.
2000 साली सिद्धार्थ लाल यांनी सीईओ म्हणून कार्यभार सांभाळायला सुरूवात केली. आणि तेव्हापासून सुरू झाला बुलेट आणि रॉयल एनफिल्ड मधला रॉयल प्रवास. बुलेट क्लासिक,थंडरबर्ड, डेजर्ट स्टॉर्म अशा काही बाईक आपल्या स्टाईल आवाजाने देशाच्या प्रत्येक रस्त्यावर धावत होत्या.
2005 साली कंपनीच्या इतिहासात एक असा टर्नओव्हर आला याचा कोणीही विचार केला नव्हता विचार केला नव्हता. या वर्षी कंपनीने तब्बल 50 हजारांपेक्षा जास्त रॉयल एनफिल्ड विकल्या. 2012मध्ये 81 हजारापेक्षा जास्त तर 2015 मध्ये कंपनीने 50% ग्रोथ मिळवली. तर 2017 मध्ये सुमारे दीड लाख मोटारसायकल भारतीय रस्त्यावर उतरल्या.
या उत्तम विचारामागे क्लासिकला मॉर्डन मध्ये जोडण्याचा प्लॅन होता. रॉयल एनफिल्ड नेहमीच रॉयल वाहन राहिले आहे पण याची किक ही एक प्रमुख समस्या होती. कंपनीने सेल्फ स्टार्ट दिलं आणि रॉयल एनफिल्डला एक जोरदार किक मिळाली.
देशाच्या स्वातंत्र्यदिनी परेडमध्ये बुलेटवर प्रात्यक्षिकं दाखवणारे सैनिक आपण पाहिले असतीलच देशाची शान असलेल्या राजपथवर जेव्हा रॉयल इन्फिल्डच्या भरवशावर प्रात्यक्षिके दाखवली जातात देशाच्या जनतेचा आपोआपच या बाईकवर विश्वास बसतो आणि धकधक आवाजासारखा धडकत असतं ते बाइक रायडर्सचे हृदय.